Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आहारातील फायबर म्हणजे काय? फ्रूट फायबरचे काय आहेत फायदे ? जाणून घ्या

आहारातील फायबर म्हणजे काय, ते तुमच्या आहारात समाविष्ट असणं का आवश्यक असते, फळे व फळांचा रस प्यायल्याने अधिक फायबर शरीरात जाण्यासाठी कशा प्रकारे मदत होते, हे आज आपण जाणून घेणार आहोत. आहारतज्ञ डॉ. भावना शर्मा यांनी याविषयी माहिती दिली आहे.

  • By साधना
Updated On: Jul 14, 2023 | 05:37 PM
fiber news

fiber news

Follow Us
Close
Follow Us:

संतुलित आहारात फायबर (Fiber) असणं गरजेचं आहे. पचनसंस्थेचे आरोग्य राखण्यासाठी ते गरजेचे असते. आपल्या आहारात (Balanced Diet) पुरेशा फायबरची खातरजमा करण्यासाठी फळांचं सेवन करायला हवं. कारण, फळांमध्ये डाएटरी फायबर (Dietary Fiber Benefits) मुबलक प्रमाणात असते. आहारातील फायबर म्हणजे काय, ते तुमच्या आहारात समाविष्ट असणं का आवश्यक असते, फळे व फळांचा रस प्यायल्याने अधिक फायबर शरीरात जाण्यासाठी कशा प्रकारे मदत होते, हे आज आपण जाणून घेणार आहोत. आहारतज्ञ डॉ. भावना शर्मा यांनी याविषयी माहिती दिली आहे. (Healthy Diet)

आहारातील फायबर म्हणजे काय?
आहारातील फायबर हा वनस्पतीजन्य आहारातील पचन न होणारा भाग असतो. तो आपल्या पचनमार्गातून जातो. या फायबरचे दोन प्रकार असतात. पहिला द्रावणीय आणि दुसरा अद्रावणीय. पोटात द्रावणीय फायबर पाण्यात विरघळतात आणि जेलसारखा पदार्थ तयार करतात, तर अद्रावणीय पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत आणि मलाचे वजन वाढवतात.

आहारात फायबर महत्त्वाचे का असते?
आहारातील फायबरचे आरोग्याला अनेक फायदे आहेत आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी हे फायबर महत्त्वाचे आहेत. आहारातील फायबरमुळे आतड्यातून अन्न जाण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेला प्रतिबंध होतो. या फायबरमुळे रक्तामध्ये साखर विरघळण्याचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहते. आतड्यात कोलेस्टरॉल धरून ठेवून ते रक्तप्रवाहात शोषू देत नाही. परिणामी कोलेस्टरॉलची पातळी कमी राहण्यास मदत होते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. फायबरयुक्त पदार्थांमुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि शरीरातील कॅलरींचे प्रमाण राखले जाते. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर फायबरयुक्त पदार्थ खा.

फळे हा फायबरचा उत्तम स्रोत कसा आहे आणि फळे कशी खावी?
फळांमध्ये आहारातील फायबर मुबलक प्रमाणात असते आणि आहारातून आपल्याला मुबलक फायबर मिळेल, याची खातरजमा फळांमुळे होते. अनेक फळांमध्ये द्रावणीय आणि अद्रावणीय अशी दोन्ही प्रकारची फायबर असतात. त्यांचे प्रमाण वेगवेगळे आहे. उदा. सफरचंदांमध्ये द्रावणीय फायबर भरपूर असते तर बेरी प्रकारातील फळांमध्ये द्रावणीय आणि अद्रावणीय फायबर मुबलक असते. केळ, संत्री, बेरी, आंबे, लिची, जांभूळ, पेरू, अननस, कलिंगड आणि डाळिंबांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते.

तुमच्या रोजच्या आहारात तुम्ही अनेक प्रकारे फळे समाविष्ट करू शकता. त्यातला एक सामान्यपणे वापरला जाणारा मार्ग म्हणजे पूर्ण फळ खाणे. दुसरा मार्ग म्हणजे फळांचा रस पिणे. यामुळे तुम्ही अनेक फळांचे एकाच वेळी सेवन करू शकता. एबीसी ज्युसमध्ये, चाट मसाला घातलेला जांभळाचा रस, मिक्स्ड फ्रुट ज्यूस इत्यादींमध्ये फळांच्या रसांचे छान मिश्रण असते. मुबलक फायबर असलेल्या अल्पोपहारासाठी तुम्ही हे रस तुमच्या स्मूदी किंवा योगर्टमध्येही घालू शकता.

फळे कधी खावी हे वैयक्तिक आवड-निवड आणि वेळापत्रकावर अवलंबून असते. पण सामान्यतः रिकाम्या पोटी किंवा दोन जेवणांच्या मधल्या वेळात फळे खाल्लेली चांगली असतात. रिकाम्य पोटी फळे खाल्ली तर पोषक घटक चांगल्या प्रकारे शोषले जातात आणि पचनाच्या समस्या उद्भवत नाहीत.

फ्रुट फायबरचे फायदे
• पचनयंत्रणा उत्तम काम करते आणि सामान्य पचनाला मदत करते.
• वजन कमी करून ते प्रमाणात राखण्यात मदत होते.
• हृदयाच्या रक्तवाहिनीशी संबंधित आजार, टाइप 2 प्रकारचा मधुमेह, मेटाबॉलिक सिण्ड्रोम होण्याचा धोका कमी होतो
• रक्तातील शर्करा नियंत्रित करण्यास आणि रक्तातील शर्करेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते

थोडक्यात आरोग्याच्या हितासाठी डाएटरी फायबर (आहारातील फायबर) महत्त्वाचे असते. फळे रुचकर असतातच, त्याचप्रमाणे फायबरचा उत्तम स्रोत असतात आणि फळांमधून अनेक पोषक घटक शरीराला मिळतात. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा किराणा मालाच्या दुकानात किंवा कॅफेमध्ये जाल तेव्हा तुमची आवडती फळे/फळांचा रस नक्की घ्या.

Web Title: Dietary fiber and fruits benefits nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2023 | 05:32 PM

Topics:  

  • Health Article
  • Health Tips

संबंधित बातम्या

धक्कादायक! टॉयलेटमधील Hand Dryer मुळे सर्वात जास्त आजारी, पेपर-टॉवेलच्या तुलनेत 1300 पट किटकांचा धोका
1

धक्कादायक! टॉयलेटमधील Hand Dryer मुळे सर्वात जास्त आजारी, पेपर-टॉवेलच्या तुलनेत 1300 पट किटकांचा धोका

10 पैकी 6 महिलांना होतेय Urine Leakage ची समस्या, लाजिरवाणे वाटत असेल तर करा 3 जबरदस्त उपाय
2

10 पैकी 6 महिलांना होतेय Urine Leakage ची समस्या, लाजिरवाणे वाटत असेल तर करा 3 जबरदस्त उपाय

100 वर्ष जगायचं असेल तर आजपासूनच आपल्या आहारात या 5 बियांचा समावेश करा; याचे सेवन शरीरासाठी कोणत्या चमत्काराहून कमी नाही
3

100 वर्ष जगायचं असेल तर आजपासूनच आपल्या आहारात या 5 बियांचा समावेश करा; याचे सेवन शरीरासाठी कोणत्या चमत्काराहून कमी नाही

पुरुषांना ताकद मिळवून देणारे ‘शिलाजीत’ नक्की कुठे आणि कसे मिळते? काय आहे उपयोग जाणून घ्या
4

पुरुषांना ताकद मिळवून देणारे ‘शिलाजीत’ नक्की कुठे आणि कसे मिळते? काय आहे उपयोग जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.