Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखर त्वचेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या गोडधोडाच्या ग्लोरिफिकेशनचे हे कटू सत्य

गोड पदार्थच त्वचेचे नुकसान करतात की पांढरा ब्रेड, मैदा आणि रिफाइंड कार्ब्सही त्यामागे कारणीभूत ठरू शकतात? थेट साखरेसोबत अप्रत्यक्ष साखरेचा परिणामही समजून घेणे महत्त्वाचे आहे. ग्लायकेशनमुळे कोलॅजनवर होणारा परिणाम त्वचेच्या वृद्धत्वाशी जोडला जातो.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 07, 2026 | 08:27 AM
साखर त्वचेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या गोडधोडाच्या ग्लोरिफिकेशनचे हे कटू सत्य
Follow Us
Follow Us:
  • मिठाई आणि शीतपेयांतील अतिरिक्त साखर रक्तातील ग्लुकोज वाढवून काही लोकांमध्ये त्वचेचा दाह वाढवू शकते.
  • मैदा आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्स शरीरात वेगाने ग्लुकोज वाढवून अप्रत्यक्ष साखरेसारखा परिणाम करू शकतात.
  • ग्लायकेशनमधून तयार होणारे AGEs कोलॅजन आणि इलास्टिनवर परिणाम करून त्वचेचे वृद्धत्व वाढवू शकतात.
आपण साखर म्हटले की चॉकलेट, मिठाई, केक किंवा कोल्ड ड्रिंक्सचा विचार करतो. पण त्वचेसाठी साखरेचा विषय केवळ या पदार्थांपुरता मर्यादित नाही. काही पदार्थांमध्ये साखर थेट असते डायरेक्ट असते, तर पांढरा ब्रेड, मैदा, पेस्ट्री, पॉलिश्ड तांदूळ किंवा अतिप्रक्रिया केलेले स्टार्चयुक्त पदार्थ शरीरात ग्लुकोज रूपातील साखरही वेगाने वाढवू शकतात. त्यामुळे त्यांचा परिणाम शरीरावर अप्रत्यक्षपणे साखरेसारखा होऊ शकतो.

डायरेक्ट शुगर – थेट साखर म्हणजे काय?

गोड प्रक्रिया केलेली पेये, मिठाई, बिस्किटे, केक आणि अनेक पॅकेज्ड पदार्थांमधील एक्स्ट्रा साखर रक्तातील ग्लुकोज झपाट्याने वाढवू शकते. वारंवार होणाऱ्या अशा वाढीमुळे शरीरात दाहक प्रक्रिया वाढण्याची शक्यता असते. हाय ग्लायसेमिक आहाराचा चेहर्यांवरच्या मुरुमांशी संबंध असल्याचे काही अभ्यास सुचवतात; मात्र प्रत्येक व्यक्तीमध्ये हा परिणाम सारखा दिसेलच असे नाही.

अंड्यांमध्ये कोणकोणते मायक्रोन्युट्रीएंट असतात? आणि ते शरीरासाठी कसे महत्त्वाचे असतात? जाणून घ्या

इनडायरेक्ट शुगर अप्रत्यक्ष साखर त्वचेला कशी प्रभावित करते?

अनेकांना वाटते की गोड पदार्थ टाळले म्हणजे साखरेपासून बचाव झाला. प्रत्यक्षात मैदा, पांढरा ब्रेड, काही रिफाइंड धान्ये आणि इतर हाय ग्लायसेमिक पदार्थ पचताना रक्तातील ग्लुकोज वेगाने वाढवू शकतात. त्यामुळे त्वचेवर मुरुम, तेलकटपणा किंवा दाह वाढण्यास काही लोकांमध्ये चांगलाच हातभार लागू शकतो.

ग्लायकेशनमुळे त्वचेचे वृद्धत्व?

रक्तातील अतिरिक्त ग्लुकोज आणि फ्रक्टोज शरीरातील प्रथिनांशी जोडले गेले की ग्लायकेशनची प्रक्रिया होते. यामधून Advanced Glycation End Products म्हणजेच AGEs तयार होऊ शकतात. हे घटक त्वचेतील कोलॅजन आणि इलास्टिनशी संबंधित संरचनेवर परिणाम करून त्यांची लवचिकता कमी करू शकतात. परिणामी सुरकुत्या, त्वचा सैल होणे आणि निस्तेजपणा यांसारख्या वृद्धत्वाच्या लक्षणांना हातभार लागू शकतो.

Vegetable Storage Tips: कोणत्या फळभाज्या फ्रीज मध्ये ठेवाव्यात आणि कोणत्या ठेऊ नयेत? जाणून घ्या ही गरजेची गोष्ट

त्वचेसाठी काय करावे?

साखर पूर्णपणे बंद करण्यापेक्षा जास्त साखर आणि अतिप्रक्रिया केलेले हाय ग्लायसेमिक पदार्थ कमी करणे जास्त योग्य शकते. भाज्या, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, प्रथिने आणि कमी प्रक्रिया केलेले पदार्थ आहारात वाढवणे एकंदरीत आरोग्यासाठी उपयोगी ठरू शकते. तसेच सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण महत्त्वाचे आहे, कारण अतिनील किरणेही त्वचेच्या वृद्धत्वाच्या प्रक्रियेत मोठी भूमिका बजावतात.

Web Title: Direct indirect sugar skin effects explained diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 08:27 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.