
ब्रश करून सुद्धा तोंडातून दुर्गंधी येते? जाणून घ्या यामागील कारण आणि सोपे घरगुती उपाय, तोंडाचा वास होईल नष्ट
तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी उपाय?
दात खराब होण्याची कारणे?
दातांमध्ये दुर्गंधी कशामुळे वाढते?
सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी दातांची स्वच्छता केली जाते. स्वच्छ ब्रश करून नंतरच अन्नपदार्थ खाल्लेले जातात. रात्री झोपण्याआधी आणि सकाळी उठल्यानंतर ब्रश करणे हे सगळ्यांचे दैनंदिन रुटीन आहे. पण बऱ्याचदा दात व्यवस्थित स्वच्छ न केल्यामुळे दातांवर घाणीचा पिवळा चिकट थर तसाच साचून राहतो, ज्याच्या परिणामामुळे दात अतिशय वाईट आणि कुजल्यासारखे दिसतात. त्यामुळे दातांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित ब्रश करणे फार आवश्यक आहे. सकाळी आणि रात्रीच्या वेळी दात स्वच्छ ठेवणे फार आवश्यक आहे. कितीही वेगवेगळे उपाय केल्यानंतर सुद्धा तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळत नाही. चारचौघांमध्ये गेल्यानंतर किंवा बाहेर कोणासोबत बोलतानाखराब झालेल्या दातांमुळे आत्मविश्वास कमी होण्याची खूप जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
जेवणाल्यानंतर अन्नपदार्थांचे बारीक कण दातांमध्ये तसेच साचून राहिल्यास अन्नाचे कण कुजून जातात. ज्याच्या परिणामामुळे दात खराब होण्यासोबतच दातांचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ब्रश करून सुद्धा तोंडाला दुर्गंधीचा वास कशामुळे येतो? यावर कोणते घरगुती उपाय करावेत? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. दातांचे आरोग्य बिघडल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने समस्या आणखीनच तीव्र होतात आणि दात काळे होण्यासोबतच तोंडातून दुर्गंधीचा वास येण्यास सुरुवात होते.
जेवताना अनेकांना कच्चा कांदा खाण्याची सवय असते. तर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी लसूण खाल्ली जाते. पण हे पदार्थ कच्चे खाल्ल्यामुळे तोंडाला दुर्गंधी येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे उग्र वास असलेल्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे. दिवसभरात शरीरास आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी न प्यायल्यास डिहायड्रेशन सोबतच तोंडातून दुर्गंधीचा वास येतो. सतत येणाऱ्या वासामुळे चारचौघांमध्ये गेल्यानंतर हसताना किंवा बोलताना लाजिरवण्यासारखे वाटते. त्यामुळे नियमित भरपूर पाणी पिणे फार आवश्यक आहे. पाण्याच्या सेवनामुळे शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातात.
तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी नियमित दोनदा किंवा तीनदा ब्रश करणे आवश्यक आहे. ब्रश केल्यामुळे दातांवर साचून राहिलेला चिकट थर कमी होण्यासोबतच दात स्वच्छ होतात आणि दातांचे आरोग्य सुधारते. याशिवाय एक ग्लासभर पाण्यात चार ते पाच लवंग टाकून रात्रभर भिजत ठेवावे. त्यानंतर सकाळी उठून गुळण्या कराव्यात. गुळण्या केल्यामुळे दातांच्या आतमध्ये साचून राहिलेले अन्नपदार्थांचे कण बाहेर पडून जातात आणि दात स्वच्छ होण्यास मदत होते. गुळण्या केल्यानंतर जीभ स्वच्छ घासून काढावी. पाण्यातील १ किंवा २ लवंग चावून खाल्ल्यास तोंडाची दुर्गंधी कमी होण्यासोबतच दात स्वच्छ आणि चमकदार दिसतील.
दातांवर साचून राहिलेला चिकट आणि घाणीचा किळसवाणा थर कमी करण्यासाठी बेकिंग सोड्यात लिंबाचा रस मिक्स करून दातांवर घासावा. यामुळे दात स्वच्छ होण्यासोबतच दातांचे आरोग्य सुधारते. दात स्वच्छ करण्यासाठी कायमच महागड्या टूथपेस्ट किंवा इतर कोणत्याही गोष्टींचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. यामुळे दात स्वच्छ होण्यास मदत होते.
Ans: जीभेवर साचलेले बॅक्टेरिया, हिरड्यांचे आजार, दातांमध्ये अडकलेले अन्नकण, तोंड कोरडे पडणे, पचनाच्या समस्या किंवा काही वैद्यकीय कारणांमुळे ब्रश केल्यानंतरही दुर्गंधी येऊ शकते.
Ans: कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे, जीभ स्वच्छ करणे, भरपूर पाणी पिणे, बडीशेप किंवा लवंग चघळणे आणि नियमित फ्लॉसिंग करणे फायदेशीर ठरू शकते.
Ans: होय. जीभेवर बॅक्टेरिया साचल्यामुळे दुर्गंधी वाढू शकते. त्यामुळे दररोज टंग क्लिनरने जीभ स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे.