केस गळून पातळ झाले आहेत? मग दह्यात मिक्स करा 'या' बिया, झपाट्याने होईल केसांची घनदाट वाढ
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, जंक फूड, पाण्याची कमतरता, धूळ, माती आणि प्रदूषणाचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांवर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्यासोबतच केसांची सुद्धा काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. महिलांच्या सौंदर्याची ओळख केस आहेत. त्यामुळे सुंदर आणि लांबलचक केसांसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ट्रीटमेंट करून केसांची काळजी घेतली जाते तर कधी वेगवेगळे हेअर मास्क आणि हेअर कंडिशनर लावले जातात. पण तरीसुद्धा केसांची नैसर्गिक चमक टिकून राहत नाही. केस खराब झाल्यानंतर ते सुधारण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो.(फोटो सौजन्य – istock)
वारंवार केमिकल उत्पादनांचा वापर केल्यामुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा कमी होऊन जातो आणि केस अतिशय निस्तेज वाटू लागतात. केस खराब झाल्यानंतर अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट केल्या जातात. तसेच हेअरमास्क किंवा हेअर पॅक लावून केसांची काळजी घेतली जाते. पण धूळ, माती आणि प्रदूषणामुळे केस खराब होऊन जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांची काळजी घेण्यासाठी दही हेअर मास्क बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. दही हेअर मास्क केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
केस गळती थांबवण्यासाठी वाटीमध्ये मेथी दाणे घेऊन त्यात पाणी टाका आणि रात्रभर दाणे भिजत ठेवा. मेथी दाणे भिजल्यानंतर त्यातील पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात मेथी दाणे आणि दही टाकून पेस्ट करा. तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात खोबऱ्याचे तेल आणि एरंडेल तेल टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण केसांवर आणि मुळांवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केस गळणार नाहीत आणि केसांची गुणवत्ता सुधारेल.
आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा दही हेअर मास्क लावल्यास केस अतिशय मुलायम आणि मऊ होतील. कोंड्यामुळे टाळूवर वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी दही हेअर अतिशय प्रभावी ठरेल. यामुळे केसांना खोलवर पोषण मिळते. हेअर मास्क लावल्यामुळे केसांना नैसर्गिक चमक मिळते आणि कोरडे निस्तेज झालेले केस सुधारतात.दही केसांवर नैसर्गिक कंडिश्नरप्रमाणे काम करते. तसेच कोरड्या केसांना पोषण देण्यासाठी दह्याचा वापर करावा. मेथी दाण्यांचा वापर केसांसाठी केल्यामुळे केसातील कोंडा, खाज सुटणे आणि टाळूतील इन्फेक्शन पूर्णपणे बरे होते.