
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे 'हे' प्रेरणादायी विचार आजच्या तरुण पिढीसाठी ठरतील मौल्यवान
संविधानाचे रचनाकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिलला साजरा केली जाते. बाबासाहेब हे न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक अजूनही जगभरात सगळीकडे ओळखले जाते. त्यांनी समाजातील लोकांसाठी अनेक महत्वपूर्ण कामे केली. हा दिवस केवळ भारतामध्येच नाहीतर ब्रिटिश कोलंबिया, कॅनडात ‘आंबेडकर समता दिवस’ म्हणून मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. बाबासाहेब यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला होता. त्यांनी भारत देशासाठी दिलेल्या अमूल्य योगदानामुळे त्यांची जयंती साजरा केली जाते. बाबासाहेब यांचे विचार जीवन जगण्याची प्रेरणा, संघर्ष आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यासाठीव करते. संविधान, मानवाधिकार, स्त्री-पुरुष समानता आणि लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी त्यांनी समाजाला दिलेले विचार अजूनही प्रेरणा देणारे ठरतात. तरुण पिढीसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार नक्कीच मौल्यवान ठरतील.(फोटो सौजन्य – pinterest)
Babasaheb Ambedkar: बाबासाहेब आंबेडकरांविषयी सर्व माहिती, जीवन …
डॉ. आंबेडकरांनी शिक्षणाला ‘वाघिणीचे दूध’ म्हटले असून, तेच परिवर्तनाचे प्रमुख साधन आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात आत्मविश्वासाने उभे राहण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक विचारांची गरज आहे.शिक्षण हे व्यक्तीला स्वाभिमान आणि प्रगतीचा मार्ग दाखवते. शिक्षणाच्या जोरावर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात प्रगती करू शकता.
“अन्याय सहन करू नका” हा त्यांचा मूलमंत्र आजच्या पिढीला स्वाभिमानाने जगण्यास, अन्यायाविरुद्ध लढण्यास आणि कर्मावर विश्वास ठेवण्यास शिकवतो. बाबासाहेबांनी सगळ्यांचं स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिला.जीवनात आलेल्या कोणत्याही परिस्थितीवर आत्मविश्वासाने मात करणे फार आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगात आत्मविश्वास हीच यशाची सगळ्यात मोठी ताकद आहे.
भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून, त्यांचे विचार तरुणांना लोकशाही मूल्ये, हक्क आणि कर्तव्यांची जाणीव करून देतात.त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्यभर समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांसाठी संघर्ष केला. तरुणांनी जातीभेद, अन्याय आणि भेदभावाविरुद्ध उभे राहून समाजात समतेची भावना निर्माण करावी, असा संदेश बाबासाहेबांनी दिला आहे.
जातीयता आणि सामाजिक विषमतेविरुद्ध लढा देत, माणुसकीला जात नसते, असे सांगणारे त्यांचे विचार एकसंध भारतासाठी महत्त्वाचे आहेत.शिक्षण आणि यश फक्त वैयक्तिक प्रगतीसाठी नसून समाजाच्या उन्नतीसाठी सुद्धा वापरले जावे. आजच्या तरुण पिढीने देशाच्या विकासात योगदान देणे सुद्धा फार आवश्यक आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ‘हे’ अनमोल विचार जीवन जगताना देतील प्रेरणा …
स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार करणारे विचार आजही महिला सक्षमीकरणासाठी अत्यंत आवश्यक आहेत. बाबासाहेबांनी दिलेली हे विचार जीवन जगण्यासाठीच नाहीतर समाजात एक चांगला व्यक्ती बनवण्यासाठी सुद्धा प्रेरणा देतील. बाबासाहेबांचे विचार केवळ समाजापुरतेच मर्यादित नसून समाजातील महिलांना सक्षम करण्याचे सुद्धा होते. महिलांना जीवन जगताना व्यक्तिगत स्वातंत्र्य मिळावं यासाठी संविधानात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.