Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या हळदीचे पाणी, शरीराला होतील भरमसाट फायदे

सकाळी उठल्यानंतर नियमित हळदीचे पाणी प्यायल्यास आतड्यांमधील घाण स्वच्छ होण्यासोबतच शरीराला भरमसाट फायदे होतात. हळदीमध्ये असलेले घटक त्वचा कायमच चमकदार ठेवतात. चला तर जाणून घेऊया हळदीचे पाणी पिण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 30, 2026 | 07:57 AM
आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या हळदीचे पाणी, शरीराला होतील भरमसाट फायदे

आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या हळदीचे पाणी, शरीराला होतील भरमसाट फायदे

Follow Us
Follow Us:

हळदीचे पाणी पिण्याचे फायदे?
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपाय?
वजन कमी करण्यासाठी उपाय?

दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. अपचनाच्या समस्या वाढल्यानंतर आहारात बदल करणे आवश्यक आहे. कारण अपचन, ऍसिडिटी किंवा गॅस झाल्यानंतर शरीरातील विषारी घाण बाहेर पडून जाण्याऐवजी आतड्यांमध्ये तशीच साचून राहते. याशिवाय पोटात वाढलेल्या वेदना आणि शरीरात निर्माण झालेल्या पोषक घटकांच्या कमतरतेमुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. बऱ्याचदा अपचनाच्या समस्या वाढल्यानंतर अनेक लोक मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण वारंवार चुकीच्या गोळ्या खाल्ल्यामुळे शरीराला हानी पोहचून आतड्यांवर परिणाम होतो.(फोटो सौजन्य – istock)

Fatty Liver: ना वजन जास्त, ना मधुमेह… तरीही फॅटी लिव्हर का होतो? जाणून घ्या खरं कारण

अपचन किंवा शरीरसंबंधित इतर समस्या उद्भवू लागल्यानंतर कोणत्याही गोळ्यांचे सेवन करण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या हळदीचा आहारात समावेश करावा. प्रत्येक स्वयंपाक घरात हळद कायमच उपलब्ध असते. मागील बऱ्याच वर्षांपासून हळदीचा वापर केवळ जेवण बनवण्यासाठीच नाहीतर शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी केला जात आहे. आज आम्ही तुम्हाला रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्यास शरीराला नेमके कोणते फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्यास शरीराला होणारे फायदे:

चुकीची लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीराला सूज येण्याची शक्यता असते. सूज आल्यानंतर सांध्यांमध्ये वेदना, हातपाय सुजल्यासारखे वाटणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास हळदीचे पाणी प्यावे. हळदीमध्ये असलेले अँटीइंफ्लामेटरी गुणधर्म शरीराला आलेली सूज कमी करण्यास मदत करते. त्यामुळे शरीर निरोगी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी हळदीचे पाणी प्यावे.

सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर हळद मिक्स करून सेवन केल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते. कायमच निरोगी आणि दीर्घायुषी राहण्यासाठी हळदीचे पाणी प्यावे. रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत झाल्यास ती सुधारण्यासाठी हळदीचे पाणी प्यावे. पावसाळ्यात शरीराला साथीच्या आजारांची झपाट्याने लागण होते. हे आजार वाढू लागल्यानंतर शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम करतात. अँटीऑक्सिडेंट्स आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म इम्युनिटी बुस्ट करतात.

हळदीमध्ये करक्युमिन नावाचा शक्तिशाली घटक आढळून येतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हळद अतिशय प्रभावी ठरते. हळदीतील करक्युमिन इंसुलिन सेंसिटिव्हीटी सुधारून रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. लिव्हरमध्ये साचून राहिलेली अनावश्यक चरबी नष्ट करण्यासाठी हळदीचे पाणी प्यावे. न चुकता सकाळी उठल्यानंतर हळदीचे पाणी प्यायल्यास लिव्हरसोबतच संपूर्ण शरीर डिटॉक्स होईल आणि निरोगी राहील.

गंभीर जीवाणूजन्य संसर्गांवर प्रभावी उपचारासाठी BDR फार्माचे ‘XATRONEM-AV’ बाजारात दाखल, अँटिबायोटिक संयोजनाचे इंजेक्शन

वजन वाढल्यानंतर कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. महागडे डाएट, व्यायाम तर काहीवेळा सप्लिमेंट्स सुद्धा प्यायले जातात. पण वारंवार सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी हळदीचे पाणी प्यावे. कोमट पाण्यात उपाशी पोटी हळद मिक्स करून प्यायल्यास वजन कमी होण्यासोबतच चेहऱ्यावरील नॅचरल ग्लो कायम टिकून राहील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिण्याचे फायदे काय आहेत?

    Ans: हळदीमध्ये कर्क्युमिनसारखे घटक असतात. हळदीचे पाणी शरीरातील दाह कमी करण्यास आणि एकूण आरोग्यास मदत करू शकते.

  • Que: हळदीचे पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारते का?

    Ans: काही लोकांना हळदीचे पाणी घेतल्याने पचनासाठी मदत होऊ शकते. मात्र पचनाच्या समस्या असल्यास योग्य आहार आणि वैद्यकीय सल्लाही महत्त्वाचा आहे.

  • Que: हळदीचे पाणी कसे तयार करावे?

    Ans: कोमट पाण्यात थोडी हळद मिसळून हळदीचे पाणी तयार केले जाते. प्रमाण योग्य ठेवणे गरजेचे आहे.

Web Title: Drink turmeric water on an empty stomach every morning amazing health benefits for your body and digestion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 07:57 AM

Topics:  

  • detox drinks
  • Health Care Tips
  • Turmeric Water

संबंधित बातम्या

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
1

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
2

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
3

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
4

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.