घाणेरडे काळे शूज एका मिनिटांत होतील पांढरे, 'या' 5 ट्रीक्सने अशी मिळेल सफेदी की पाहून वाटेल आजच नवीन खरेदी केले आहेत
पांढरे स्नीकर्स किंवा पांढरे शूज हा फॅशन जगतातील एक ट्रेंड आहे जो कधीही फॅशनच्या जगात जुना नाही पडू शकत. जगभरातील लोकांना पांढरे शूज घालायला फार आवडतात. कॉलेजला जाणे असो, ऑफिसमध्ये कॅज्युअल मीटिंग असो किंवा मित्रांसोबत फिरायला जाणे असो – पांढरे शूज नेहमीच क्लासी दिसतात, परंतु या शूजची सर्वात मोठी समस्या म्हणजे ते लवकर घाणेरडे होतात आणि यावर काळा थर चढू लागतो. मग गेटअप कितीही चांगला असला तरी, घाणेरडे शूज संपूर्ण लूक खराब करतात.
आता दररोज तुमचे शूज धुणे किंवा दरवेळी महागडे क्लीनर खरेदी करणे शक्य नाही आणि म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी खास अतिशय सोप्या आणि कामाच्या ट्रिक्स घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुमचे जुने, घाणेरडे शूज पुन्हा नव्यासारखे चमकुवू शकता. या ट्रिक्सच्या वापराने तुमचे जुने शूजही असे दिसतील जणू तुम्ही ते आताच दुकानातून खरेदी केले आहेत.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर हे तुमच्या स्वयंपाकघरातील असे प्रोडक्ट्स आहेत जे तुमचे काळे शूज पांढरे करण्यास तुमची मदत करतील. यासाठी एक चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यात दोन चमचे पांढरा व्हिनेगर आणि थोडे कोमट पाणी घाला. टूथब्रश किंवा कापडाच्या मदतीने हे मिश्रण बुटांना लावा आणि हलक्या हाताने घासून घ्या. नंतर स्वच्छ ओल्या शूज कापडाने पुसून टाका आणि मग शूज सावलीत सुकू द्या. या ट्रिकच्या मदतीने तुमचे जुने शूज नव्यासारखे चमकताना तुम्हाला दिसून येतील.
टूथपेस्ट
दात पांढरे करणारी टूथपेस्ट तुमच्या शूजवर आश्चर्यकारक काम करू शकते, जर ती पांढरी आणि जेल नसलेली असेल. टूथपेस्ट थेट डाग असलेल्या भागात लावा. जुन्या टूथब्रशने शूजच्या डागांवर घासा. घासलेली ही पेस्ट १०-१५ मिनिटे तसेच राहू द्या, नंतर ओल्या कापडाने पुसून टाका. ही पद्धत विशेषतः हलके डाग दूर करण्यास कामी येते.
लिंबू आणि मीठ
लिंबाचा आंबटपणा आणि मीठाचा खरखरीतपणा एकत्रितपणे शूजसाठी एक शक्तिशाली क्लिनरप्रमाणे काम करतो. एक लिंबू कापून तो थेट डाग असलेल्या भागावर चोळा. नंतर थोडे मीठ शिंपडा आणि ५-१० मिनिटे तसेच राहू द्या. ब्रशने हळूवारपणे घासून पुसून टाका. ज्या शूजवर जुने डाग जमा झाले आहेत त्यांच्यासाठी ही ट्रिक सर्वोत्तम पर्याय आहे.
डिशवॉश लिक्विड आणि गरम पाणी
डिशवॉश लिक्विड केवळ भांडीच नाही तर शूज देखील चमकू शकते. यासाठी एका टबमध्ये कोमट पाणी आणि डिश लिक्विडचे काही थेंब घाला आणि मिक्स करा. यानंतर कापड किंवा स्पंजच्या मदतीने ते शूजवर लावा. हलके चोळा आणि नंतर स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा किंवा पुसून टाका. ही पद्धत जास्त मेहनत करता तुमच्ये जुने काळे स्वछ नव्यासारखे सुंदर बनवेल.
सफेद नेलपॉलिश
जर तुमच्या बुटांवर ओरखडे असतील किंवा कापड फाटले असेल तर पांढरी नेलपॉलिश उपयोगी पडू शकते. ओरखडे किंवा डाग असलेल्या भागावर पांढऱ्या नेलपॉलिशचा पातळ थर लावा. ते काही वेळ सुकू द्या. सूजवरील हा पेंट सुकल्यानंतर तुम्हाला तुमचा जुना शूज अगदी नावाप्रमाणे चमकताना दिसेल. शूजची ही सफेद नेलपॉलिश तुम्ही बाजारातून खरेदी करू शकता.
या गोष्टी ध्यानात ठेवा