
प्रत्येक मधुमेह रुग्णाने खावीत ही 2 फळे, याचे सेवन कोणत्या औषधाहून कमी नाही... डॉक्टरांनी दिला सल्ला
पायांमध्ये सतत जळजळ होतेय? दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा इशारा!
निरोगी राहण्यासाठी फळे खाणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. प्रत्येक फळाचे स्वतःचे वेगळे गुणधर्म असतात आणि त्यात वेगवेगळे पोषक घटक असतात. अशी दोन फळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी विशेषतः फायदेशीर मानली जातात. मधुमेहाला जर तुम्हाला नियंत्रणात करायचे असेल तर आजपासूनच ही दोन फळे खायला सुरवात करा. मुख्य म्हणजे, स्वत: डाॅक्टर रुग्णांना ही फळे खाण्याची शिफारस करतात. चला ही कोणती फळे आहेत आणि त्यांचे फायदे काय याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
मोसंबी
डॉ. प्रमोद त्रिपाठी म्हणतात की प्रत्येक मधुमेहाच्या रुग्णाने आपल्या आहारात मोसंबीचे सेवन करायला हवे. फायबर आणि फ्लेव्होनॉइड्सने समृद्ध मोसंबी मधुमेहाच्या आजारावर एका औषधासारखे काम करते. खरंतर मोसंबी हे डायबीटिजच्या ॲकार्बोज औषधासारखे काम करते. ते तुमच्या आतड्यांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी करून खाल्ल्यानंतर साखरेचे प्रमाण कमी करते.
संत्री
संत्र्याचे सेवन देखील मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक चांगला पर्याय ठरते. याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) ५० ते ५२ च्या दरम्यान असतो. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि हेस्पेरिडिन नावाच्या वनस्पती-आधारित फ्लेव्होनॉइडचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. डॉ. प्रमोद म्हणतात की, संत्र्याचे सेवन मेटफॉर्मिन या औषधासारखाच प्रभाव असतो. ते शरीरातील रक्तवाहिन्यांवर दाहक-विरोधी परिणाम करते. यामुळे यकृतातून साखरेचे उत्सर्जन कमी होते.
संत्र्याचा-मोसंबीचा रस अधिक फायदेशीर की फळ?
अनेकांना प्रश्न पडतो की फळाला कापून त्याचे सेवन करावे की त्याचा रस बनवून मग त्याचे सेवन करावे. आरोग्य तज्ञांच्या मते, संपूर्ण फळे खाणे नेहमीच चांगले असते. जेव्हा आपण फळाचा रस बनवून त्याचे सेवन करतो तेव्हा फळातील सर्व फायबर काढून टाकले जाते. हे फायबर साखरेचे शोषण कमी करते. रसात फक्त साखर राहते, ज्यामुळे साखरेची पातळी वाढते. तर जेव्हा तुम्ही संपूर्ण फळे खाता तेव्हा शरीराला फायबर, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वे संतुलित पद्धतीने मिळतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील संतुलित राहते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.