पालकसोबत चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात हिरव्या पालेभाज्या, फळे, फळभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. त्यात प्रामुख्याने खाल्ली जाणारी पालेभाजी म्हणजे पालक. पालकमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम आणि इतर पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे दैनंदिन आहारात तुम्ही पालकचे सेवन करू शकता. आरोग्याच्या दृष्टीने पालक अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे. पालकपासून पालक पुरी, पालक पनीर, पालक भजी, पालकची भाजी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पालक खाल्यामुळे शरीराला योग्य ते पोषण मिळते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक पालकपासून स्मूदी बनवून पितात. युवा स्मूदीचे सेवन केल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही.(फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
पालकमध्ये फायबर, खनिजे आणि इतर जीवनसत्वे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे दैनंदिन आहारात नियमित पालकचे सेवन केल्यास शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढण्यास मदत होईल. पण पालकसोबत या पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्य बिघडू शकते. या पदार्थांच्या सेवनामुळे उलट्या आणि पोटासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पालकसोबत कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
पालकसोबत चुकूनही तिळाचे सेवन करू नये. अनेक लोक भजी बनवताना किंवा इतर कोणतेही पदार्थ बनवताना पालकमध्ये तिळाचा वापर करतात. मात्र पालकसोबत तिळाचे एकत्र सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. उलट्या किंवा पोटासंबंधित समस्या उद्भवू शकतात. शिवाय पचनक्रिया बिघडल्यामुळे आरोग्य बिघडू लागते.
पालक पनीर हा पदार्थ भारतामध्ये सार्वधिक खाल्ला जाणारा पदार्थ आहे. पालक पनीर लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा खूप जास्त आवडते. पण दुधाचा वापर करून बनवलेले पदार्थ पालकसोबत खाणे अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे पालकसोबत पनीरचे सेवन करू नये. पालकमध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळून येते. तसेच दुधामध्ये आढळून येणाऱ्या कॅल्शियमुळे आणि पनीरमधील लोहामुळे शरीरात बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ एकत्र सेवन केल्यास आरोग्य बिघडते. त्यामुळे दैनंदिन आहारात पालकसोबत पनीरचे सेवन करू नये.
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात सर्वच भाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. अशावेळी पालक कढी किंवा पालक रायता बनवून खाल्ला जातो. पण दह्यापासून बनवलेले हे पदार्थ आरोग्यासाठी अतिशय हानीकारक ठरतात. शिवाय आयुर्वेदामध्ये पालक आणि दही एकत्र न खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कॅल्शियम आणि लोह युक्त पदार्थ एकत्र खाल्यामुळे शरीरात बिघाड होतो.