ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट
Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…
क्लासनुसार ठरवली गेली आहे लिमिट
भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, तुम्ही ज्या कोचमध्ये प्रवास करता त्याच्या आधारावर तुमच्या सामाचे वजन निश्चित केले जाते.
फर्स्ट एसी – या क्लासमध्ये यात्रा करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही एक्स्ट्रा चार्जशिवाय 70 किलोपर्यंतचे वजन घेऊन जाण्याची परवानगी आहे.
सेकंड एसी – जर तुमच्याकडे टू-टिअरचे तिकिट असेल तर तुम्ही 50 किलोपर्यंतचे वजन रेल्वेत घेऊन जाऊ शकता.
स्लीपर आणि जनरल डब्ब्यांचे काय नियम आहेत?
जर तुम्ही स्लीपर क्लासमध्ये यात्रा करत असाल तर यातून 40 किलोपर्यंतचे सामान तुम्ही विना फि रेल्वेत कॅरी करु शकता. त्याचबरोबर जर तुम्ही जनरल क्लासमध्ये प्रवास करत असाल तर तुम्ही 35 किलोपर्यंतचे सामान फ्रिमध्ये रेल्वेतून वाहून नेऊ शकता. इथे गर्दी फार असते ज्यामुळे फार जास्त सामान नेण्यास मनाई आहे.
एक्स्ट्रा सामान असल्यास काय करावे?
जर तुमच्याकडे निश्चित केलेल्या सामानाव्यतिरिक्त जास्त प्रमाणात सामान असेल तर रेल्वे सुरु होण्यापूर्वी तुम्ही रेल्वे स्टेशनवरील ‘लगेज ऑफिस’ला भेट देऊ शकता. इथे जाऊन तुम्ही एक्स्ट्रा सामानाला पार्सलच्या स्वरुपात बुक करुन ठेवू शकता. यानंतर ते एक्स्ट्रा सामान तुम्हाला रेल्वेतून विना चिंता घेऊन जाता येईल.
Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित
स्टेशनवर पकडले गेल्यास दंड आकारला जाईल…
जर तुम्ही लगेच रुल्सचे उल्लंघन केले आणि सामानाला बुक न करता जर एक्स्ट्रा सामान प्रवासात घेऊन जाताना पकडले गेला तर रेल्वे नियमांनुसार तुमच्याकडून चांगलाच दंड आकारला जाईल. यामुळेच समजूतदार बना आणि निश्चित केलेल्या लिमिटइतकेच सामान रेल्वेत कॅरी करा जेणेकरुन तुमचा प्रवास सुखकर होईल आणि कुणाला त्रासही होणार नाही.






