Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरात एकटे आहात आणि अचानक हार्ट अटॅक आला तर काय करावं? ‘हे’ उपाय ठरू शकतात जीवनदायी

Heart Attack : हार्ट अटॅक ही जीवघेणी अवस्था असली तरी योग्य वेळी योग्य पावले उचलली तर जीव वाचू शकतो. विशेषतः घरात एकटे असताना घाबरून न जाता शांतपणे निर्णय घेणे अत्यंत गरजेचे असते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 03, 2026 | 08:15 PM
घरात एकटे आहात आणि अचानक हार्ट अटॅक आला तर काय करावं? ‘हे’ उपाय ठरू शकतात जीवनदायी

घरात एकटे आहात आणि अचानक हार्ट अटॅक आला तर काय करावं? ‘हे’ उपाय ठरू शकतात जीवनदायी

Follow Us
Close
Follow Us:
  • हार्ट अटॅकची लक्षणे जाणवताच वेळ न दवडता काही योग्य पाऊले उचलायला हवीत.
  • असं केल्याने तुम्ही तुमचा जीव वाचवू शकता.
  • घरात एकटे असल्यावर या आजारापासून स्वतःचे संरक्षण कसे करायचे यासाठी डॉक्टरांनी काही टिप्स शेअर केल्या आहेत.
हार्ट अटॅक ही एक गंभीर समस्या असून मागील काही काळापासून याचे प्रमाण फार वाढले आहे. हृदयविकाराचा झटका कोणत्याही व्यक्तीला थेट मृत्यूच्या जाळ्यात अडकवू शकतो अशात वेळीच यावर उपाययोजना केल्यास यापासून स्वत:चे संरक्षण करता येऊ शकते. हृदयविकाराचा झटका म्हणजे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होणे. अहवालानुसार, ४० वर्षांच्या आसपासच्या तरुणांमध्ये ही संख्या २५ ते ३० टक्के जास्त असल्याचे दिसून आले आहे. अनेकदा अचानक हार्ट अटॅक आल्याने यावर काय करावे ते सुचत नाही पण त्याचवेळी जर आपण योग्य उपचार घेतले तर मृत्यूला टाळता येऊ शकते. हृदयविकाराचे वाढते प्रमाण बघता वारंवार याविषयी जनजागृती केली जात आहे. अमेरिकन डॉक्टर, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी सर्जन जेरेमी लंडन यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि घरी एकटे असताना हृदयविकाराचा झटका आला तर काय करावे हे सांगितले आहे.

World Cancer Day 2026: ओरल कॅन्सरचे उशीरा निदान झाल्यामुळे उद्भवतात गंभीर समस्या, देशात जवळपास ७०-८० टक्‍के रुग्ण

हृदयविकाराचा झटका एक भयानक आरोग्यस्थिती आहे पण या परिस्थितीत आपण घाबरुन न जाता वेळीच यावर योग्य ते निर्णय घेऊन उपाययोजना करणं गरजेचं आहे. तुम्ही घरात एकटे असाल आणि अचानक जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका आला तर अशा परिस्थितीत तुम्ही लगेचच काही महत्त्वपूर्ण पाऊल उचलायचे हवेत ज्याने तुमचा जीव वाचू शकतो.

आपत्कालीन क्रमांकावर कॉल

डाॅक्टरांनी स्पष्ट केले की, तुम्हाला जर हृदयविकाराचा झटका येत असेल आणि तुम्ही घरात एकटे असाल तर वेळ पाहताच ताबडतोब आपत्कालीन क्रमांकावर कॉल करा. त्यांनी महत्त्वाची माहिती पुरवा आणि यानंतर ते स्वत: तुम्हाला व्हॅन घेऊन हाॅस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी येतील.

अॅस्पिरिनची गोळी चावा

हृदयरोगतज्ज्ञांनी स्पष्ट केले की हृदयविकाराचा झटका आल्यास तुम्ही लगेच अॅस्पिरिनची गोळी घ्या. ही गोळी डायरेक्ट गिळू नका तर दातांनी हळूहळू तिला चावून खा. औषध हृदयविकाराची तीव्रता कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृदयविकाराचा झटका टळणार तर नाही पण त्याची तीव्रता कमी होऊ शकते.

घराचा दरवाज उघडा

तुम्ही एकटे असताना जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येत असेल तर त्वरील घराचे सर्व दरवाजे उघडा आणि लाईट चालू करा. असे केल्याने आजूबाजूच्यांना तुमची स्थिती समजून ते मदत करायला घरात शिरु शकतात. आपत्कालीन परिस्थितीत लोक तुमच्यापर्यंत सहज पोहोचू शकतील यासाठी दरवाजे उघडे ठेवणे चांगले.

बसा किंवा झोपा

हृदयविकाराच्या झटका आल्यानंतर तुम्ही बेशुद्ध होऊ शकता किंवा जमिनीवर पडू शकता. अशात बेशुद्ध होऊन जोरात जमिनीवर पडल्याने डोक्याला किंवा दुसऱ्या अवयवाला गंभीर दुखापत होऊ शकते. यामुळेच आधीच सावधानता पाळत तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, छातीत कळा जाणवत असतील तर लगेच बेडवर झोपा किंवा सोफ्यावर बसा.

कुटुंब किंवा मित्रांना कॉल करा

हृदयविकाराच्या झटका हळूहळू जाणवू लागतो आणि मग आपण बेशुद्ध पडतो. तुम्हाला याची कोणतीही लक्षणे शरीरात प्रकर्शाने जाणवत असतील तर वेळीच सावध व्हा आणि आपल्या मित्रमंडळींना किंवा कुटुंबाला तुमच्या काॅल करुन मदतीसाठी बोलावून घ्या. त्यांच्याशी फोनवर रहा जेणेकरून ते तुमच्या परिस्थितीबद्दल माहिती घेऊ शकतील.

World Cancer Day 2026: भारतातील Breast Cancer वर 4 उपचारपद्धती, जगण्याची शक्यता वाढवण्यास करतील मदत

हार्ट अटॅकची लक्षणे

  • छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला वेदना होणे.
  • श्वास घेण्यास त्रास होणे आणि धाप लागणे.
  • अचानक खूप जास्त घाम यायला लागणे.
  • अस्वस्थ वाटणे आणि चक्कर येऊन पडल्यासारखे वाटणे.

Web Title: What to do if you are alone at home and suddenly have a heart attack life saving measures lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • Heart attack prevention
  • lifestyle news

संबंधित बातम्या

फॅमिली टाइम महत्त्वाचा! मानसिक आरोग्यापासून दीर्घायुष्यापर्यंत… कुटुंबासोबत वेळ घालवण्याचे फायदे माहिती आहेत का?
1

फॅमिली टाइम महत्त्वाचा! मानसिक आरोग्यापासून दीर्घायुष्यापर्यंत… कुटुंबासोबत वेळ घालवण्याचे फायदे माहिती आहेत का?

Health Tips : सोप्या जीवनशैलीतील बदलांनी मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब टाळणं  शक्य, तज्ज्ञांचा महत्त्वपूर्ण सल्ला
2

Health Tips : सोप्या जीवनशैलीतील बदलांनी मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब टाळणं शक्य, तज्ज्ञांचा महत्त्वपूर्ण सल्ला

झोपेच्या कमतरेमुळे मेंदू आकुंचन पावत आहे! जाणून घ्या रोजच्या कोणकोणत्या सवयींमुळे ब्रेनवर होतो वाईट परिणाम
3

झोपेच्या कमतरेमुळे मेंदू आकुंचन पावत आहे! जाणून घ्या रोजच्या कोणकोणत्या सवयींमुळे ब्रेनवर होतो वाईट परिणाम

प्रेमात गुपितपणा! ‘पॉकेटिंग डेटिंग’ ट्रेंड नक्की काय आहे? कमिटमेंट नाही, भांडण नाही… मग कसं टिकून राहत नातं?
4

प्रेमात गुपितपणा! ‘पॉकेटिंग डेटिंग’ ट्रेंड नक्की काय आहे? कमिटमेंट नाही, भांडण नाही… मग कसं टिकून राहत नातं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.