Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bun Dosa : साऊथ इंडियन फूड खायला आवडत असेल तर हा ‘बन डोसा’ तुम्ही एकदा नक्की ट्राय करायला हवा

Breakfast Recipe : इडलीसारखा दिसणारा हा मसालेदार आणि स्वादिष्ट चवीचा बन डोसा सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तोच तोच डोसा नव्हे तर यंदा घरी ट्राय करा दक्षिण भारताचा फेमस 'बन डोसा'.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 12, 2025 | 09:55 AM
Bun Dosa : साऊथ इंडियन फूड खायला आवडत असेल तर हा 'बन डोसा' तुम्ही एकदा नक्की ट्राय करायला हवा

Bun Dosa : साऊथ इंडियन फूड खायला आवडत असेल तर हा 'बन डोसा' तुम्ही एकदा नक्की ट्राय करायला हवा

Follow Us
Follow Us:
  • साऊथ इंडियन फूड नाश्त्यासाठी फेमस आहे
  • डोसा अनेकांच्या आवडीचा आहे
  • बन डोसा या पदार्थाला इंडियन पॅनकेक देखील म्हटले जाऊ शकते
दक्षिण भारतीय पाककृतींचे जग जितके रंगीबेरंगी तितकेच स्वादिष्टही आहे. इडली, डोसा, उत्तप्पा, वडा–या सर्व ओळखीच्या पदार्थांच्या पलीकडे काही असे पदार्थ आहेत जे चविष्टही आहेत आणि वेगळेही. अशाच पदार्थांपैकी एक म्हणजे बन डोसा. नाव ऐकताना क्षणभर गोंधळ व्हायला होतो, “बन्स” म्हणजे तुळू/कर्नाटकात प्रसिद्ध असलेला गोड पुरीसारखा पदार्थ आणि “डोसा” म्हणजे कुरकुरीत दक्षिण भारतीय पॅनकेक. पण बन्स डोसा ही एक वेगळीच क्रिएशन आहे. स्पंजी, जाडसर आणि किंचित गोडसर चवीचा हा डोसा सर्वांना अगदी पहिल्याच घासात भुरळ घालतो.

Recipe : हिवाळ्यात घरी बनवा शेवग्याच्या शेंगाचं पौष्टिक सूप; थंडीत शरीराला मिळवून देईल अनेक फायदे

कर्नाटकातील उडुपी आणि मंगलोर या भागात हा पदार्थ खूप लोकप्रिय आहे. बनानाचा हलका गोडवा, दह्याची मऊसर टेक्स्चर आणि रव्याचा हलका कुरकुरीतपणाहे तिन्ही मिळून हा डोसा नाश्‍त्याला किंवा संध्याकाळच्या स्नॅक्सला अगदी परफेक्ट बनवतात. नेहमीच्या डोश्यापेक्षा हा डोसा बनवायला जास्त सोपा, सुलभ आणि पटकन तयार होणारा आहे, शिवाय त्यासाठी आंबवणीचीही गरज नसते. म्हणूनच घरात कमी वेळात, कमी साहित्य वापरून काहीतरी वेगळं आणि टेस्टी बनवायचं असल्यास बन डोसा हा एकदम योग्य पर्याय! चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य 

  • रवा
  • दही
  • पाणी
  • बारीक चिरलेला कांदा
  • हिरवी मिरची
  • कढीपत्ता
  • मोहरी
  • जिरे
  • हिंग
  • कोथिंबीर
  • मीठ
  • तांदळाचे पीठ
  • बेकिंग सोडा
Winter Recipe: वाढत्या थंडीत गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा कुरकुरीत ताजे मटार नगेट्स, लहान मुलं खातील आवडीने

कृती 

  • यासाठी सर्वप्रथम रवा, दही आणि पाणी एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. हे पीठ इडलीच्या पिठासारखे (पण थोडे पातळ) असावे.
  •  एका छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, चिरलेली मिरची आणि कढीपत्ता टाका. नंतर कांदा घालून परता आणि कोथिंबीर घाला.
  •  ही फोडणी वाटलेल्या पिठात घाला. चवीनुसार मीठ आणि तांदळाचे पीठ (आवश्यक असल्यास) मिसळा.
  • पीठ हलके होईपर्यंत चांगले फेटा. बेकिंग सोडा घालून मिक्स करा.
  • गॅसवर फोडणीच खोलगट भांड ठेवा अथवा तवा ठेवून त्यात पीठ टाकून जाडसर डोसा बनवून घ्या.
  • मध्यम आचेवर डोश्याला छान शिजवून एका प्लेटमध्ये काढून घ्या.
  • गरमागरम बन डोसा नारळाच्या चटणी किंवा इतर कोणत्याही चटणीसोबत सर्व्ह करा.
  • हा झटपट होणारा आणि पौष्टिक नाश्ता आहे.

Web Title: Do you know how to make south indian special breakfast bun dosa note the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 09:54 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • marathi recipe
  • south Indian dish

संबंधित बातम्या

Breakfast Tips: सकाळी उठल्यानंतर किती वेळाने नाश्ता करायला हवा? तज्ज्ञांनी दिला सल्ला!
1

Breakfast Tips: सकाळी उठल्यानंतर किती वेळाने नाश्ता करायला हवा? तज्ज्ञांनी दिला सल्ला!

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.