Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्ही 70 वर्षे जगणार की 100 वर्षे? फक्त खाण-पान नाही तर ही गोष्ट ठरवते तुमचे आयुष्य किती असेल; नवी रिसर्च आली समोर

दीर्घायुष्य मिळवण्यासाठी हेल्दी लाईफस्टाईल महत्त्वाची मानली जाते, पण अलीकडील संशोधनानुसार माणसाचे आयुष्य हे मोठ्या प्रमाणात अनुवांशिकतेवर अवलंबून असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 05, 2026 | 08:15 PM
तुम्ही 70 वर्षे जगणार की 100 वर्षे? फक्त खाण-पान नाही तर ही गोष्ट ठरवते तुमचे आयुष्य किती असेल; नवी रिसर्च आली समोर

तुम्ही 70 वर्षे जगणार की 100 वर्षे? फक्त खाण-पान नाही तर ही गोष्ट ठरवते तुमचे आयुष्य किती असेल; नवी रिसर्च आली समोर

Follow Us
Close
Follow Us:
  • अभ्यासानुसार बाह्य कारणांमुळे होणारे मृत्यू वगळल्यास मानवी आयुष्याच्या सुमारे 55% भागावर जनुकांचा प्रभाव असतो.
  • डेन्मार्क आणि स्वीडनमधील जुळ्या भावंडांच्या डेटावरून आयडेंटिकल ट्विन्सच्या आयुर्मानात जास्त समानता आढळली.
  • तज्ञांच्या मते जनुके आयुर्मानाची मर्यादा ठरवतात, तर आहार, पर्यावरण आणि सवयी ठरवतात की आपण त्या मर्यादेपर्यंत पोहोचतो की नाही.
असे अनेकदा म्हटले जाते की, दिर्घ काळ जगायचे असेल तर हेल्दी लाईफस्टाईल स्वाकारली पाहिजे. संतुलित आहार, रोजचा व्यायाम आपल्याला निरोगी बनवून ठेवतात पण याने खरंच आपली जीवनरेखा वाढू शकते का? आरोग्य तज्ञांचा असाही विश्वास आहे की चांगल्या खाण्याच्या सवयी आणि योग्य सवयींमुळे व्यक्तीचे आयुष्य वाढू शकते. तथापि, अलिकडेच एक नवी रिसर्च समोर आली आहे ज्यात धक्कादायक खुलासा करण्यात आला. यात शास्त्रज्ञांनी दावा केला की, लोकांचे आयुष्य हे फक्त आहार किंवा व्यायामावर नाही तर त्यांच्या जनुकांवरुन ठरत असते. यावरुनच समजते की, तुम्ही किती वर्षे जगणार आहात. तुमची जीवनशैली कितीही चांगली असली तरी, तुमच्या वयातील सर्वात मोठा घटक तुमच्या शरीरातील जनुकेच आहेत.

मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरात वाढतो ‘या’ कॅन्सरचा धोका, वेळीच सावध होऊन ओळखा लक्षणे

एका अभ्यासानुसार, असा दावा करण्यात आला आहे की, रस्ते अपघात, संसर्ग आणि इतर बाह्य कारणांमुळे होणारे मृत्यू वगळले तर मानवी आयुष्याच्या सुमारे ५५ टक्के भाग अनुवांशिक असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर लोकांच्या आयुष्यमानात दिसूण येणारा निम्म्याहून अधिक फरक हा जनुकांमुळे असतो. हा आकडा पूर्वीच्या अंदाजापेक्षा खूपच जास्त आहे, ज्यामध्ये अनुवांशिकतेची भूमिका फक्त १० ते २५ टक्के मानली जात होती. हा अभ्यास डेन्मार्क आणि स्वीडनच्या मोठ्या स्कॅन्डिनेव्हियन जुळ्या लोकांवर आधारित आहे, ज्यामध्ये १०० वर्षांहून अधिक काळाची माहिती समाविष्ट आहे.

शास्त्रज्ञांनी एकसारख्या जनुकांवाले (आइडेंटिकल) आणि वेगळ्या जनुकांच्या (नॉन-आइडेंटिकल) जुळ्या मुलांचा अभ्यास केला. त्यांनी आपल्या या अभ्यासात, १०० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या भावंडांचा डेटा देखील समाविष्ट केला. बहुतेक सहभागी १८७० ते १९३५ दरम्यान जन्माला आले होते, जेव्हा संसर्गजन्य रोग आणि अपघातांमुळे होणारे मृत्यू सामान्य होते. यात असे आढळून आले की, बाह्य कारणांमुळे होणारे मृत्यू काढून टाकले तर आइडेंटिकल ट्विन्सच्या वयात खूप जास्त समानता आढळून आली आहे. याचा साधा अर्थ असा की, पूर्वी अनुवांशिकतेचा प्रभाव कमी वाटत होता कारण बाह्य कारणांमुळे (आजार, हिंसाचार) खरे चित्र दिसत नव्हते. आता आधुनिक उपचार आणि चांगल्या जीवनशैलीमुळे असे मृत्यू कमी झाले आहेत, त्यामुळे जनुकांचा परिणाम अधिक स्पष्टपणे दिसू लागला आहे.

भारतीय तज्ञांचा असा विश्वास आहे की, अभ्यासाचे हे निकाल पब्लिक हेल्थसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. फोर्टिस सी-डीओसीचे अध्यक्ष डॉ. अनूप मिश्रा यांच्या मते, जैविक वृद्धत्वात जनुके महत्त्वाची भूमिका बजावतात, परंतु भारतातील परिस्थिती हा फायदा कमी करू शकते. ते म्हणतात की खराब पोषण, वाढते वायू प्रदूषण, मधुमेह आणि लठ्ठपणा हे अनुवांशिक फायदे रद्द करू शकतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान करू शकतात.

कॅन्सरच्या 40% प्रकरणांमध्ये बचाव शक्य! फक्त या 5 सवयी बदला; WHO च्या नव्या अभ्यासातून समोर आले सत्य

तज्ञांचा असा विश्वास आहे की दीर्घायुष्य हे जनुके आणि पर्यावरणाच्या संतुलनाचा परिणाम आहे. जनुके एखाद्या व्यक्तीच्या आयुर्मानाची एक उच्च मर्यादा ठरवतात, तर जीवनशैली आणि एपिजेनेटिक्स हे ठरवतात की एखादी व्यक्ती त्या मर्यादेपर्यंत किती जवळ पोहोचू शकते. शास्त्रज्ञांनी असेही स्पष्ट केले आहे की या अभ्यासातून असे सूचित होत नाही की एखाद्या व्यक्तीचे आयुर्मान जन्माच्या वेळी निश्चित असते. उलट, जनुके आयुर्मान ठरवतात आणि जीवनशैली ठरवते की आपण ते गाठू शकतो की नाही.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: How long will you live new study reveal truth lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

World TB Day 2026: गर्भावस्थेतील क्षयरोगावर वेळीच उपचार गरजेचे; आई-बाळाच्या सुरक्षेकरिता तज्ज्ञांचा इशारा
1

World TB Day 2026: गर्भावस्थेतील क्षयरोगावर वेळीच उपचार गरजेचे; आई-बाळाच्या सुरक्षेकरिता तज्ज्ञांचा इशारा

Pregnancy Tips: बाळ होण्यासाठी प्रयत्न करताय? 5 सोप्या पद्धतीने लवकर होईल Conceive
2

Pregnancy Tips: बाळ होण्यासाठी प्रयत्न करताय? 5 सोप्या पद्धतीने लवकर होईल Conceive

डायबीटीज कंट्रोलमध्ये नाही ! शुगर कमी करण्यासाठी रोज कितीवेळ चालावं ?
3

डायबीटीज कंट्रोलमध्ये नाही ! शुगर कमी करण्यासाठी रोज कितीवेळ चालावं ?

Positive Quotes : भीतीवर मात कशी करायची? गीतेतील श्लोक सांगतात सोपा आणि प्रभावी मार्ग
4

Positive Quotes : भीतीवर मात कशी करायची? गीतेतील श्लोक सांगतात सोपा आणि प्रभावी मार्ग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.