
थंडीच्या दिवसांमध्ये हार्ट अटॅकचा धोका कशामुळे वाढतो? शरीरात होणाऱ्या 'या' बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
Heart Attack: थंडीचा हंगाम सुरु झाल्यामुळे राज्यभरात सगळीकडे थंड वारे वाहू लागले आहेत. थंड वातावरणात शरीराची जास्त काळजी घेतली जाते. कारण या दिवसांमध्ये आजारपण वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आरोग्यासंबंधित समस्या सुद्धा वाढू लागतात. याशिवाय थंड वातावरणात हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. कारण थंडीच्या दिवसांमध्ये हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल किंवा हृदयाशी संबंधित आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनी आरोग्याची खूप जास्त काळजी घ्यावी. चला तर जाणून घेऊया थंडीच्या दिवसांमध्ये हार्ट अटॅकचा धोका कशामुळे वाढतो आणि लक्षणे, याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
थंडी वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. याला वैद्यकीय भाषेत वेसोकंस्ट्रिक्शन असे सुद्धा म्हंटले जाते. या दिवसांमध्ये संपूर्ण शरीरापर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी हृदयाला इतर दिवसांपेक्षा जास्त मेहनत करावी लागते, ज्याच्या परिणामामुळे हृदयावर अतिरिक्त तणाव येतो. वारंवार थंडी वाजत राहिल्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि उच्च रक्तदाब वाढतो. त्यामुळे आधीपासूनच रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी शरीराची खूप जास्त काळजी घ्यावी.
वातावरणात गारवा असल्यामुळे व्यायाम किंवा शारीरिक हालचाली करण्यासाठी बाहेर जाणे टाळले जाते. पण यामुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे डॉक्टरांच्या मते, थंडीत बाहेर जाणे आवडत नसले तरीसुद्धा घरच्या घरी शारीरिक हालचाल आणि ऍक्टिव्ह राहणे फार आवश्यक आहे. यामुळे रक्तभिसरण व्यवस्थित चालू राहते.
थंडीच्या दिवसांमध्ये खूप जास्त भूक लागते. त्यामुळे सतत काहींना काही खाण्याची इच्छा होते. अशावेळी पौष्टिक पदार्थांचे सेवन करण्याऐवजी जंक फूड आणि जास्त तळलेले-भाजलेले पदार्थ विकत आणून खाल्ले जातात. पण या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची जास्त शक्यता असते. जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे रक्तात गाठी होतात आणि हृदयाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो.
अतिप्रमाणात स्ट्रेस घेतल्यामुळे किंवा मानसिक तणाव वाढल्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर वाढल्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. शरीरात स्ट्रेस हार्मोन्सची पातळी वाढल्यामुळे कोणत्याही क्षणी हृदयविकाराचा झटका सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे.
Ans: थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
Ans: थंडीच्या वातावरणात रक्तवाहिन्या आकुंचन पावणे, रक्तदाब वाढणे आणि हृदयाचे काम वाढणे असे बदल होऊ शकतात. काही व्यक्तींमध्ये रक्त गोठण्याची प्रवृत्तीही वाढू शकते.
Ans: दररोज हलका व्यायाम करावा, शरीर उबदार ठेवावे, संतुलित आहार घ्यावा आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवावा. अतिथंड वातावरणात अचानक तीव्र व्यायाम करणे टाळावे.