Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माझं स्वप्नातलं मंदिर, 40 वर्षांत व्यक्तीने एकट्याने बनवलं हुबेहूब Dream Temple; कुठे आहे ते जाणून घ्या

My Dream Temple : तुम्हाला माहिती आहे का? भारताच्या हिमाचल प्रदेशात 'माय ड्रिम टेम्पल' नावाचं एक अनोखं मंदिर वसलं आहे. हे मंदिर व्यक्तीला आपल्या स्वप्नात दिसून आलं होतं, ज्यानंतर त्याने वास्तवात हुबेहुब तसंच मंदिर साकारलं.

  • By नुपूर भगत
Updated On: May 17, 2026 | 08:31 AM
माझं स्वप्नातलं मंदिर, 40 वर्षांत व्यक्तीने एकट्याने बनवलं हुबेहूब Dream Temple; कुठे आहे ते जाणून घ्या

माझं स्वप्नातलं मंदिर, 40 वर्षांत व्यक्तीने एकट्याने बनवलं हुबेहूब Dream Temple; कुठे आहे ते जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • हिमाचलच्या डोंगरांमध्ये वसलेली अनोखी वास्तू एका व्यक्तीच्या स्वप्नातून साकारली
  • तब्बल ४० वर्षांच्या मेहनतीनंतर कलाकाराने स्वबळावर उभारलं अद्भुत निर्माणकार्य
  • सुबक कारागिरी, वेगळं सौंदर्य आणि शांत वातावरणामुळे ठिकाण पर्यटकांचं आकर्षण बनलं
भारतात अनेक अद्भूत मंदिरं आहेत, प्रत्येक मंदिराची आपली अशी वेगळी खासियत आणि लोकप्रिय कथा असते. मंदिर म्हटलं की त्याचा संबंध देवी-देवतांशी जोडला जातो पण तुम्हाला माहिती आहे का? देशात असे एक मंदिर आहे जे कोणत्याही देवावर आधारित नसून व्यक्तीच्या स्वप्नावर तयार करण्यात आले आहे. आम्ही तुम्हाला या लेखात सर्वात अनोख्या मंदिराची माहिती सांगत आहोत ज्याची निर्मिती करायला व्यक्तीला तब्बल ४० वर्षे लागली. व्यक्तीने एकट्याने हे मंदिर तयार केलं आणि त्याचा दावा आहे की हे मंदिर त्याच्या स्वप्नात आलेल्या मंदिरावर आधारित आहे. म्हणजेच व्यक्तीला स्वप्नात जे मंदिर दिसलं त्याने हुबेहुब तसंच मंदिर वास्तवात बनून दाखवलं. चला यामागची रंजक कहाणी जाणून घेऊया.

Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट

माहितीनुसार, हे मंदिर हिमाचल प्रदेशच्या डोंगरामध्ये वसले आहे. याची निर्मिती सत्य भूषण नावाच्या एका कलाकराने केली. मुख्य म्हणजे हे बनवण्यासाठी त्याने कोणत्याही फंडिंग किंवा कामगारांची मदत घेतली नाही तर स्वबळाने आणि स्वकष्टाने त्याने आपल्या स्वप्नतलं मंदिर उभारलं. हे मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे ७००० फूट उंचीवर वसलेले आहे. इतक्या उंचीवर काम करणे म्हणेजे काही साधी गोष्ट नाही. सत्यभूषणने कधीही हार मानली नाही आणि तब्बल ४० वर्षे या मंदिराला दिल्यानंतर त्याच्या स्वप्नातल्या मंदिराला त्याने सत्यात साकारुन दाखवलं.

व्हायरल होत असलेल्या मंदिराच्या या व्हिडिओमध्ये इथली सुबक कारागिरी स्पष्ट दिसून येते. यात अनेक वेगवेगळ्या आकृत्या, मूर्त्या आणि डिजाईन्स पाहायला मिळतात. मुख्य म्हणजे बाकी मंदिरांपेक्षा या मंदिराचे साैंदर्य काहीसे वेगळे आहे. हे मंदिर श्रद्धा, संयम आणि समर्पणाचे एक उत्तम उदाहरण आहे. हिमाचल प्रदेशमध्ये फिरायला गेलात तर या मंदिराला भेट द्यायला विसरु नका.

दगड, सिमेंट आणि धातूच्या तारा वापरून या मंदिराला तयार करण्यात आले आहे. हे एक शिवमंदिर असून हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील चैलया या सुंदर हवेच्या ठिकाणी ते वसले आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी तुम्ही रेल्वे किंवा विमान पर्यायाचा वापर करु शकता.

इथे दिवसा होते ‘गुड नाईट’ आणि रात्री ‘गुड मॉर्निंग’; भारतातील हे अनोखं ठिकाण कुठे वसलंय ते जाणून घ्या

विमानाने : मुंबई विमानतळावरून (BOM) चंदीगडसाठी (IXC) थेट विमान पकडा. प्रवासाची वेळ अंदाजे २ तास आहे. तिथून चैलया शहराला जाण्यासाठी (अंदाजे ८५ किमी) टॅक्सी किंवा बस करू शकता.

रेल्वे : मुंबईहून पश्चिम एक्सप्रेस किंवा मुंबई – अमृतसर एक्सप्रेस ने अंबाला (UMB) किंवा कालका (KLK) पर्यंत प्रवास करा. तिथून पुढे टॅक्सीने चैलया शहराला पोहोचता येईल. इथेच हे मंदिर वसले आहे.

Web Title: Dream inspired shiv temple himachal pradesh built over 40 years travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • Himachal Pradesh
  • shiv temples
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स
1

Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स

IRCTC : स्वस्तात फिरा जपान! आयआरसीटीसीचे 10 दिवसांचे विशेष पॅकेज; चेरी ब्लॉसमच्या देशात बुलेट ट्रेनचा अनुभव अन् बरेच काही
2

IRCTC : स्वस्तात फिरा जपान! आयआरसीटीसीचे 10 दिवसांचे विशेष पॅकेज; चेरी ब्लॉसमच्या देशात बुलेट ट्रेनचा अनुभव अन् बरेच काही

आशियातील एकमेव असे हिल स्टेशन जिथे गाड्यांना नो एंट्री; इंग्रजांनी शोधले होते महाराष्ट्रातील हे सुंदर ठिकाण
3

आशियातील एकमेव असे हिल स्टेशन जिथे गाड्यांना नो एंट्री; इंग्रजांनी शोधले होते महाराष्ट्रातील हे सुंदर ठिकाण

भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता अटारी बॉर्डरवरूनही मिळणार एन्ट्री; जाणून घ्या व्हिसाचे नियम’
4

भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता अटारी बॉर्डरवरूनही मिळणार एन्ट्री; जाणून घ्या व्हिसाचे नियम’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.