Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

परिंचा देश! भारताच्या या ठिकाणाला म्हटले जाते ‘Fairyland’, ऋषिकेशपासून 2 तासांच्या अंतरावर; इथे मिळेल स्वर्गसुखाची अनुभूती

लहानपणी परींची कथा तुम्ही बऱ्याचदा ऐकली असेल मात्र तुम्हाला माहिती आहे का? देशात असे एक ठिकाण देखील आहे ज्याला परींची भूमी म्हटले जाते. नैसर्गिक सुंदरतेने भरलेले हे ठिकाण कॅम्पिंगसाठी एक उत्तम पर्याय आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 11, 2025 | 08:40 AM
परिंचा देश! भारताच्या या ठिकाणाला म्हटले जाते 'Fairyland', ऋषिकेशपासून 2 तासांच्या अंतरावर; इथे मिळेल स्वर्गसुखाची अनुभूती

परिंचा देश! भारताच्या या ठिकाणाला म्हटले जाते 'Fairyland', ऋषिकेशपासून 2 तासांच्या अंतरावर; इथे मिळेल स्वर्गसुखाची अनुभूती

Follow Us
Follow Us:

आपण सर्वजण परिंच्या कथा ऐकत मोठे झाले आहोत. हवेत उडणाऱ्या पंख असलेल्या पऱ्या, ज्यांच्या हातात जादूची काडी असते आणि ज्या चमकदार राजवाड्यात राहतात. परींची ही कथा काल्पनिक असली तरी त्यावेळी आपल्याला हे सर्वच खरं वाटायचं. वास्तविक, असे घडत नाही हे आपणा सर्वांना ठाऊक नाही मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? देशात असे एक ठिकाण आहे ज्याला ‘फेयरीलँड’ असे म्हटले जाते. पर्वतांमध्ये वेढलेल्या या ठिकाणचे सौंदर्य अलैकिक आहे आणि दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. आता परींचा देश म्हटले जाणारे हे ठिकाण खरंच जादुई आहे का? या ठिकाणात असे काय खास आहे ते चला सविस्तर जाणून घेऊयात.

देशातील अनोखे मंदिर जिथे जाताच लोकांना मिळते सरकारी नोकरी; दूरदूरवरून भाविक येतात दर्शनासाठी

या राज्यात वसलंय ठिकाण

तुम्ही आजवर अनेक पर्वतांना भेट दिली असेल मात्र फार क्वचितच लोकांनी पर्वतांमध्ये वसलेली परींची भूमी पाहिली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, उत्तराखंडच्या सुंदर दऱ्याखोऱ्यांमध्ये हे ठिकाण वसले आहे, ज्याला परींची भूमी देखील म्हटले जाते. एका छोट्या गावात वसलेले हे हिल स्टेशन खरोखरच परिकथेच्या जगाची आठवण करून देते. येथील दऱ्या, ढगांनी झाकलेले पर्वत आणि शांतता, सर्वकाही इतके जादुई बनते की तुम्हाला विश्वास बसणार नाही की हे सर्व खरोखर तुमच्यासोबत घडत आहे. जर तुम्हाला बालपणीच्या कथा सत्यात अनुभवायच्या असतील तर तुम्ही एकदा तरी या ठिकाणाला नक्कीच भेट द्यायला हवी. उत्तराखंडमधील खैत पर्वतावर हे ठिकाण वसले आहे ज्याला परींचा देश म्हटले जाते. हा पर्वत उत्तराखंडच्या एका लहान जिल्ह्यात गढवाल येथे आहे. जर तुम्ही येथे गेलात तर कमी बजेटमध्ये तुम्हाला खूप शांती मिळू शकते.

खैत पर्वतावर परी राहतात

तुम्ही स्वतः कल्पना करू शकता की जिथे परी राहतात ती जागा किती सुंदर असेल. या ठिकाणी दूरदूरवर हिरवळ पसरलेली आहे. या ठिकाणी अक्रोड आणि लसूण स्वतःहून उगवतात. कॅम्पिंगसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे, मात्र हे लक्षात घ्या की, इथे संगीत वाजवण्यास मनाई आहे. परींना आवाजात अजिबात आवडत नाही असे म्हटले जाते आणि यामुळेच इथे संगीत वाजवण्यास मनाई आहे.

सज्ज व्हा, भारताच्या या राज्यात सुरु होत आहे आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी; जाणून घ्या काय असेल खास…

परींची पूजा केली जाते

या पऱ्या गावाचे रक्षण करतात असा स्थानिकांचा समज आहे. येथे परिंचे एक मंदिर देखील आहे जिथे परीची पूजा केली जाते. हे मंदिर अजूनही गूढतेने भरलेले आहे. तुम्हालाह जर या ठिकाणी जायचे असेल तर तुम्ही ऋषिकेशहून खाजगी गाडीने तेहरी गढवाल जिल्ह्यातील फेगुलीपट्टी या गावी जाऊ शकता. येथून तुम्ही चालत जाऊन खैत पर्वतावर पोहोचू शकता. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १०,००० फूट उंचीवर आहे. येथे आल्यावर तुम्हाला एक वेगळीच शांती जाणवेल. पर्वतांवरील परींना अछारी असे म्हटले जाते.

Web Title: Do you know fairyland of uttarakhand travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 08:40 AM

Topics:  

  • travel news
  • travel tips
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

ऐतिहासिक वारसा आणि अप्रतिम सौंदर्य! हंपीच्या सहलीचे नियोजन करताय? ‘हा’ सोपा टूर प्लॅन येईल कामी
1

ऐतिहासिक वारसा आणि अप्रतिम सौंदर्य! हंपीच्या सहलीचे नियोजन करताय? ‘हा’ सोपा टूर प्लॅन येईल कामी

Travel News : पार्टनरच्या मृत्यूनंतरही त्याच्याशी करू शकता लग्न, जगातील ही देशांचे नियम ऐकून तुम्हीही व्हाल हैराण
2

Travel News : पार्टनरच्या मृत्यूनंतरही त्याच्याशी करू शकता लग्न, जगातील ही देशांचे नियम ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

समुद्राच्या मध्यभागी वसलेले हे रिसॉर्ट पाहून वाटते जणू धर्तीवर आलाय UFO, कुठे आहे ते जाणून घ्या
3

समुद्राच्या मध्यभागी वसलेले हे रिसॉर्ट पाहून वाटते जणू धर्तीवर आलाय UFO, कुठे आहे ते जाणून घ्या

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी
4

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.