सुगंधी कढीपत्याच्या पानांचे शरीरासोबतच त्वचा आणि केसांना होतील भरमसाट फायदे
जेवण बनवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो. त्यातील आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे कढीपत्त्याची पाने. कढीपत्त्याच्या पानांचा वापर फोडणी देण्यासाठी केला जातो. यामुळे पदार्थाची चव आणि सुगंध वाढतो. कढीपत्त्याच्या पानांमध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म शरीरासोबतच त्वचा आणि केस मजबूत ठेवण्यास मदत करतात. सकाळी उठल्यानंतर नियमित एक किंवा दोन कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्यास केसांच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळेल. कढीपत्त्याची पाने आमटी, वरण, भाजी, चटणी इत्यादी पदार्थांच्या फोडणीसाठी वापरला जातो. हा हिरवी पाने स्वयंपाक घरात केवळ फोडणीपुरतीच नाहीतर त्वचेचे सौंदर्यात भर टाकण्यासाठी सुद्धा वापरली जातात. कढीपत्ता एक औषधी वनपस्ती आहे. यात अनेक आयुर्वेदिक गुणकारी घटक आढळून येतात.(फोटो सौजन्य – istock)
Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचा कायमच राहील ताजी टवटवीत! ‘या’ साध्या सोप्या सवयी त्वचा करतील सुंदर
केस, त्वचा, पचन इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचा वापर करावा. ही पाने शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात. आज आम्ही तुम्हाला कढीपत्त्याच्या पानांचे कशा पद्धतीने सेवन करावे? कढीपत्ता खाल्ल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली हिरवी पाने शरीराचा गंभीर आजारांपासून बचाव करतात. कढीपत्त्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक द्रव्य आढळून येतात. ज्यात आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे, विटामिन ए, बी, सी आणि इ, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर इत्यादी अनेक आवश्यक घटक आढळून येतात. शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी नियमित कढीपत्त्याची पाने खावीत.
शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे. यासोबतच कढीपत्त्याच्या पानांपासून बनवलेल्या चटणीचा आहारात समावेश करावा. कढीपत्त्याच्या पानांपासून तयार केलेले तेल केस मजबूत करते. लांबलचक केसांच्या वाढीसाठी कढीपत्त्याचे तेल नियमित केसांवर लावावे. तेल तयार करण्यासाठी सर्वप्रथम, खोबऱ्याच्या तेलात कढीपत्त्याची पाने टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. तयार केलेले तेल थंड झाल्यानंतर केसांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे केसांच्या समस्या दूर होतील. केसांमध्ये वाढलेला कोंडा, केस तुटणे, केस गळणे इत्यादी बऱ्याच समस्यांपासून आराम मिळेल.
सकाळसकाळी तोंडाचा बदलतो आकार? फुगलेल्या तोंडाला फ्रेश करण्यासाठी हे घ्या उपाय
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कढीपत्त्याच्या पानांचे चूर्ण किंवा पावडर कोमट पाण्यात मिक्स करून प्यायल्यास आतड्यांमध्ये साचून राहिलेली विषारी घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. तसेच ताजी कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्यास पचन सुधारते, अॅसिडिटी कमी होते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. कढीपत्त्याच्या पानांपासून तुम्ही चटणी किंवा चूर्ण बनवू शकता. शरीराला नैसर्गिकरित्या पोषण देण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे.






