Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डायबिटीजला पळवून टाकेल ही 20 रुपयांची भाजी; आठवड्यातील फक्त 4 दिवस सेवन करा; स्वतः डॉक्तरांनी दिलाय सल्ला

डायबिटीज रुग्णांसाठी आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे फार गरजेचे असते. आज आम्ही तुम्हाला एका अशा भाजीची माहिती सांगत आहोत जिचे आयुर्वेदात आणि आधुनिक शास्त्रात अनेक फायदे सांगण्यात आले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 23, 2025 | 01:15 PM
मधुमेह नियंत्रित करण्यापासून ते हाडांच्या मजबुतीपर्यंत तोंडलीच्या भाजीचे आहेत अनेक फायदे

मधुमेह नियंत्रित करण्यापासून ते हाडांच्या मजबुतीपर्यंत तोंडलीच्या भाजीचे आहेत अनेक फायदे

Follow Us
Close
Follow Us:

बिघडती जीवनशैली आणि वातावरणातील बदल यामुळे अनेकजण आजकाल कमी वयातच अनेक आजारांनी ग्रासलेले आहेत. काही आजार असे असतात ज्यांवर उपचार केले जाऊ शकतात पण काही असे असतात ज्यांवर कोणतेही उपचार केले जाऊ शकत नाहीत आणि यापैकीच एक गंभीर आणि वाढत चाललेला आजरा म्हणजे मधुमेह. मधुमेह ही एक अशी स्थिती आहे ज्यात शरीरातील रक्तातील साखरेची (ग्लुकोजची) पातळी वाढते, कारण स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा शरीर तयार केलेल्या इन्सुलिनचा प्रभावीपणे वापर करू शकत नाही.

Constipation: सकाळीच पोटात शौच राहतेय चिकटून, Potty Problems होईल झटक्यात दूर; ‘हा’ पदार्थ खाण्याचा डाएटिशियनचा सल्ला

मधुमेहाच्या रुग्णांना आपल्या आरोग्याची खास काळजी घ्यावी लागते घ्यावी लागते कारण साखरेची पातळी जरा जरी वाढली तर त्यांना गंभीर आजार होण्याची शक्यता असते. अनेकदा यामुळे जीवाचा धोकाही निर्माण होतो. अशातच आज आम्ही तुम्हाला मधुमेहाच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी एका खास भाजीची माहिती देत आहोत जिच्या सेवनाने तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवू शकता. तुम्हाला यासाठी फार काही करण्याची गरज नाही फक्त नियमितपणे या भाजीचे सेवन करायचे आहे. ही भाजी आकाराने छोटी, हिरवी आणि साधी वाटते पण आयुर्वेदात आणि आधुनिक शास्त्रात या भाजीत अनेक पोषक घटक दडलेले आढळून आले आहे जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकतात. या भाजीचे नाव आहे तोंडली. बाजारात ही भाजी सहज फार कमी ददरात उपलब्ध होते ज्यामुळे आपल्या रोजच्या आहारात सहजपणे तुम्ही हिचा समावेश करू शकता.

रक्तातील साखर नियंत्रणात होईल

तोंडलीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात जे रक्तातील साखरेची पातळी वेगाने कमी करण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी विशेष करून ही भाजी फार फायद्याची ठरते. आयुर्वेदातही या भाजीला फार महत्त्व देण्यात आलं आहे.

पचनसंस्था मजबूत करते

अनेकदा चुकीच्या आहारामुळे शरीरात अपचन, पोटफुगी आणि आम्लपित्ताची समस्या जाणवू लागते. अशात तोंडलीतील तंतुमय घटक या आरोग्य समस्या दूर करण्यास मदत करतात. नियमित या भाजीचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळतो. एवढेच काय तर यामुळे आपल्या त्वचेवरही नैसर्गिक तेज पाहायला मिळतो.

वजन कमी करण्यास मदत करते

आजकाल लठ्ठपणा हा अनेकांना जडणारा सामान्य आजार बनला आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुम्ही तोंडलीच्या भाजीचे सेवन करू शकता. यामध्ये कमी कॅलरीज असतात आणि याचे सेवन अधिक काळ पोट भरलेले ठेवते ज्यामुळे वजन कमी करण्यास त्याची खास मदत होते. पण लक्षात ठेवा, वजन कमी करण्यासाठी फक्त भाजीचे सेवन पुरेसे नाही तर त्यासोबतच व्यायाम देखील तितकाच महत्त्वाचा आहे.

हाडांना आणि रोगप्रतिकारक शक्तीला बळ

तोंडलीमध्ये कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन सी सारख्या पोषक घटकांचा साठा आहे, जे दात आणि हाडे मजबूत करण्यास मदत करतात. कमकुवत होत चाललेली हाडे या भाजीच्या सेवनाने पुन्हा मजबूत करता येतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते ज्यामुळे शरीराचे कोणत्याही संसर्गांपासून संरक्षण होते. पावसाळ्यात याचे सेवन अनेक आजरापासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करते.

शरीर शुद्ध करणारी गुणकारी भाजी

आपल्या शरीरात अनेक विषारी द्रवपदार्थ साठत असतात ज्यांना शरीराबाहेर काढण्यात तोंडलीची भाजी आपली मदत करते. बॉडी डिटॉक्ससाठी याचे सेवन फायद्याचे आहे. यामुळे किडनीचे आरोग्य सुधारते आणि शरीर स्वछ होते. हे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासही मदत करते.

हाडांना हळूहळू ठिसूळ बनवतात हे 5 पदार्थ; निरोगी हाडांसाठी आजपासूनच त्यांना करा आहारातून बेदखल

FAQs (संबंधित प्रश्न)

तोंडलीचे सेवन कसे करावे?
तुम्ही तोंडलीची भाजी करून किंवा याला मसाल्यात कोट करून छान कुरकुरीत तळून याचे सेवन करू शकता. तुम्ही मसाले भातातही तोंडली टाकू शकता.

तोंडली किती दिवस फ्रेश राहते?
तोंडलीच्या भाजीला फ्रिजमध्ये ६-८ दिवसांपर्यंत फ्रेश ठेवता येते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: From controlling diabetes to strengthening bones ivy gourd or tondli have so many benefits to body lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • diabetes
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

तोंडाची दुर्गंधी चारचौघात लाज आणते? मग आजच स्वयंपाकघरातील या 2 रुपयांच्या पदार्थाचे सेवन सुरु करा आणि कमाल पहा
1

तोंडाची दुर्गंधी चारचौघात लाज आणते? मग आजच स्वयंपाकघरातील या 2 रुपयांच्या पदार्थाचे सेवन सुरु करा आणि कमाल पहा

Breast Cancer Awareness Month : कृत्रिम बुद्धिमत्ता स्तनाच्या कर्कराेगावर ठरणार वरदान! कसे असणार नवे तंत्रज्ञान?
2

Breast Cancer Awareness Month : कृत्रिम बुद्धिमत्ता स्तनाच्या कर्कराेगावर ठरणार वरदान! कसे असणार नवे तंत्रज्ञान?

Idli-Sambhar History:  इडली-सांबार दक्षिण भारताचा पदार्थ नाही; मग कुठून आली इडली, संभाजी महाराजांशी आहे खास कनेक्शन?
3

Idli-Sambhar History: इडली-सांबार दक्षिण भारताचा पदार्थ नाही; मग कुठून आली इडली, संभाजी महाराजांशी आहे खास कनेक्शन?

World Mental Health Day 2025: शांतताप्रिय आयुष्यासाठी लाऊन घ्या 5 सवयी, मानसिक आरोग्य राहील उत्तम
4

World Mental Health Day 2025: शांतताप्रिय आयुष्यासाठी लाऊन घ्या 5 सवयी, मानसिक आरोग्य राहील उत्तम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.