
टॉयलेट सीटचं नाही तर घरातील या 8 जागा असतात सर्वाधिक अस्वच्छ, साफ न केल्यास वाढू शकते आजारांची भीती
स्वयंपाकघरातील सिंक आणि नळाचे हँडल
स्वयंपाकघरातील सर्वात वापरात येणारी गोष्ट म्हणजे इथे असलेला सिंक ज्यात रोजची अनेक घाणेरडी भांडी घासली जातात. अनेक अभ्यासांनुसार, स्वयंपाकघरातील सिंक आणि नळाच्या हँडलमध्ये टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया असल्याचे आढळून आले आहे. सिंक आणि नळाची दररोज स्वच्छता केली नाही तर संसर्गाचा धोका वाढू शकतो. यामुळे दुर्गंधी वाढते ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
चाॅपिंग बोर्ड
लाकडी असो वा प्लास्टिक विविध भाज्या, फळे कापण्यासाठी नियमितरित्या चाॅपिंग बोर्डचा वापर केला जातो. चाॅपिंग बोर्डवर न दिसून येणाऱ्या भेगांमध्ये बारीक बॅक्टेरिया लपून बसलेले असतात. तुम्ही जर रोज याला स्वच्छ धुतले नाही तर फूड पाॅयजनिंग होण्याची शक्यता असते. तुम्ही याला कधीकधी लिंबू किंवा व्हिनेगरनेही स्वच्छ करु शकता, यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म चाॅपिंग बोर्ड स्वच्छ करण्यास मदत करतात.
मोबाईल फोन आणि रिमोट
आपल्यासाठी हे आश्चर्यकारक असू शकते पण रोज वापरला जाणारा आपला स्मार्टफोन देखील अस्वच्छ गोष्टींच्या यादीत समाविष्ट होतो. फोन, टीव्ही किंवा एसी रिमोट दिवसातून अनेक वेळा हात न धुता हाताळले जातात ज्यामुळे यावर टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया आढळून येत असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे. दररोज अस्वच्छ हाताने आपल्या फोनला स्पर्श केल्याने हातांमधील जंतू फोनवर जाऊन बसतात. आपल्या फोनला आणि घरातील रिमोटला दररोज स्वच्छ कापडाने स्वच्छ करणे गरजेचे आहे.
बाथरूमचे नळ आणि हँडल
बाथरुम नेहमीच दमट असतात. या दमटपणामुळे इथे बॅक्टेरिया आणि बुरशी वाढण्याचा धोका सर्वाधिक असतो. नळ, दाराचे हँडल आणि साबण ठेवण्याच्या जागेला स्पर्श केल्याने जंतू आपल्या हातावर येऊ शकतात. सौम्य जंतुनाशकाने दररोज यांना पुसल्याने बुरशीचा प्रसार रोखण्यास मदत होते.
टॉयलेट फ्लश हँडल
टाॅयलेट फ्लश हे घरातील कदाचित सर्वाधिक घाण ठिकाणांपैकी एक आहे. तुम्ही फ्लश करताना प्रत्येक वेळी त्याला स्पर्श करता तेव्हा यातील जंतूंमुळे तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. दररोज जंतुनाशक स्प्रे किंवा वाइपने या जागेला स्वछ करत जा.
लाईट स्विचेस आणि दरवाजाचे हँडल
घरातील लाईट स्विच आणि दरवाजाचे नॉब सामान्यतः रोज वापरले जातात, यांना रोज हात लावला जातो पण याच्या स्वचतेकडे फारसे लक्ष दिले जात नाही. इथे साचलेले बॅक्टेरियांचा वेळीच खात्मा होणं फार गरजेचं आहे. अन्यथा ते संक्रमणाचे कारण बनू शकतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.