केसांमध्ये कोंड्यामुळे चिकटपणा वाढला आहे? मग 'हे' घरगुती उपाय करून मिळवा आराम
सर्वच महिला केसांची खूप जास्त काळजी घेतात. पण वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे किंवा चुकीचे हेअर केअर प्रॉडक्ट वापरल्यामुळे केसांच्या मुळांना हानी पोहचण्याची शक्यता असते. केस कोरडे झाल्यानंतर ते सुधारण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या शॅम्पू किंवा हेअर मास्कचा वापर केला जातो. पण तरीसुद्धा केस कोरडेच वाटतात. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. धूळ, माती, प्रदूषणामुळे किंवा पावसात भिजल्यामुळे केसांमध्ये चिकटपणा वाढतो. केसांमध्ये चिकटपणा वाढल्यानंतर कोंडा होणे, अचानक केस तुटणे इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवतात. केसांच्या वाढलेल्या कोंड्यामुळे टाळूवर इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे दमट वातावरणात केसांची काळजी घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
डोक्यात किंवा केसांमध्ये घाम आल्यानंतर केस अतिशय चिकट होऊन जातात. केस चिकट किंवा तेलकट झाल्यानंतर हेअर स्टाईल करताना अनेक केस चांगले दिसत नाहीत. त्यामुळे केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी बाजारातील महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. घरगुती उपाय केल्यामुळे केसांची नैसर्गिक चमक कायम टिकून राहते आणि केस सुंदर होतात. महिलांसह पुरुषांनी सुद्धा केसांची काळजी घ्यावी.
तुमच्या केसांमध्ये जर कोंडा असेल तर केसांच्या मुळांना अजिबात तेल लावू नये. यामुळे केसांमध्ये कोंडा वाढून केस खराब होऊन जातात. केसांची गुणवत्ता कायमच चांगली टिकवून ठेवण्यासाठी अंघोळीच्या अर्धा तास आधी केसांना तेल लावून हलक्या हाताने मसाज करावा. त्यानंतर केस शॅम्पूचा वापर करून स्वच्छ धुवावेत. हेअर फॉलिकल्स ब्लॉक झाल्यामुळे टाळूवर कोंडा वाढतो. कोंड्याचा थर वाढल्यामुळे केस तुटतात.
आठवड्यातून दोनदाच केस स्वच्छ पाण्याने धुवावेत. केस धुवताना कोणत्याही केमिकल युक्त शॅम्पूचा वापर करू नये. अतिशय सौम्य शॅम्पूचा वापर करून केस स्वच्छ करावेत. टाळूवर साचून राहिलेल्या धूळ, माती आणि प्रदूषणामुळे केसांमध्ये कोंडा वाढतो. यामुळे केसांमध्ये जळजळ किंवा अतिशय तीव्र खाज येते. त्यामुळे केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी आठवड्यातून दोनदा केस स्वच्छ करावे.
कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा, चेहरा दिसेल कायमच तरुण
केस स्वच्छ करण्यासाठी सल्फेट फ्री शाम्पुचा वापर करावा. तसेच केस धुवण्याच्या आधी कोरफड जेल लावावे. यामुळे केस अतिशय सॉफ्ट होतात. तसेच केसांच्या वाढीसाठी आवळा अतिशय प्रभावी ठरतो. आवळ्यामध्ये असलेले विटामिन सी केस मजबूत करण्यासाठी मदत करते. तसेच सकाळी उठल्यानंतर तुम्ही कोमट पाण्यात आवळा पावडर मिक्स करून पिऊ शकता. आठवड्यातून एकदा केसांना दही आणि लिंबाच्या रसाचा हेअर मास्क लावावा. हेअर मास्क लावल्यामुळे केस अतिशय चमकदार होतात.