जे जे रुग्णालयातील डॉक्टरांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवलीच
नीता परब: राज्य सरकारच्या अंतर्गत येत असलेले सर जेजे रुग्णालय १८० व्या वर्धापनदिनानिमित्त दिवसेंदिवस नवीन टप्पे गाठत आहे. या पार्श्वभूमीवर, रुग्णालयाच्या अस्थिव्यंग विभागाने दहा वर्षांपासून वेदनांनी त्रस्त असलेल्या एका महिलेला दिलासा दिला आहे. सदर महिला वेदनेमुळे गेल्या 5 वर्षांपासून आधाराशिवाय चालता येत नव्हते, ज्यामुळे त्यांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पण रुग्णालयाच्या असि्थव्यंग विभागाचे प्रमुख डाॅ. नादिर शाह व त्यांच्या टिमने दाेन्ही गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करत महिलेला वेदनांपासून आराम मिळाला व ती तब्बल पाच वर्षानंतर व्यवस्थित चालू लागली आहे.
मुंबई बाहेर स्थायिक असलेली ५१ वर्षीय शेवंता सोनावणे यांना १० वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास होता. इतकेच नाही तर गेल्या पाच वर्षांपासून त्यांना आधारािशवाय चालता येत नव्हते. त्यांची परिस्थिती इतकी बिकट झाली की गेल्या ६ महिन्यांपासून त्या अंथरुणाला खिळून हाेत्या आणि मागील २ महिन्यांपूर्वी झालेल्या दुखापतीमुळे त्यांचा उजवा गुडघा प्रॉक्सिमल टिबिया देखील फ्रॅक्चर झाला.
Corona: लॉकडाऊन दरम्यान ऋजुता दिवेकरने दिला होता परफेक्ट डाएट प्लॅन, प्रतिकारशक्ती वाढेल पटकन
शेवंता साेनावणे यांनी सांगितले की,”त्यांनी त्या राहत असलेल्या घरा नजीक बऱ्याच डाॅक्टरांकडे गुडघेदुखीबाबत उपचार केले हाेते पण वेदनेपासून आराम मिळत नव्हता, अखेर स्थानिक डाॅक्टरांनी जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी सुचवले, व रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. विविध तपासण्या झाल्यानंतर गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्यामुळे आता चालण्यास काहीही त्रास हाेत नाहीये.
अस्थिव्यंग विभागाचे प्रमुख नादिर शाह म्हणाले की,”त्यांनी त्यांच्या गुडघ्यांची तपासणी केली. या तपासणीनंतर गुडघे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. नादिर शहा सांगतात, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार आणि रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रथम डाव्या गुडघ्याच्या ऑस्टियोआर्थरायटिससाठी शस्त्रक्रिया केली आणि संपूर्ण डावा गुडघा बदलण्यात आला. त्यानंतर एका आठवड्याने उजवा गुडघा देखील बदलण्यात आला.
मुलांच्या आरोग्याला मिळू शकते बळ, वेळीच कुषोषणाला घाला आळा; काय घ्यावी काळजी
डॉ. नादिर शहा म्हणाले की, “जेव्हा ती महिला पहिल्यांदा तपासणीसाठी आली तेव्हा तिचे दोन्ही पाय वाकलेले होते. हा एक दुर्मिळ प्रकार हाेता. या वाकलेल्या पायांमध्ये दोन्ही गुडघे बदलून त्यांना सरळ करणे खूप आव्हानात्मक होते. गेल्या १२ वर्षांत त्यांनी अशी दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्याची ही दुसरी वेळ आहे. दोन्ही गुडघे बदलल्यानंतर, तिचे पाय सरळ झाले आहेत आणि आता ती आधाराशिवाय चालू शकते.
डॉ. नादिर शाह म्हणाले की, खाजगी रुग्णालयांमध्ये अशा शस्त्रक्रियेचा खर्च १० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. परंतु जेजे रुग्णालयात माेफत करण्यात आली आहे. त्यांनी माहिती दिली की, शस्त्रक्रियेसाठी राज्य सरकारची महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य विमा योजना लागू करण्यात आली आहे. संपूर्ण खर्च या योजनेद्वारे करण्यात आला आहे.