Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हामुळे सतत डोकेदुखीचा त्रास होतो? मग पेनकिलरच्या गोळ्या घेण्याऐवजी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, तात्काळ मिळेल आराम

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर डोकं दुखत. डोकं दुखल्यानंतर कोणत्याही पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 31, 2026 | 08:49 AM
उन्हामुळे सतत डोकेदुखीचा त्रास होतो? मग पेनकिलरच्या गोळ्या घेण्याऐवजी करून पहा 'हे' घरगुती उपाय

उन्हामुळे सतत डोकेदुखीचा त्रास होतो? मग पेनकिलरच्या गोळ्या घेण्याऐवजी करून पहा 'हे' घरगुती उपाय

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळ्यात वारंवार डोकं का दुखत?
डोकेदुखीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी उपाय?
कडक उन्हाळ्यात आरोग्याची कशी काळजी घ्यावी?

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. वाढत्या उष्णतेमुळे अपचनाच्या त्रासासोबतच डोकेदुखीची समस्या उद्भवते. उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर खूप जास्त थकल्यासारखे वाटते. घामावाटे शरीरातील पाणी बाहेर पडून गेल्यानंतर खूप जास्त अशक्तपणा येतो आणि खूप जास्त थकल्यासारखे वाटते. या दिवसांमध्ये कष्टाची कामे जास्त वेळ केल्यास शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. डिहायड्रेशन, थकवा, अशक्तपणा वाढल्यानंतर काहीवेळा डोकेदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे उन्हाळ्यात वाढलेल्या डोकेदुखीच्या त्रासाकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. डोकेदुखीची समस्या उद्भवल्यानंतर अनेक लोक मेडिकलमध्ये जाऊन पेनकिलरच्या गोळ्या घेतात. पण पेनकिलरच्या गोळ्या खाल्ल्यामुळे किडनीवर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डोकेदुखीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

ओटीपोटात कायमच तीव्र वेदना जाणवतात? अंडाशयाच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ मोठे बदल

डोकेदुखीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डोकेदुखीचा त्रास सगळ्यांचं होतो. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे डोकेदुखीची समस्या उद्भवते. सतत डोकं दुखल्यामुळे खूप जास्त चिडचिड आणि थकवा आल्यासारखे वाटते. त्यामुळे दिवसभरात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते आणि डोकेदुखीच्या त्रासापासून सुटका मिळते. पाण्यासोबतच ताक, लिंबूपाणी, नारळपाणी यांसारख्या शरीर थंड ठेवणाऱ्या पेयांचे सेवन करावे. या पेयांच्या सेवनामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि आरोग्य सुधारते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर मेंदूवर जास्तीचा तणाव येतो. यामुळे डोकं दुखण्यास सुरुवात होते. त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवणे फार आवश्यक आहे.

डोकेदुखी वाढल्यास कपाळावर थंड पट्टी ठेवावी. थंड पाण्यात रुमाल भिजवून त्यातील पाणी काढून कपाळावर थंड पट्टी ठेवावी. यामुळे शरीराचे वाढलेले तापमान कमी होण्यास मदत होते. तसेच डोक्यावर थंडावा टिकवून ठेवण्यासाठी गुलाब पाणी किंवा चंदनाचा लेप कपाळावर लावावा. यामुळे डोकेदुखीच्या वेदना कमी होण्यास मदत होते. तसेच डोकं दुखल्यानंतर कायमच पेनकिलरच्या गोळ्या खाणे गरजेचे नाही. त्याऐवजी तेल कोमट गरम करून डोक्यावर हलक्या हाताने मसाज करावा. मसाज केल्यामुळे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. याशिवाय खूप जास्त डोकेदुखी वाढल्यास गरम वातावरणात काहीवेळ शांत, थंड जागेत बसून डोळे बंद करून शांत विश्रांती घ्यावी.

तोंडातील जखमेकडे दुर्लक्ष नको; ‘ही’ आहेत Head Neck Cancer ची सुरुवातीची लक्षणे

दैनंदिन आहाराचा थेट परिणाम शरीरावर होतो. आहारात तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे अपचनाची समस्या उद्भवते. खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे डोकेदुखी किंवा उलट्या, मळमळ होऊन आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये पचनास हलके आणि शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. आहारात काकडी, कलिंगड, हंगामी फळे आणि पालेभाज्यांचा समावेश करावा. याशिवाय कडक उन्हात कुठेही बाहेर जाताना टोपी, स्कार्फ किंवा छत्रीचा वापर केल्यास सूर्याच्या झळांपासून बचाव होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोकेदुखी का होते?

    Ans: पुरेसे पाणी न पिणे, अयोग्य झोप किंवा ताणलेले स्नायू

  • Que: डोकेदुखीचे घरगुती उपाय काय आहेत?

    Ans: कपाळावर किंवा मानेवर थंड पट्टी ठेवा, डोके आणि मानेला हलक्या हाताने मसाज करा.

  • Que: सकाळी उठल्यावर डोकेदुखी का होते?

    Ans: चुकीच्या स्थितीमध्ये (Posture) झोपणे, निद्रानाश (Insomnia) किंवा झोपेत श्वास थांबणे.

Web Title: Does the sun cause constant headaches then instead of taking painkiller pills try these home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 08:49 AM

Topics:  

  • Headache pain
  • summer care tips
  • summer heat

संबंधित बातम्या

वाढत्या तापमानात “या” टिप्स ठरतील तुमच्या कारसाठी उपयोगी
1

वाढत्या तापमानात “या” टिप्स ठरतील तुमच्या कारसाठी उपयोगी

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल
2

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.