Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Obesity: लठ्ठपणामुळे वाढतो अनेक आजारांचा धोका, केवळ वजनवाढ नाही; जीवावर बेतू शकते दुर्लक्ष करणे

जगभरात लठ्ठपणा ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. केवळ वजनवाढ हा एकच त्रास नाही तर यामुळे अनेक आजारही बळावताना दिसून येत आहेत. वेळीच याला आळा घालणं गरेजेचं आहे. जाणून घ्या तज्ज्ञांकडून

  • By दिपाली नाफडे
Updated On: Mar 07, 2026 | 11:00 AM
लठ्ठपणामुळे काय त्रास होतो (फोटो सौजन्य - iStock)

लठ्ठपणामुळे काय त्रास होतो (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • लठ्ठपणामुळे होणारे आजार 
  • लठ्ठपणाची समस्या का वाढतेय 
  • कोणते आजार ठरू शकतात त्रासदायक 
भारतामध्ये सर्व वयोगटांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. लठ्ठपणा हा फक्त दिसण्याशी किंवा शरीराच्या आकाराशी संबंधित प्रश्न नाही. लठ्ठपणामुळे हृदयविकार, मधुमेह, फॅटी लिव्हर, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडांच्या समस्यांचा धोका वाढतो. या आजारांमुळे व्यक्तीच्या एकूण आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त निरोगी राहण्याचा आणि योग्य वजन राखण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे.

भारतात लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि ती चिंतेचा विषय बनली आहे. त्यामुळे लठ्ठपणा हा फक्त शरीराचे वजन वाढणे किंवा दिसण्याशी संबंधित समस्या नसून तो एक गंभीर आरोग्य समस्या आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. लठ्ठपणाचा परिणाम शरीरातील अनेक अवयवांवर होतो. आजकाल लोकांची जीवनशैली अधिक बसून राहण्याची झाली आहे, व्यायाम कमी झाला आहे, ताणतणाव वाढला आहे आणि जंक फूडचे सेवन जास्त झाले आहे. या सर्व कारणांमुळे लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, लठ्ठपणामुळे अनेक गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. डॉ. अपर्णा गोविल भास्कर, बॅरिएट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन, अपोलो स्पेक्ट्रा, मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. लठ्ठपणामुळे होणाऱ्या आरोग्य समस्या कोणत्या आहेत जाणून घेऊया 

Obesity Issue: जास्त वजन आहे? नियमित आरोग्य तपासणी का गरजेची, शरीर आतून पोखरतंय; गंभीर परिणाम

मधुमेह:

लठ्ठपणा म्हणजे शरीरात जास्त प्रमाणात चरबी साठणे. यामुळे शरीर इन्सुलिनचा योग्य प्रकारे वापर करू शकत नाही. त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होते. परिणामी रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढतो. जर मधुमेह नियंत्रणात ठेवला नाही, तर त्याचा परिणाम हृदय, नस, डोळे आणि मूत्रपिंडांवर होऊ शकतो.

उच्च रक्तदाब:

शरीराचे वजन जास्त असल्यास हृदयाला शरीरात रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. त्यामुळे रक्तवाहिन्यांवर दबाव वाढतो आणि उच्च रक्तदाब होतो. जर उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवला नाही, तर हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. त्यामुळे या स्थितीकडे दुर्लक्ष करू नये.

मूत्रपिंडांचे नुकसान:

जास्त वजनामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब होण्याची शक्यता वाढते. या दोन्ही समस्या पुढे जाऊन दीर्घकालीन मूत्रपिंड विकारांना कारणीभूत ठरू शकतात. जास्त वजनामुळे मूत्रपिंडांवर अतिरिक्त ताण येतो आणि त्यामुळे शरीरातील घातक पदार्थ फिल्टर करण्याची त्यांची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे मूत्रपिंडांचे आरोग्य जपणे खूप महत्त्वाचे आहे.

World Obesity Day 2026: शेकडो आजारांचे मूळ आहे लठ्ठपणा, शरीर सडवण्यापासून अटॅक येण्यापर्यंत त्रास; वेळीच करा वजन कमी

फॅटी लिव्हर रोग:

लठ्ठपणा असलेल्या अनेक लोकांच्या यकृतात जास्त प्रमाणात चरबी साठते. यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) होऊ शकतो. सुरुवातीला याची कोणतीही ठळक लक्षणे दिसत नाहीत. पण कालांतराने यामुळे यकृतामध्ये सूज येऊ शकते, जखमा तयार होऊ शकतात आणि गंभीर परिस्थितीत लिव्हर फेल्युअर देखील होऊ शकते.

नियंत्रणासाठी काय करावे?

  • लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी समतोल आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे
  • जंक फूड, तेलकट पदार्थ, प्रोसेस्ड फूड आणि कॅन फूड टाळण्याचा प्रयत्न करा 
  • ताणतणाव कमी करण्यासाठी योग आणि ध्यानाचा सराव करा
  • दररोज किमान 45 मिनिटे व्यायाम करण्याची सवय लावा
  • तसेच नियमित आरोग्य तपासणी करून घ्या, जेणेकरून लठ्ठपणाशी संबंधित कोणत्याही समस्या वेळेत ओळखता येतील
  • चांगल्या सवयी अंगीकारा आणि निरोगी व आनंदी आयुष्याकडे एक महत्त्वाचे पाऊल टाका

Web Title: Obesity increases the risk of many diseases not just weight gain ignoring it can be life threatening

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • diabetes
  • Health Tips
  • obesity

संबंधित बातम्या

तुमचीही मुलं विनाकारण चिडचिड करतात का? ‘व्हिटॅमिन्स’च्या कमतरतेमुळे असू शकतो हा बदल; जाणून घ्या उपाय!
1

तुमचीही मुलं विनाकारण चिडचिड करतात का? ‘व्हिटॅमिन्स’च्या कमतरतेमुळे असू शकतो हा बदल; जाणून घ्या उपाय!

देशात वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका! 1990 पासून मृत्यूंमध्ये 74% वाढ; तज्ज्ञांची गंभीर चिंता
2

देशात वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका! 1990 पासून मृत्यूंमध्ये 74% वाढ; तज्ज्ञांची गंभीर चिंता

प्रत्येक मधुमेह रुग्णाने खावीत ही 2 फळे, याचे सेवन कोणत्या औषधाहून कमी नाही… डॉक्टरांनी दिला सल्ला
3

प्रत्येक मधुमेह रुग्णाने खावीत ही 2 फळे, याचे सेवन कोणत्या औषधाहून कमी नाही… डॉक्टरांनी दिला सल्ला

Parenting Tips: घरात सतत तणाव! मुलांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, पालकांनी ‘या’ गोष्टीकडे वेळीच द्या लक्ष
4

Parenting Tips: घरात सतत तणाव! मुलांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, पालकांनी ‘या’ गोष्टीकडे वेळीच द्या लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.