Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅन्सरच्या 40% प्रकरणांमध्ये बचाव शक्य! फक्त या 5 सवयी बदला; WHO च्या नव्या अभ्यासातून समोर आले सत्य

Cancer Awareness : कर्करोग हा जगभरातील एक भयंकर आजार असून WHO च्या या नव्या अभ्यासानुसार जगभरातील सुमारे 40 टक्के कर्करोगाची प्रकरणे टाळता येण्यासारखी आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 04, 2026 | 08:15 PM
कॅन्सरच्या 40% प्रकरणांमध्ये बचाव शक्य! फक्त या 5 सवयी बदला; WHO च्या नव्या अभ्यासातून समोर आले सत्य

कॅन्सरच्या 40% प्रकरणांमध्ये बचाव शक्य! फक्त या 5 सवयी बदला; WHO च्या नव्या अभ्यासातून समोर आले सत्य

Follow Us
Follow Us:
  • WHO आणि IARC च्या अभ्यासानुसार काही प्रमुख घटक कर्करोगाच्या आजारास कारणीभूत ठरतात.
  • भारतात सुमारे ३७% कर्करोगाची प्रकरणे टाळता येण्यासारखी आहेत.
  • कर्करोग टाळण्यास नक्की काय करायला हवे ते जाणून घ्या.
कर्करोग हा फार आधीपासून एक गंभीर आजार मानला जात असून याचे प्रमाण दिवसेंदिवस फार जास्त वाढत चालले आहे. कर्करोगाचा आजार साधारणपणे चुकीची जीवनशैली, अनुवांशिक बदल, किंवा पर्यावरणाशी संबंधित घटकांमुळे होतो. कर्करोगाचा वाढता प्रभाव बघता वेळीच याविषयी जागरुक होणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था (IARC) यांनी केलेल्या एका नव्या अभ्यासात कर्करोगासंबंधित एक नवे तथ्य समोर आले आहे. या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, जगभरातील सुमारे ४०% कर्करोगाच्या प्रकरणांना रोखता येऊ शकते. म्हणजेच साधारण १० पैकी ४ कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये कर्करोगावर प्रतिबंध करणे शक्य आहे. हे प्रकरण सरकार आणि सामान्य लोकांना कर्करोगाची खरी कारणे आणि ते रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबद्दल जागरुक करण्यासाठी करण्यात आले आहे.

World Cancer Day 2026: डोळ्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास गमवावी लागेल दृष्टी

या अभ्यासात WHO आणि IARC यांनी कॅन्सर होण्याची अशी ३० प्रमुख कारणे पाहिली आहेत, जी आपण आपल्या सवयी बदलून किंवा योग्य नियंत्रण ठेवून कमी करू शकतो. यामध्ये तंबाखू आणि मद्यपान, लठ्ठपणा, शारीरिक निष्क्रियता, वायू प्रदूषण, अतिनील किरणे आणि कर्करोगास कारणीभूत नऊ संसर्गांचा समावेश करण्यात आला आहे. नवीन अहवालानुसार, २०२२ मध्ये कर्करोगाच्या नवीन प्रकरणांपैकी सुमारे ३७ टक्के, किंवा ७.७ दशलक्ष प्रकरणे, अशा कारणांशी संबंधित होती जी निरोगी जीवनशैली आणि निरोगी सवयींद्वारे रोखता आली असती.

WHO च्या या नव्या अभ्यासात, १८५ देशांमधील आणि ३६ प्रकारच्या कर्करोगाच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे. तज्ञांचे मते, तंबाखू हे जगभरातील कर्करोगाचे प्रमुख कारण आहे, जे नवीन कर्करोगाच्या प्रकरणांपैकी सुमारे १५ टक्के आहे. यानंतर संसर्गाचा याच १० टक्के वाटा तर मद्यपानाचा ८ टक्के… यावरुनच हे स्पष्ट होते की, कर्करोग हा केवळ अनुवांशिक आजार नाही तर तो जीवनशैली आणि पर्यावरणाशी संबंधित एक मोठा धोका आहे.

भारताविषयी बोलणे केले तर, पुरुष आणि महिला दोघांमध्ये अंदाजे ३७% कर्करोगाच्या घटना अशा आहेत ज्या टाळता येऊ शकतात. भारतात कर्करोगाचे प्रमुख कारण संसर्ग असून देशात अंदाजे १३.४ टक्के कर्करोगाच्या घटना संसर्गामुळे होत असल्याचे वृत्त आहे. याशिवाय, तंबाखूचे सेवन देखील कर्करोगाच्या समस्येस आमंत्रण देण्यास प्रमुख भूमिका बजावत असते. अहवालानुसार, १०.५ टक्के कर्करोगाच्या घटनांमध्ये धूम्रपान हे कारण मूळ ठरले आहे. अहवालानुसार, धूररहित तंबाखू आणि सुपारिचे सेवन ५% कर्करोगाच्या प्रकरणांशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कर्करोगाचा धोका कसा टाळता येतो

भारतातील सुमारे ४४.७% कर्करोगाची प्रकरणे अशी कारणांमुळे होतात, जी योग्य काळजी घेतल्यास वेळीच टाळता येऊ शकतात.

  • संसर्ग रोखणे
  • तंबाखूवर नियंत्रण
  • लसीकरण
  • नियमित आरोग्य तपासणी
या काही सवयी आहेत ज्या पाळल्यास ३०.५% कर्करोगाची प्रकरणे टाळता येऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, सर्वायकल आणि ब्रस्ट कॅन्सरसारख्या प्रकरणांमध्ये वेळीच वेळेवर तपासणी केल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात.

टाळूवर वाढलेले फँगल इन्फेक्शन मुळांपासून होईल नष्ट! ‘या’ पद्धतीने लावा अश्वगंधाचा घरगुती लेप, केस होतील सुंदर

कर्करोगाची प्रमुख लक्षणे

  • स्तनांमध्ये, मानेमध्ये किंवा शरीराच्या इतर भागांत गाठ तयार होणे.
  • अचानक वजन कमी होऊ लागणे.
  • त्वचेवर किंवा तोंडात एखादी जखम होणे जी लवकर ठिक न होणे.
  • खोकल्यातून किंवा लघवीतून रक्तस्त्राव होणे.
  • सारखा खोकला होणे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: 40 of cancer cases are preventable who study reveal truth lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • cancer
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Mushtaq Khan : प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन, कॅन्सरने केला घात
1

Mushtaq Khan : प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन, कॅन्सरने केला घात

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
2

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
3

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!
4

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.