लिंबू पाणी प्यायल्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
उन्हाळ्यासह सर्वच ऋतूंमध्ये लिंबू पाण्याचे सेवन केले जाते. लिंबू पाण्यामध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. विटामिन सी युक्त लिंबू पाणी प्यायल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन शरीरामध्ये थंडावा टिकून राहतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात लिंबाना मोठी मागणी असते. लिंबू पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे अनेक लोक दिवसांतून दोन ते तीन वेळा लिंबू पाण्याचे सेवन करतात. यामुळे पोटासंबंधित समस्यांपासून आराम मिळतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ताक, कैरीचे पन्ह, कोल्ड्रिंक किंवा इतर पेय पिण्याऐवजी अनेक लोक लिंबू पाण्याचे सेवन करतात. तर काहींना लिंबू टाकून चहा सुद्धा प्यायला आवडते.
सतत लिंबू पाण्याचे सेवन करत राहिल्यामुळे आरोग्याचे नुकसान होवू शकते. दातांचे आरोग्य बिघडून दात पिवळे पडण्याची शक्यता असते. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित कोमट पाण्यात बनवलेले लिंबू पाणी पितात. पण हे लिंबू पाणी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लिंबू पाण्याने प्यायल्यामुळे आरोग्यावर काय परिणाम दिसून येतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया लिंबू पाणी पिण्याचे दुष्परिणाम.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: पुण्यातील तरुणांमध्ये का वाढत आहे हार्ट अटॅकचे प्रमाण? जाणून घ्या हार्ट अटॅक येण्याची लक्षणे
लिंबू पाणी प्यायल्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
सतत लिंबू पाणी प्यायल्यामुळे पोटदुखीची समस्या उद्भवू शकते. लिंबू पाण्यामध्ये सायट्रिक ऍसिड आणि ऍसिडिटी जास्त असते. यामुळे काही लोकांच्या शरीरात पेप्टिक अल्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटासंबंधित आजार असलेल्या लोकांनी लिंबू पाण्याचे सेवन करू नये. लिंबू पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला फायदे होतात मात्र अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे आरोग्याचे नुकसान सुद्धा होते. यामुळे पचनक्रिया बिघडणे, सतत मळमळ, उलट्या होणे इत्यादी समस्या जाणवतात.
लिंबू पाणी प्यायल्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
शरीरामध्ये ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन केले जाते. मात्र यामुळे सतत लघवीची समस्या उद्भवू शकते. यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढू शकतो. तसेच लिंबू पाण्यामध्ये जास्त ॲसिड असते. हे ॲसिड शरीरासाठी हानिकारक आहे.शरीरामध्ये विटामिन सी अतिप्रमाणात गेल्यामुळे आतड्यांचा अल्सर होऊ शकतो.
हे देखील वाचा: मेंदूमधील रक्तवाहिन्या का फुटतात? जाणून घ्या ब्रेन हॅमरेज टाळण्यासाठी काय करावे
लिंबू पाण्याच्या अति सेवनामुळे दात दुखणे किंवा हिरड्यांचे दुखणे वाढू शकते. लिंबाच्या रसामध्ये आम्लयुक्त पदार्थ असतात, ज्यामुळे शरीरामध्ये ऍसिड निर्माण होते. दातांच्या आजूबाजूची त्वचाअतिशय नाजूक आणि संवेदनशील असल्यामुळे हिरड्यांचे दुखणे वाढू लागते. त्यामुळे लिंबू पाण्याचे सेवन करताना स्ट्रॉचा वापर करावा. सतत लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे घशात फोड किंवा घशाची त्वचा लाल होऊ शकते.