जागतिक कर्करोग दिनाच्या दिवशी सर्व्हायकल कॅन्सरविषयी घ्या अधिक माहिती
सर्व्हायकल अर्थात गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा महिलांमध्ये सर्रास आढळून येतो आणि याच्या बाबतीत दिलासादायक अशी एकमेव बाब म्हणजे आजाराचे निदान लवकरात लवकर केले गेल्यास हा सर्वात जास्त टाळता येण्याजोगा आणि उपचार करून बरा होण्याजोगा कॅन्सर आहे. गर्भाशयाचा खालचा भाग म्हणजे सर्व्हिक्स किंवा गर्भाशय आणि योनी यांना जोडणाऱ्या गर्भाशयाच्या मुखामध्ये पेशींमध्ये असामान्य वाढ झाल्याने हा कॅन्सर होतो.
ह्युमन पॅपिलोमा विषाणूच्या अति धोकादायक प्रकारचा संसर्ग सातत्याने होत राहिल्यास हा आजार होतो. याचे निदान लवकरात लवकर केले गेल्यास आणि त्यावर वेळीच योग्य उपचार झाल्यास रुग्ण बरी होऊन जिवंत राहण्याचा दर वाढतो. डॉ. रेणुका बोरिसा, कन्सल्टंन्ट, ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनॅकॉलॉजी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock)
सर्व्हायकल कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे
सर्व्हायकल कॅन्सर खूप सावकाश वाढतो. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये याची कोणतीच लक्षात येण्याजोगी लक्षणे न जाणवण्याची देखील शक्यता असते. पण जसजसा आजार पुढे जातो तसतशी पुढील लक्षणे दिसून येतात:
१. योनीमधून असामान्य रक्तस्त्राव
शरीरात सर्व्हायकल कॅन्सर घुसलाय सांगणारे 4 संकेत, मणक्याचे हाड होते डॅमेज; करू नका दुर्लक्ष
२. शरीर संबंधांदरम्यान आणि नंतर वेदना
३. लघवी करताना त्रास, वेदना होणे
हीच लक्षणे संसर्ग किंवा कॅन्सर नसलेल्या पेशींची वाढ होण्यासारख्या इतर काही स्थितीमुळे देखील उद्भवू शकतात. म्हणूनच ही किंवा यापैकी कोणतीही लक्षणे जाणवत असल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवावे.
सर्व्हायकल कॅन्सरचे निदान
सर्व्हायकल कॅन्सरचे निदान लवकरात लवकर झाल्यास उपचार यशस्वी होण्याची शक्यता खूप जास्त वाढते. विविध निदान पद्धती गर्भाशयाच्या मुखामध्ये कॅन्सरपूर्व किंवा कॅन्सरजन्य पेशी आहेत अथवा नाही हे ओळखण्यात मदत करतात.
काय आहे Cervical Cancer ची ओळख? साधेसे संकेतही ठरतील जीवघेणे
कोणत्या चाचण्या आवश्यक
लवकरात लवकर तपासणी
गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास त्यावर यशस्वी उपचार केले जाऊ शकतात. नियमित तपासणी, एचपीव्ही लसीकरण आणि असामान्य लक्षणांसाठी त्वरित मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोन असणाऱ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा सल्ला घेऊन हा कॅन्सर वाढणे रोखले जाऊ शकते. महिलांनी लवकर निदान आणि वेळेवर उपचार सुनिश्चित करण्यासाठी आपल्या शरीराची नियमित तपासणी करून घेण्याला प्राधान्य दिले पाहिजे.
गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे दिसून येत नसली तरी, असामान्य रक्तस्त्राव, असामान्य स्त्राव आणि ओटीपोटात वेदना यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. पॅप चाचण्या आणि एचपीव्ही चाचणीसह नियमित तपासणी ही आजाराचे लवकरात लवकर निदान करण्यासाठीची गुरुकिल्ली आहे. जागरूकता, लसीकरण आणि सक्रिय आरोग्यसेवा गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका लक्षणीय प्रमाणात कमी करण्यास मदत करू शकते.