
photo - yandex
दीर्घकालीन तणावामुळे मेंदूचे कार्य, हृदयाचे आरोग्य आणि पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डोकेदुखी, जोप न येणे , उच्च रक्तदाब, पोटदुखी आणि अॅसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. पण तुम्हाला माहित आहे का की सतत तणावात राहिल्याने आरोग्यावर कोणते गंभीर परिणाम होतात, जाणून घ्या.
तणावाच्या वेळी शरीरात कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालाईनसारखे हार्मोन्स रिलीज होतात. हे हार्मोन्स शरीराला कठीण परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी तयार करतात. परंतु, जेव्हा तणाव दीर्घकाळ टिकतो, तेव्हा त्याचा मेंदू आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
दीर्घकालीन तणावामुळे गोष्टी लक्षात ठेवण्याच्या आणि नवीन गोष्टी शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.याशिवाय, तणावामुळे एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते. तसेच, सततची चिंता आणि अस्वस्थतेमुळे झोपायला त्रास होऊ शकतो. तणावामुळ , क्षुल्लक गोष्टींवरून राग येणे आणि मनःस्थितीत सतत बदल होणे असा त्रास जाणवू शकतो. दीर्घकालीन तणावामुळे काही लोकांमध्ये चिंता आणि मानसिक त्रास वाढू शकतो.
दीर्घकाळच्या तणावामुळे शरीरातील स्ट्रस हार्मोन्स पातळी वाढू शकते. यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब तात्पुरता वाढू शकतो. जर तणाव दीर्घकाळ राहिला, तर हृदयाचे ठोके वाढू शकतात. यामुळे हृदयाशी संबधित आजारांचा धोका देखील वाढतो. याशिवाय, तणावाखाली असताना काही लोक जास्त खाऊ लागतात. काही जण धूम्रपान करतात किंवा शारीरिक हालचाल कमी करतात. दीर्घकालीन तणावामुळे हृदयरोगाचा धोका वाढण्याची शक्यता असते.
तणावामुळे पोटदुखी, गॅस किंवा अॅसिडिटी वाढते. मेंदू आणि पोट यांच्यात थेट संबंध असतो, ज्याला ‘आतडे-मेंदू संबंध’ (gut-brain connection) म्हणतात. तणावामुळे या संबंधावर परिणाम होऊ शकतो आणि पचनाच्या समस्या वाढू शकतात. तणावामुळे काही लोकांमध्ये अॅसिडिटीची लक्षणे वाढू शकतात.तसेच, तणावामुळे IBS चा त्रास वाढू शकतो, ज्यामुळे पोटदुखी, गॅस आणि शौचाच्या सवयींमध्ये बदल यांसारख्या समस्या उद्भवतात. याशिवाय काही लोकांना तणावाखाली असताना जास्त भूक लागते, तर काहींची भूक कमी होते. एकूणच, तणावामुळे पचनसंस्थेच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.
Ans: तणावामुळे पोटदुखी, गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास वाढू शकतो.
Ans: मेंदू, हृदय आणि पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
Ans: सततच्या तणावामुळे निद्रानाश आणि अस्वस्थता जाणवू शकते.