Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून

Travel News : राजस्थानमधील माउंट अबू हे निसर्गसौंदर्यासोबतच ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांसाठीही प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी असलेले दिलवारा जैन मंदिर आपल्या पांढऱ्याशुभ्र संगमरवरी वास्तुकला आणि अप्रतिम नक्षीकामामुळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर दिसणारी कलाकुसर पाहून नजर खिळून राहते.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 26, 2026 | 08:00 AM
ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून

Follow Us
Follow Us:
  • माउंट अबूमधील दिलवारा जैन मंदिर इतके खास का आहे?
  • संगमरवरी खडकावरील बारकाईने केलेले नक्षीकाम पाहून तुम्हीही व्हाल थक्क
  • दिलवारा जैन मंदिरातील ‘या’ पाच प्रमुख मंदिरांचा इतिहास जाणून घ्या
राजस्थानमध्ये वसलेले माउंट अबु हे अरवली पर्वतरांगांमध्ये लपलेले एकमेव हिल स्टेशन आहे. याच हिल स्टेशनमध्ये जगातील सर्वात लोकप्रिय आणि नावाजलेले दिलवारा जैन मंदिर देखील उपस्थित आहे. हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर इथले साैंदर्य नेहमीच पर्यटकांना याकडे आकर्षित करत असते. मुख्य म्हणजे या वास्तूलाही पांढऱ्या शुभ्र संगमरवरी खडकापासून तयार करण्यात आले आहे. चला याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट

संगमरवरी खडकावर करण्यात आले आहे नक्षीकाम

दिलवारा जैन मंदिराचा इतिहास ११ ते १३ व्या शतकादरम्यानच्या गुजरातच्या चालुक्य (सोळंकी) राजवंशाच्या काळापर्यंत मागे जातो. याची निर्मिती इसवी सन १०३१ मध्ये गुजरातचे सोलंकी शासक भीमदेव प्रथम यांचे मंत्री विमल शाह यांनी केल्याचे सांगितले जाते. हे मंदिर भारतातील एक सुंदर मंदिर असून येथील वास्तुकला अनेकांना मोहित करणारी ठरते. येथील संगमरवरी खडकावर केलेले नक्षीकाम तर अतिसुरेख दिसते. म्हटले जाते की, येथील नक्षीकाम जगातील सर्वात सुक्ष्म खडकावर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमध्ये मोडली जाते.

हे मंदिर बाहेरुन दिसताना आपल्याला सामान्य मंदिराप्रमाणे दिसते पण मंदिराच्या आत प्रवेश करताच तुम्हाला संगमरमर खडकावर केलेली सुंदर कलाकुसर पाहायला मिळते. इथले वातावरण आणि कोरीवकाम इतके सुंदर आहे की, एकदा पाहताच येथील दृष्यांवर पर्यटकांच्या नजरा खिळून राहतात.

श्र्वेतांबर जैन परंपरेचा आहे संबंध

दिलवारा जैन मंदिरात एकूण ५ प्रमुख मंदिर आहेत ज्यांचा संबंध जैन धर्मातील श्वेतांबर संप्रदायाशी होतो.

१. विमल वसाही

हे मंदिर इसवी सन १०३१ च्या काळात तयार केल्याचे सांगितले जाते. हे मंदिर तीर्थंकर, भगवान ऋषभदेव (आदिनाथ) यांना समर्पित आहे. हा मंदिराचा गाभा असून याचा रंग मंडप या नावानेही ओळखले जाते. याच्या छतावर केलेले नक्षीकाम, विशाल मंडप आणि स्तंभ लोकांना आकर्षित करते.

२. लूणा वसाही

जरातच्या शासकांचे मंत्री वास्तुपाल आणि तेजपाल यांनी इ.स. १२३० मध्ये या मंदिराची बांधणी केल्याचे म्हटले जाते. सांगितले जाते की, २२वे तीर्थकार नेमिनाथ यांना हे मंदिर समर्पित आहे. इथे संगमरवरी कल्पवृक्ष आणि हत्ती मंडप पाहायला मिळतो.

३. पित्तलहर

भगवान ऋषभदेव (आदिनाथ) यांना हे मंदिर समर्पित आहे. हे या ५ मंदिरांमधील तीसऱ्या स्थानाचे मंदिर म्हणून ओळखले जाते ज्याला पित्तलहर असे नाव देण्यात आले आहे.

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

४. पार्श्वनाथ मंदिर

दिलवारा जैन मंदिरातील चाैथ्या स्थानावरचे मंदिर म्हणजे पार्श्वनाथ मंदिर. २३ वे तीर्थकार पार्श्वनाथ यांना हे मंदिर समर्पित आहे. याचा परिसर सर्वात उंच आणि तीन मजली आहे.

५. महावीर स्वामी मंदिर

शेवटचा आणि पाचवा मंदिर महावीर स्वामी मंदिर हे २४ वे तीर्थकार भगवान महावीर स्वामी यांना समर्पित आहे. अन्य मंदिरांहून या मंदिराचा आकार काहीसा लहान आहे परंतु याच्या भिंतींवर केलेले नक्षीकाम अतिसुंदर आहे जे या मंदिराकडे लोकांना आकर्षित करते.

Web Title: Dilwara jain temple mount abu rajasthan marble carving history five temples

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • rajasthan
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट
1

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…
2

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत
3

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?
4

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.