Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंड्याचे सेवन केल्यास शरीरात कोलेस्ट्रॉल वाढते का? जाणून घ्या अंडी खाण्याची योग्य पद्धत आणि फायदे

अंडी खाल्ल्यामुळे शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यास मदत होते. पण टाईप २ मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात अंड्याच्या आतील पिवळ्या भागाचे अजिबात सेवन करू नये. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 01, 2026 | 05:30 AM
अंड्याचे सेवन केल्यास शरीरात कोलेस्ट्रॉल वाढते का? जाणून घ्या अंडी खाण्याची योग्य पद्धत आणि फायदे

अंड्याचे सेवन केल्यास शरीरात कोलेस्ट्रॉल वाढते का? जाणून घ्या अंडी खाण्याची योग्य पद्धत आणि फायदे

Follow Us
Close
Follow Us:

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता आणि अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. रोजच्या आहारात सतत तिखट, मसालेदार आणि अतितेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात चरबीचे प्रमाण वाढू लागते. रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेल्या चरबीमुळे हृदयाचे आरोग्य बिघडून जाते. खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेला कोलेस्ट्रॉलचा चिकट थर रक्तप्रवाहात अडथळे निर्माण करतो. ज्यामुळे शरीराला आणि हृदयाला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याची जास्त शक्यता असते. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर बऱ्याचदा अंड खाऊ नये, असा सल्ला दिला जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अंड्याचे सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढते का? अंडी खाण्याचे फायदे? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)

वय फक्त आकडा! ५० नंतरही फिट आणि तरुण राहायचंय? मग आजच शरीराला लावून घ्या या निरोगी स(फोटो सौजन्य – istock)
वयी

शरीरात ८० टक्के कोलेस्ट्रॉल लिव्हर तयार करते. अन्नातून जास्त कोलेस्ट्रॉल घेतो, तेव्हा लिव्हर नैसर्गिकरित्या त्याचे स्वतःचे उत्पादन कमी करून टाकतो. त्यामुळे नियमित खाल्लेल्या अन्नपदार्थांचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. त्यामुळे अंडी खाल्ल्यामुळे शरीरात कोणत्याही प्रकारचे कोलेस्ट्रॉल वाढत नाही. कोलेस्ट्रॉल वाढण्याचा आणि अंडी खाण्याचा काहीच संबंध नाही. नियमित अंडी खाल्ल्यामुळे शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येतात. अंड्यांमध्ये असलेले घटक शरीरात कॅल्शियम आणि इतर पोषक घटकांची पातळी वाढवतात. अंड खाल्ल्यामुळे शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने वाढवते.

एचडीएल कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमधील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकते आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात नियमित एक उकडलेले अंड खावे. तसेच अंडी शिजवण्याची प्रक्रिया शरीरात कोलेस्ट्रॉल वाढवते. त्यामुळे योग्य पद्धतीने अंडी शिजवावी. अंडी शिजवल्यानंतर त्याच्या आतील पिवळा रंगाचा भाग अजिबात खाऊ नये. यामध्ये असलेले सॅच्युरेटेड फॅट्स खराब कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने वाढवतात आणि शरीराला हानी पोहचवतात. त्यामुळे अंडी कायमच शिजवून किंवा कमीत कमी तेलाचा वापर करून बनवावी. तसेच टाईप २ मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांनी अंड्याचे सेवन करणे टाळावे. यामुळे हृद्यासंबंधित आजाराचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे अशा लोकांनी अंड्याचे सेवन तीन किंवा चार आठवड्यातून एकदा करावे. जास्त अंडी खाऊ नये.

अपुऱ्या झोपेमुळे महिलांच्या हार्मोन्स आणि ओव्ह्युलेशनवर होतो गंभीर परिणाम; जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेला धक्कादायक इशारा

कोलेस्ट्रॉलची भीतीने अंड्याचे सेवन करणे टाळू नये. अंड्यामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे मेंदूच्या पेशी निरोगी राहण्यास मदत होते. याशिवाय डोळे आणि शरीरसंबंधित इतर अवयवांचे कार्य सुरळीत चालू ठेवण्यासाठी अंड्याचे सेवन करावे. वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शरीराचे कार्य सुधारण्यासाठी उकडलेली अंडी खावी. यामुळे तुमचे आरोग्य चांगले आणि निरोगी राहील. उच्च कोलेस्ट्रॉल किंवा हृदयविकाराचा त्रास असल्यास अंड्याच्या आतील पिवळा भाग अजिबात खाऊ नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Does consuming eggs increase cholesterol in the body know the right method and benefits of eating eggs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • cholesterol symptoms
  • Egg

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.