Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेवग्याच्या पाणांचे ‘हे’ फायदे माहीत आहेत का? आरोग्यासाठी खूपच गुणकारी आहे ही भाजी

शेवग्याच्या विविध घटकांमध्ये (शेंगा, पाने, फुले) मधुमेहामध्ये  रक्तातील साखर नियंत्रित करण्यापर्यंतचे अनेक गुणधर्म आहेत. शेवग्याची पाने आपल्याला कुठेही सहज सापडतील.

  • By Aparna Kad
Updated On: May 07, 2022 | 09:52 AM
शेवग्याच्या पाणांचे ‘हे’ फायदे माहीत आहेत का? आरोग्यासाठी खूपच गुणकारी आहे ही भाजी
Follow Us
Close
Follow Us:

शेवगा हा आरोग्यासाठी खूपच गुणकारी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेे. शेवग्याच्या शेंगा (Drumstick) आपल्याकडे अनेकजण आमटीमध्ये वापरतात, शेवग्यामुळे आमटीची चव तर वाढतेच शिवाय शेवगा आरोग्यासाठी उपयोगी आहे. शेवग्याच्या शेंगा व्यतिरिक्त आपण त्याच्या फुले आणि पानांबद्दल बोलायचे झाल्यास त्याचाही आरोग्यासाठी खूप फायदा होतो. शेवग्याच्या या पाणांची भाजी देखील केली जाते. जी शरिरासाठी अतिशय पोषक आहे. शेवग्याच्या विविध घटकांमध्ये (शेंगा, पाने, फुले) मधुमेहामध्ये  रक्तातील साखर नियंत्रित करण्यापर्यंतचे अनेक गुणधर्म आहेत. शेवग्याची पाने आपल्याला कुठेही सहज सापडतील.

शेवग्याच्या पानांपासून बनवलेली पावडर तुम्ही कोणत्याही दुकानातून किंवा ऑनलाइन सहज मिळवू शकता. मात्र, बाजारात उपलब्ध असलेल्या कोरड्या पावडरवर तुमचा विश्वास बसत नसेल, तर लहान हिरव्या पानांचा वापर करणे योग्य ठरेल.

  • शेवगा मधुमेहामध्ये वरदान

द हेल्थसाइटनुसार, शेवग्याचा वापर मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी केला जातो. अनेक अभ्यासांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ड्रमस्टिकच्या पानांमधील अँटिऑक्सिडेंट क्लोरोजेनिक ऍसिड रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. जर तुम्ही शुगरचे रुग्ण असाल तर चहाऐवजी शेवग्याच्या पानांपासून बनवलेला चहा प्यायला सुरुवात करावी.
  • ड्रमस्टिक चहा

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. फक्त शेवग्याची काही ताजी पाने धुऊन उन्हात वाळवायची आहेत आणि नंतर त्यांची पावडर बनवायची आहे. चहापत्तीसारखा वापर करायचा. या पावडरचा चहा रोज प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
  • वजन कमी होते

शेवग्याच्या चहामध्ये डाईयूरेटिक गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीरातील पेशींमधील अनावश्यक पाणी कमी होते. त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म शरीरातील सूज कमी करतात. फायबर युक्त ड्रमस्टिक चहा शरीरातील चरबी शोषण कमी करते. इन्सुलिनचा प्रतिकार कमी करून अनावश्यक चरबी जमा होण्यास प्रतिबंध होतो.
  • रक्तदाब कमी करण्यासाठी देखील फायदेशीर

ड्रमस्टिकच्या हिरव्या पानांच्या अर्कांमध्ये आयसोथियोसायनेट आणि नियाझिमिन असतात. हे असे संयुगे आहेत जे रक्तवाहिन्या जाड होण्यास प्रतिबंध करतात, ज्यामुळे रक्तदाबामध्येही याचा फायदा होतो.
  • रोगप्रतिकारक शक्ती

ड्रमस्टिकच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी असते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोगी असते. त्यात अँटिऑक्सिडंट्स असल्याने शरीरातील इंफ्लेमेशन आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून त्वचा आणि केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकते.

Web Title: Drumstick leaves are benefiacial for health read article nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2022 | 09:16 AM

Topics:  

  • Health News
  • Health Tips

संबंधित बातम्या

भोपळमध्ये वाढत आहे ‘ब्लड किक’ नावाचा धोकादायक ट्रेंड, स्वतःचंच रक्त काढून तरुण होतायेत ‘रिलॅक्स’
1

भोपळमध्ये वाढत आहे ‘ब्लड किक’ नावाचा धोकादायक ट्रेंड, स्वतःचंच रक्त काढून तरुण होतायेत ‘रिलॅक्स’

सावधान! वर्षानुवर्षे वापरलेली जुनी उशी ठरते आजरांचे माहेरघर; वेळेवर बदला नाहीतर आरोग्यावर होऊ शकतो परिणाम
2

सावधान! वर्षानुवर्षे वापरलेली जुनी उशी ठरते आजरांचे माहेरघर; वेळेवर बदला नाहीतर आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

‘युनानी की कहानी’ मोठा प्रतिसाद; Hamdard कडून सर्वांगीण आरोग्यावर भर
3

‘युनानी की कहानी’ मोठा प्रतिसाद; Hamdard कडून सर्वांगीण आरोग्यावर भर

धोक्याची घंटा! जगात १.३ अब्ज लोक देत आहेत या आजाराला झुंज, वेळीच उपाय केले नाही तर संकट वाढणार; तज्ज्ञांचा गंभीर इशारा
4

धोक्याची घंटा! जगात १.३ अब्ज लोक देत आहेत या आजाराला झुंज, वेळीच उपाय केले नाही तर संकट वाढणार; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.