वाढत्या थंडीत गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा कुरकुरीत ताजे मटार नगेट्स
राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात पालेभाज्या, गाजर आणि हिरवे मटार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. मटार पनीर, मटार भाजी, मटार टिक्की इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ मटारपासून बनवले जातात. पण कायमच मटारपासून तेच ठराविक पदार्थ खाण्याचा कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यात किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी मटार नगेट्स बनवू शकता. यापूर्वी तुम्ही मिक्स भाज्यांचे किंवा चिकन नगेट्स खाल्लेले असतील. संध्याकाळच्या वेळी सगळ्यांचं खूप जास्त भूक लागते. भूक लागल्यानंतर कायमच बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्लेले जातात. पण नेहमीच विकतचे पदार्थ आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. मटार नगेट्स तुम्ही सॉस किंवा आंबटगोड हिरव्या चटणीसबात सुद्धा खाऊ शकता. घरी बनवलेले मटार नगेट्स पाहून लहान मुलं खूप जास्त खुश होतील. चला तर जाणून घेऊया मटार नगेट्स बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)
Recipe : हिवाळ्याच्या थंडीपासून स्वतःचे संरक्षण करा, संपूर्ण कुटुंबासाठी बनवा आलं-हळदीचं हे दूध!






