कंबर, गुडघे, सांधे जीव जाईस्तोवर ठणकतात? मग या पदार्थांचे सेवन सुरु करा, वयाच्या नव्वदीतही हाडं राहतील मजबूत
वय वाढू लागलं की आपोआपच आरोग्याच्या समस्या जाणवू लागतात. धाप लागणे, हाडं ठिसूळ होणे आणि संपूर्ण अंग दुखू लागणे अशा अनेक समस्या वय वाढताच जाणवू लागतात. सध्याच्या जगात तर वय वाढणाऱ्यांचं नव्हे तर कमी वयात असणाऱ्या तरुणांनाही या समस्या उद्भवू लागतात. धाकधुकीचे जीवन, चुकीची जीवनशैली, ताणतणाव, चुकीचा आहार आणि व्यायामाच्या अभावामुळे या समस्या कमी वयातच उदभवू लागतात. अनेकदा हे दुखणे इतके जास्त असते की यामुळे आपला जीव जातोय की काय असे वाटू लागते. या असह्य वेदना बऱ्याचदा सहन करण्याच्या पलीकडे जातात. अनेकदा महागडी औषध घेऊनही या वेदना कमी होत नाही.
तुम्हालाही कमी वयातच अशा समस्या उद्भवत असतील तर आम्ही तुम्हाला सांगतो की, काही सुपरफुड्सचा आहारात समावेश करून तुम्ही या समस्यांपासून मुक्तता मिळवू शकता. सुपरफुड्स म्हणजे असे काही खाद्यपदार्थ ज्यांच्या सेवनाने तुमची हाडे आणि सांधे मजबूत होऊ शकतात. सुपरफुड्समध्ये असे काही पोषणमूल्ये असतात जी हाडांना आणि सांध्यांना सदृढ ठेवण्यास मदत करत असतात. काही हेल्दी पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करून तुम्ही नैसर्गिकरित्या तुमची हाडं मजबूत बनवू शकता.
पांढरे केस एका रात्रीत होतील काळे, फक्त 10 रुपयांत तयार करा नॅचरल हेअर पॅक
दुग्धजन्य पदार्थ
दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, दही, ताक, आणि चीज यात कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असते. कॅल्शियम हे हाडांना मजबूत करण्यासाठी आवश्यक असणारे एक पोषणमूल्य आहे. तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करून तुमची हाडे मजबूत बनवू शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याचे भरपूर फायदे होऊ शकतात. याचे सेवन सर्वांसाठीच उपयुक्त ठरू शकते.
पालेभाज्यांचा आहारात समावेश
पालक, मेथी, मोहरी, कोथिंबीर अशा पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिनचे मुबलक प्रमाण आढळून येते. हे घटक हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करत असतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये असे काही अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे हाडांना आणि सांध्यांना मजबुती देण्यास मदत करत असते. रोजच्या आहारात भाज्यांचे सेवन फार फायद्याचे ठरू शकते. यामुळे हाडांना पोषण मिळून सांधे मजबूत होणायास मदत मिळते.
डाळी आणि कडधान्यांचे सेवन
डाळी आणि कडधान्य प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. यांच्या सेवनाने सांध्यांच्या आणि हाडांच्या टिश्यू मजबूत होतात. राजमा, मसूर, हरभरा, आणि उडीद डाळ यांचा नियमित आहारात समावेश केल्यास हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरतात. याशिवाय हे पदार्थ शरीरातील पेशींच्या पुनर्निर्मितीला मदत करतात.
आतून बाहेरून किडनी साफ करते ही 20 रुपयांची हिरवी पावडर, अशाप्रकारे करा आहारात समावेश
साळीच्या धान्यांचा समावेश
साळीचे धान्य जसे की, जव, बाजरी, रागी, आणि ओट्स हे कॅल्शियम आणि फायबरने समृद्ध असतात. रंगीमध्ये विशेषतः कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते जे हाडांना मजबुती देण्यास मदत करतात. साळीचे धान्य केवळ हाडे मजबूत करत नाही, तर ते पचनक्रिया सुधारून सांध्यांच्या वेदना कमी करण्यास देखील मदत करतात.