
तोंडात टाकताच सहज जातील विरघळून! दिवाळीनिमित्त घरी बनवा खास डिंक-बेसन लाडू, नोट करा रेसिपी
Diwali 2026: दिवाळी असो वा इतर कोणतेही सण, घरात विविध पदार्थ कायमच बनवले जातात. गोड पदार्थ बनवण्यासाठी कोणतेही कारण लागत नाही. फराळामध्ये शंकरपाळ्या, बेसन लाडू, चिवडा इत्यादी ठराविक पदार्थ कायमच बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला डिंक बेसन लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले डिंक बेसन चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त गुणकारी आहेत. साजूक तुपात खमंग भाजलेले बेसन आणि सुका मेवा, डिंकाची चव इत्यादी पदार्थांमुळे लाडू चवीला अतिशय सुंदर लागतात. डिंकाचे लाडू घरातील प्रत्येकाला आवडतात असे नाही. त्यामुळे बेसन लाडू बनवताना त्यात थोडंसं डिंक टाकल्यास लाडूची चव आणखीनच सुंदर लागते.हा लाडू सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर सुद्धा खाऊ शकता. नेहमीच तेच ठराविक पदार्थ फराळामध्ये बनवण्याऐवजी काहींना काही वेगळे पदार्थ नक्कीच ट्राय करावे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)