Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Personal Loans in India: टूरसाठी नव्हे, तर आजारासाठी कर्ज! वैयक्तिक कर्जामागचे धक्कादायक कारण आले समोर 

एका सर्वेक्षणानुसार, भारतीय लोक गॅजेट्स किंवा सुट्ट्यांसाठी नव्हे, तर प्रामुख्याने वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आणि घराच्या दुरुस्तीसाठी वैयक्तिक कर्ज घेत आहेत. टियर-१ शहरांमध्ये तणावाचे प्रमाण अधिक दिसून येत आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 25, 2026 | 09:54 PM
Personal Loans in India: टूरसाठी नव्हे, तर आजारासाठी कर्ज! वैयक्तिक कर्जामागचे धक्कादायक कारण आले समोर 

Personal Loans in India: टूरसाठी नव्हे, तर आजारासाठी कर्ज! वैयक्तिक कर्जामागचे धक्कादायक कारण आले समोर 

Follow Us
Close
Follow Us:
  • आरोग्य विम्याअभावी लोक कर्जबाजारी
  • ४८% लोक घराच्या गरजांसाठी कर्ज घेतात
  • महानगरांत वैद्यकीय कर्जाचे प्रमाण अधिक
 

Personal Loans in India: एका नव्या अहवालामध्ये वैयक्तिक कर्जासंबधित धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. वाढत्या वैयक्तिक कर्जे ही सहसा आलिशान सुट्या किंवा महागडी गॅझेट्स घेण्यासाठी घेतल्याचा समज आहे. मात्र, वास्तविता वेगळी असून भारतातील बहुतेक लोक हे टूर किंवा वैयक्तिक गॅझेट खरेदीसाठी नव्हे तर वैद्यकीय आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्याने वैयक्तिक कर्जे काढत असल्याचे समोर आले आहे. पैसा बाजारच्या अलीकडील ग्राहक संशोधन अहवालात हे चिंताजनक वास्तव उघड झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे देखील वाचा: EPFO 3.0: PF अकाऊंट विलिनीकरणासाठी माराव्या लागणार नाहीत ऑफिसमध्ये फेऱ्या! Transfer Request ने झटक्यात होईल काम

‘द पर्सनल लोन स्टोरी’ मध्ये भारतीय कुटुंबांसमोरील आर्थिक आव्हानांचे एक नवीन चित्र समोर आले आहे. या सर्वेक्षणातून हे धक्कादायक सत्य समोर आले आहे की, वैद्यकीय संकट हे भारतात वैयक्तिक कर्ज घेण्याचे प्रमुख कारण आहे. अहवालानुसार, अंदाजे ११% लोक आजारपण आणि रुग्णालयाचा खर्च भागवण्यासाठी बँका किंवा वित्तीय संस्थांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतात. या हाती आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, देशात वैद्यकीय उपचार महाग होत आहेत आणि लोकांकडे पुरेसे आरोग्य विमा संरक्षण नाही.

दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद सारख्या मोठ्या टियर-१ शहरांमध्ये ही समस्या आणखी गंभीर आहे. या महानगरांमध्ये, वैद्यकीय संकटाच्या वेळी मदतीसाठी कर्ज घेणाऱ्या लोकांची संख्या १४% पर्यंत पोहोचली आहे. त्या तुलनेत, लहान टियर-२ शहरांमध्ये हा आकडा १०% आणि टियर ३ शहरांमध्ये ८% आहे.

हे देखील वाचा: Air Travel Expensive : नवी मुंबई ते दिल्ली तिकीटाचे दर 15000 रुपये, सलग सुट्ट्यांमुळे हवाई प्रवास महागला

घर दुरुस्तीचा खर्च हे देखील महत्वाचे कारण आहे

देशात केवळ आजारच नाही तर निवारा आणि घराची देखभाल ही देखील कर्ज घेण्याची प्रमुख कारणे आहेत. जवळजवळ अर्धे, किंवा ४८% लोक त्यांच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा अनपेक्षित घर दुरुस्तीसाठी वैयक्तिक कर्ज निवडत असतात. शिवाय, लोकांचा एक महत्त्वाचा भाग त्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी कर्ज घेत आहे. सुमारे ३६% लोक त्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेतात.

Web Title: Medical emergencies driving personal loans in india not luxury spending

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 09:54 PM

Topics:  

  • health
  • Loan
  • medical insurance

संबंधित बातम्या

Loan Against Property: भारतात मालमत्तेच्या बदल्यात कर्ज का ठरते आहे फायनान्शियल गेम-चेंजर?
1

Loan Against Property: भारतात मालमत्तेच्या बदल्यात कर्ज का ठरते आहे फायनान्शियल गेम-चेंजर?

महाराष्ट्र सरकारच्या महालॅब्स कार्यक्रमातून ७.६ कोटींहून अधिक रुग्णांना लाभ, मोफत केले जाणार वेगवेगळ्या चाचण्यांचे निदान
2

महाराष्ट्र सरकारच्या महालॅब्स कार्यक्रमातून ७.६ कोटींहून अधिक रुग्णांना लाभ, मोफत केले जाणार वेगवेगळ्या चाचण्यांचे निदान

Suryoday Small Finance Bank: सुरक्षित कर्जवाढीच्या दिशेने सूर्यदयो बँकेचे पाऊल; महाराष्ट्रातून गोल्ड लोन सेवा सुरू
3

Suryoday Small Finance Bank: सुरक्षित कर्जवाढीच्या दिशेने सूर्यदयो बँकेचे पाऊल; महाराष्ट्रातून गोल्ड लोन सेवा सुरू

Micro Loan Scheme India: गिग कामगारांसाठी खुशखबर! एप्रिल २०२६ पासून केंद्र सरकार घेऊन येतीये ‘ही’ खास योजना
4

Micro Loan Scheme India: गिग कामगारांसाठी खुशखबर! एप्रिल २०२६ पासून केंद्र सरकार घेऊन येतीये ‘ही’ खास योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.