
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन याला स्कोलियोसिस म्हणजेच मणक्याशी संबंधित आजार आहे. यासोबतच त्यांना स्टॅमरिंग हीही एक सामान्य समस्या आहे. या आजारांमुळे अनेक वेळा शरीराचे काही अवयव ठरावीक काळासाठी नीट काम करत नाहीत.
हृतिकने शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये तो स्टिकच्या आधाराने उभा असल्याचे दिसतो. त्या फोटोमध्ये त्याचा डावा पाय काम करत नव्हता, त्यामुळेच त्याला स्टिकचा आधार घ्यावा लागला.
स्वतः हृतिक रोशनने त्याच्या आजाराबद्दल विनोदी पद्धतीने सांगितले आहे. पण त्याच्या विनोदी ओळींमागे लपलेले वेदना आणि दुःख स्पष्ट आहे. अलिकडेच, त्याने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने त्याच्या बालपणीच्या आजाराबद्दल आणि त्याच्याशी झुंजणाऱ्या आयुष्याबद्दल सांगितले.
ऋतिक रोशनने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मला अनेकदा आधाराची गरज भासते. कधी डावा गुडघा साथ देत नाही, तर कधी उजवा. आता मला वाटतं की हेच माझं ‘न्यू नॉर्मल’ आहे. या काठीने मला असे अनेक अनुभव दिले आहेत, जे प्रत्येकाला सहज मिळत नाहीत.”
त्यांनी पुढे लिहिले की, “कधी कधी माझी जीभ ‘डिनर’सारखा शब्द उच्चारायलाच नकार देते. जरा कल्पना करा, मी एखाद्या शूटदरम्यान आहे आणि माझा डायलॉग आहे — ‘तुम्ही डिनरसाठी घरी याल का?’ पण त्या क्षणी माझी जीभ ‘डिनर’ म्हणायलाच तयार होत नाही. अशावेळी मी थोडी हुशारी दाखवतो आणि समोरच्याला ‘लंच’साठीच आमंत्रित करतो.”
ऋतिक रोशनने आपल्या पोस्टमध्ये आजाराशी संबंधित अनेक गंभीर गोष्टी शेअर केल्या आहेत. मात्र, ही माहिती सांगण्याची त्यांची पद्धत खूपच कॅज्युअल होती. अगदी मजेशीर अंदाजात त्यांनी आपल्या रोजच्या आयुष्यातील त्रास आणि अडचणी अतिशय सहजपणे मांडल्या आहेत.
हृतिक रोशनला लहानपणापासूनच तोतरेपणाचा (स्टॅमरिंग) त्रास होता. शाळेत इतर मुले त्याची चेष्टा करायची. त्यामुळे तो वर्गात प्रश्नांची उत्तरे देताना अनेकदा घाबरायचा. तो अनेक वेळा रडत रडत घरी यायचा.
हृतिकचे वडील राकेश रोशन सांगतात की, एकदा तर तो बाथरूममध्ये स्वतःला कोंडून घेऊन रडत होता. त्या काळात हृतिकला असं वाटायचं की तो कधीच बोलू शकणार नाही. मात्र, एवढ्या अडचणी असूनही हृतिकने कधीही हार मानली नाही.
The 50 : फराह खान नाही करणार होस्ट, तर कोण असेल लायन? जाणून घ्या सदस्यांची संपूर्ण लिस्ट
ऋतिकने सांगितले की आजही कधी कधी त्याची जीभ अडखळते किंवा पायाला कापरं भरतं. मात्र आता तो हे लपवत नाही. त्यांच्या मते, हीच त्याच्या आयुष्याची एक वास्तविकता आहे. यालाच त्याने आपलं “न्यू नॉर्मल” मानलं असून, ते तो आनंदाने स्वीकारून जगत आहे.