पिकलेलं केळ खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हेअर मास्क
वर्षाच्या बाराही महिने आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांची खूप जास्त काळजी घ्यावी. कारण धूळ, माती आणि प्रदूषणचा परिणाम केसांवर लगेच दिसून येतो.त्यामुळे केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये केसांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्यास जास्त वेळ मिळत नाही. केसांमध्ये वाढलेला कोंडा, केस कोरडे होणे, केस गळणे इत्यादी समस्या उद्भवू लागल्यानंतर सर्वच महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. याशिवाय केस सुंदर दिसण्यासाठी केमिकल ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. पण वारंवार केलेल्या केमिकल ट्रीटमेंटमुळे केसांना हानी पोहचण्याची शक्यता असते. केसांच्या समस्या उद्भवू लागल्यानंतर केस अतिशय पातळ आणि निस्तेज होऊन जातात. त्यामुळे घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)
केस गळून पातळ झाल्यानंतर पुन्हा नव्याने केस वाढवण्यासाठी कोणत्याही केमिकल ट्रीटमेंट कारण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. केसांना वरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पिकलेल्या केळ्याचा वापर करून हेअर मास्क बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा हेअर मास्क अभिनेत्री माधुरी दीक्षितसुद्धा केसांवर लावतात. घरगुती हेअर मास्क केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकापर्यंत केसांना पोषण देण्यास मदत करते. त्यामुळे केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर कोणत्याही ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांवर नैसर्गिक चमक मिळवावी.
हेअर मास्क बनवताना सर्वप्रथम, पिकलेल्या केळ्याची साल काढून चमच्याने मॅश करून घ्या. त्यानंतर त्यात दही आणि मध मिक्स करून पातळ पेस्ट तयार बनवा. तयार केलेली पेस्ट केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकापर्यंत सगळीकडे लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर पाण्याचा हाताने केसांच्या मुळांवर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. त्यानंतर ३० ते ४० मिनिटं हेअर मास्क केसांवर लावून तसाच ठेवा. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळेल आणि केस चमकदार होतील.
हेअर मास्क लावल्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केस चमकदार होण्यास मदत होते. महिन्यातून दोनदा किंवा तीनदा केसांच्या वाढीसाठी हेअर मास्क लावावा. यामुळे केस अतिशय सुंदर आणि चमकदार होतात. केसांमध्ये वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी दही अतिशय प्रभावी ठरते. दह्याचा वापर केल्यामुळे केस हायड्रेट होतात.