Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dog Odor Removal Tips: तुमच्या टॉमीच्या अंगाला ही दुर्गंध येतो का? मग हे घरगुती उपाय करुन पहाच

पाळीव प्राण्यांचा अंगांचा विशिष्ट असा घाणेरडा वास येत असतो. त्यामुळे आपल्याला या प्राण्यांच्या अंगाला येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी काय घरगुती उपाय करावेत ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 17, 2025 | 05:19 PM
Dog Odor Removal Tips: तुमच्या टॉमीच्या अंगाला ही दुर्गंध येतो का? मग हे घरगुती उपाय करुन पहाच

Dog Odor Removal Tips: तुमच्या टॉमीच्या अंगाला ही दुर्गंध येतो का? मग हे घरगुती उपाय करुन पहाच

Follow Us
Close
Follow Us:

अनेकांच्या घरात पाळीव कुत्रा असतो. खरंतर पाळलेला असला तरी तो घरच्या सदस्यांइतकाच महत्त्वाचा असतो. पाळीव प्राण्यांना घरातील कुटुंबाकडून प्रेम मिळत असलं तरी त्यांची तितकी काळजी देखील घेणं गरजेचं आहे. पाळीव प्राण्यांचा अंगांचा विशिष्ट असा घाणेरडा वास येत असतो. त्यामुळे आपल्याला या प्राण्यांच्या अंगाला येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी काय घरगुती उपाय करावेत ते जाणून घेऊयात.

पाळलेला असो रस्त्यावरचे कुत्र्यांच्या शरीरातील काही हार्मोन्समुळे किंवा सतत अस्वच्छ ठिकाणी राहत असल्याने त्यांना अनेकदा त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होतात त्यामुळे त्यांच्या अंगाला घाण वास येतो. कुत्र्यांमध्ये दुर्गंधी येणे हे सहसा घाण, ओलावा किंवा त्वचेच्या समस्यांमुळे होते. यामुळे अनेकदा या प्राण्यांच्या दुर्गंधीमुळे कुटुंबातील सदस्यांना देखील त्रास होतो. यावर घरगुती उपाय काय करता येतील याबाबत .अ‍ॅनिमलमेडसेंटरच्या तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय

अ‍ॅनिमलमेडसेंटरच्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पाळीव प्राण्यांना शक्य तितकं स्वच्छ ठेवावं. त्यांना अस्वच्छ ठेवल्यास सगळ्यात जास्त त्रास हा कुटुंबातील व्यक्तींनाच मोठ्य़ा प्रमाणात होतो. पाळीव कुत्र्यांना नियमितपणे आंघोळ घालणे खूप महत्वाचे आहे. बाजारात पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक गरजेच्या वस्तू उपलब्ध आहेत. कुत्र्यांच्या स्वच्छतेसाठी शाम्पू वापरा.जर कुत्र्याची त्वचा संवेदनशील असेल तर ओटमीलयुक्त शाम्पू वापरा. कुत्र्यांच्य़ा केसांत ओलावा राहिल्याने दुर्गंध जास्त येतो. त्यामुळे कुत्र्यांना अंघोळ घातल्यानंतर लगेच कोरडं करा.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा वापर

कुत्र्यांच्या त्वचेचा दुर्गंध कमी करण्यासाठी अ‍ॅपल सायडर व्हिनेगर देखील तुम्ही वापरु शकता. एक कप पाण्यात एक चमचा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिसळा आणि ते स्प्रे बाटलीत भरा. कुत्र्याच्या केसांवर हलके स्प्रे करा आणि ते कोरडे होऊ द्या. यामुळे दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.

कुत्र्यांच्या संबंधित

काही कुटुंब कुत्र्यांची विशेष काळजी घेतात. जसं की कुत्र्यांना झोपायला वेगळा बेड वगैरे असणं. जर तुमच्याही कुत्र्यांना झोपायला वेगळा बेड असेल तर आठवड्यातून एकदा तरी त्याला स्वच्छ करा. बॅक्टेरिया आणि ओलावा दूर करण्यासाठी बेड उन्हात वाळवा.

 

संतुलित आहार द्या

त्वचेच्या आणि केसांच्या दुर्गंधी दूर करण्यासाठी कुत्र्यांच्या आहारावर विशेष लक्ष द्या. त्यांना उच्च दर्जाचे अन्न द्या आणि आहारात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असलेले अन्न समाविष्ट करा. यामुळे केस आणि त्वचा निरोगी राहते.

ब्रशिंग आवश्यक आहे-
आठवड्यातून 2 ते 5 वेळा कुत्र्याच्या केसांवर ब्रश फिरवणे आवश्यक आहे. असे केल्याने, नैसर्गिक तेल योग्यरित्या वितरित होते आणि मृत फर काढून टाकली जाते.

कडुलिंबाचे तेल किंवा कोरफडीचा गर

कडुलिंबाचे तेल हे जंतूनाशक आहे. कडुलिंबाचे तेल किंवा कोरफडीचा गर त्वचेच्या समस्या दूर करतं. कडुलिंबाच्या तेल ते कुत्र्याच्या केसांवर लावा. तुम्ही कोरफडीचे जेल देखील वापरू शकता, ज्यामुळे त्वचेचा दाह कमी होतो. कान, दात आणि नखे यांच्या स्वच्छतेकडे देखील लक्ष द्या, कारण या ठिकाणांमुळे देखील वास येऊ शकतो.कुत्र्याला नियमितपणे ब्रश करा, जेणेकरून केसांमधील घाण, केस आणि मृत त्वचा निघून जाईल.जर एवढ करुनही बराच काळ वास टिकत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Does your dog have a bad odor try these effective home remedies in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 05:19 PM

Topics:  

  • Dog
  • health
  • lifestlye tips

संबंधित बातम्या

नसांमध्ये वाढू लागेल रक्त आणि हिमोग्लोबिन, रोज खा ‘हे’ पदार्थ, दूर होईल Iron ची कमतरता
1

नसांमध्ये वाढू लागेल रक्त आणि हिमोग्लोबिन, रोज खा ‘हे’ पदार्थ, दूर होईल Iron ची कमतरता

भात खाल्याने आरोग्य बिघडतंं का ? भात कोणी आणि किती खावा, काय सांगतात आरोग्यतज्ज्ञ ?
2

भात खाल्याने आरोग्य बिघडतंं का ? भात कोणी आणि किती खावा, काय सांगतात आरोग्यतज्ज्ञ ?

CML आजार म्हणजे नक्की काय? भारतीय रुग्णांना ‘या’ गोष्टी माहीत असायलाच हव्यात
3

CML आजार म्हणजे नक्की काय? भारतीय रुग्णांना ‘या’ गोष्टी माहीत असायलाच हव्यात

अनेक आजार एक उपाय; शारीरिक व्याधींवर असा करा कापूरचा रामबाण उपाय
4

अनेक आजार एक उपाय; शारीरिक व्याधींवर असा करा कापूरचा रामबाण उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.