
फोटो सौजन्य- pinterest
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन शनिवार, 6 डिसेंबर रोजी आहे. हा दिवस भारतीय समाजासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिशी देशभरातील अनुयायी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि लाखो नागरिक त्याच्या स्मृतीला उजाळा देतात. यंदाचा महापरिनिर्वाण दिन 69 वा आहे. त्यांचे विचार आजही प्रत्येकाला उभारणी देणारे, प्रेरणा देणारे आणि सामाजिक परिवर्तनाचा दृढ मार्ग दाखवणारे आहेत.
बाबासाहेबांचे जीवन संघर्षांनी आणि कठोर मेहनतीने भरलेले होते. गरिबी, जातभेद आणि सामाजिक विषमता अनुभवूनही त्यांनी शिक्षणाला हत्यार बनवले आणि देशातील वंचित, शोषित समाजाला अधिकार, सन्मान आणि समानतेचे स्वप्न दिले. तसेच त्यांनी संपूर्ण जीवनभर समता, न्याय आणि बंधुता यांसाठी संघर्ष केला. शिक्षण, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तन हीच समाजाची खरी शक्ती असल्याचे त्यांनी सांगितले. महापरिनिर्वाण दिन आपल्याला आठवण करून देतो की विचार कधीही मरत नाहीत; ते कृतीतून पुढे जगत राहतात.
6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. सामाजिक न्याय, संवैधानिक लोकशाही आणि मानवी हक्कांमध्ये त्यांच्या अमूल्य योगदानाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे. लोक श्रद्धांजली वाहण्यासाठी या दिवशी एकत्र येतात. या दिवशी आपण केवळ त्यांच्या स्मृतीस अभिवादन करत नाही, तर त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करण्याची शपथ घेतो.
डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापरिनिर्वाण दिवस साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला डॉ. आंबेडकरांचे विचार समजून घेण्यास, त्यांच्या शिकवणी स्वीकारण्यास आणि समान समाजाचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या ध्येयांकडे काम करण्यास मदत करू शकतो
बाबासाहेबांनी दिलेला हा मंत्र आजही तितकाच सामर्थ्यवान आहे. शिक्षण हेच मनुष्याचे सर्वात मोठे शस्त्र असल्याचे त्यांनी दाखवून दिले. शिक्षण हे स्वातंत्र्याची गुरुकिल्ली मानली जाते. शिक्षण हेच व्यक्तीला बुद्धी, विवेक आणि आत्मविश्वास देणारे साधन आहे.
समानतेची ही भावना समाजातील भेद मिटवून नवा मानवतावादी दृष्टिकोन देणारी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जात, पंथ किंवा जन्मामुळे श्रेष्ठता येत नाही. मनुष्याची ओळख त्याच्या कर्तृत्वात आणि सद्गुणांध्ये असते. हा त्यांचा विचारांचा मुलभूत संदेश आहे.
सकारात्मक आणि प्रगतिशील विचारच परिवर्तनाची पायाभरणी करतात. ते नेहमी सांगतात की, अडथळे आणि सामाजिक मर्यादा कधीही थांबवू नयेत संघर्ष हा व्यक्तीला घडवणारा अनुभव आहे.
आत्मविश्वास आणि कष्ट यांच्या आधारेच आपण स्वतःचे भाग्य बदलू शकतो. त्यांच्या सांगण्यानुसार, स्वतःचा कमीपणा मानू नका, स्वतःची क्षमता ओळखा आणि धैर्याने पुढे जा. बाबासाहेबांचा हा संदेश आजच्या तरुणांसाठी खूप प्रेरणादायी असा आहे.
जेथे अन्याय असेल तेथे शांतता कधीच नांदू शकत नाही. त्यामुळे सामाजिक न्यायासाठी लढणे हे आपले कर्तव्य आहे.
Ans: बाबासाहेबाचे विचार सामाजिक समता, शिक्षण, मानवाधिकार, न्याय आणि स्वाभिमानावर आधारित असल्यामुळे आजच्या पिढीसाठी अत्यंत मार्गदर्शक आहे
Ans: शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा सर्वांत प्रभावित संदेश आहे. जो व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाला दिशा देतो
Ans: समाजात बंधुतेची भावना, न्याय समानता आणि न्याय या मूल्यांवर आधारित आहे