Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2026: महागाईतही पुणेकरांची दिवाळी गोड, बाजारात खरेदीचा उत्साह; मिठाई, फराळाच्या दरांत तब्बल…

Diwali 2026: यंदा सुक्या मेव्यापासून तयार होणाऱ्या मिठाईच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षी प्रतिकिलो सुमारे एक हजार ४४० रुपये असलेल्या सुक्या मेव्याच्या मिठाईचे दर यंदा एक हजार ६०० रुपयांवर पोहोचले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 29, 2026 | 05:56 PM
पुण्यात दिवाळीच्या खरेदीला वेग

पुण्यात दिवाळीच्या खरेदीला वेग

Follow Us
Follow Us:
  • महागाईतही पुणेकरांची दिवाळी गोड, बाजारात खरेदीचा उत्साह
  • मिठाई, फराळाच्या दरांत ८ ते १० टक्क्यांनी वाढ
  • महागाईनंतरही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद
पुणे/Diwali 2026: दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी होत आहे. यंदा कच्चा माल, सुका मेवा आणि खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने मिठाई आणि पारंपरिक फराळाच्या पदार्थांच्या दरांत आठ ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असले तरी महागाईची चिंता बाजूला ठेवत पुणेकरांनी दिवाळीच्या खरेदीला पसंती दिली असून, मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांचा उत्साह कायम आहे.

यंदा सुक्या मेव्यापासून तयार होणाऱ्या मिठाईच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षी प्रतिकिलो सुमारे एक हजार ४४० रुपये असलेल्या सुक्या मेव्याच्या मिठाईचे दर यंदा एक हजार ६०० रुपयांवर पोहोचले आहेत. तसेच मावा कतली, मँगो कतली यांसारख्या मिठाईचे दर ८२८ रुपयांवरून सुमारे ९०० रुपये प्रतिकिलो झाले आहेत. चकली, शेव, शंकरपाळी आणि चिवडा या फराळाच्या पदार्थांचे दरही प्रतिकिलो ४४२ ते ५५२ रुपयांवरून ४८० ते ६०० रुपयांपर्यंत वाढले आहेत.

Bhaubeej Gift Ideas: भाऊबीजेला बहिणीला द्या बचतीचं गिफ्ट! गॅसचा खर्च कमी करणारे ‘हे’ ५ स्मार्ट गॅझेट्स ठरतील फायदेशीर

महागाईमुळे खरेदीचे बजेट बिघडले असले, तरी सणाचा आनंद कमी झालेला नाही. “महागाई असली तरी सणासुदीला खरेदी करावीच लागते. अन्यथा सण आणि सामान्य दिवस यात फरक काय राहणार?” अशी भावना ग्राहक सुष्मिता थोरात यांनी व्यक्त केली. तर, किमती वाढल्या तरी कुटुंबासोबत आनंद साजरा करण्यासाठी मिठाई आणि फराळ खरेदी करत असल्याचे पूजा दिवेकर यांनी सांगितले.

यंदा कच्च्या मालाच्या किमतीत २५ ते ३० टक्के, तर सुक्या मेव्याच्या दरात ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मिठाईच्या किमतींमध्ये साधारण आठ ते दहा टक्क्यांनी वाढ करावी लागली आहे. असे असले तरी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, मिठाईच्या आगाऊ नोंदणीलाही मोठा प्रतिसाद आहे. एकूणच, यंदा दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.

– अमित अनिल गाडवे, भागीदार, काका हलवाई स्वीट्स, पुणे
.
Dhanteras 2026: धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करता येत नाही? या वस्तूंची खरेदी करणे मानले जाते शुभ

मिठाई आणि फराळाच्या पदार्थांच्या दरवाढीची टक्केवारी

पदार्थ.          मागील वर्षाचे दर.   यंदाचे दर.       दरवाढ

सुक्या
मेव्याची मिठाई.      ₹१,४४०.       ₹१,६००.     ११.११%
मावा कतली,
मँगो कतली आदी.     ₹८२८.         ₹९००.         ८.७०%
पारंपरिक फराळाचे
पदार्थ (किमान दर)    ₹४४२.         ₹४८०.         ८.६०%
पारंपरिक फराळाचे
पदार्थ (कमाल दर)     ₹५५२.         ₹६००.        ८.७०%
गिफ्टिंग कॉम्बो पॅक
(सुरुवातीची किंमत)    ₹२७५.        ₹२९९.       ८.७३%
गिफ्टिंग कॉम्बो पॅक
(कमाल किंमत)   ₹१,५६४–₹१,६५६.₹१,७००–₹१,८००
                                                 दरवाढ  सुमारे ८.७%
💡

Frequently Asked Questions

  • Que: यंदा मिठाईचे दर किती रुपये झाले आहेत?

    Ans: यंदा एक हजार ६०० रुपयांवर मिठाईचे दर पोहोचले आहेत.

  • Que: सुक्या मेव्याच्या दरात किती वाढ झाली आहे?

    Ans: सुक्या मेव्याच्या दरात

Web Title: Diwali 2026 people rush to shopping sweet rate increase festival tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 05:43 PM

Topics:  

  • Diwali 2026
  • diwali news
  • pune news

संबंधित बातम्या

Bhaubeej Gift Ideas: भाऊबीजेला बहिणीला द्या बचतीचं गिफ्ट! गॅसचा खर्च कमी करणारे ‘हे’ ५ स्मार्ट गॅझेट्स ठरतील फायदेशीर
1

Bhaubeej Gift Ideas: भाऊबीजेला बहिणीला द्या बचतीचं गिफ्ट! गॅसचा खर्च कमी करणारे ‘हे’ ५ स्मार्ट गॅझेट्स ठरतील फायदेशीर

Maval Agricultural News: मावळात बाळा भेगडेंकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी
2

Maval Agricultural News: मावळात बाळा भेगडेंकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करता येत नाही? या वस्तूंची खरेदी करणे मानले जाते शुभ
3

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करता येत नाही? या वस्तूंची खरेदी करणे मानले जाते शुभ

Skin Care Tips: पिंपल्स सुरकुत्या कायमच्या होतील गायब! कच्च्या दुधात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, दिवाळीआधी त्वचा दिसेल देखणी
4

Skin Care Tips: पिंपल्स सुरकुत्या कायमच्या होतील गायब! कच्च्या दुधात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, दिवाळीआधी त्वचा दिसेल देखणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.