चष्म्याचा नंबर कायमचा घालवण्यासाठी नियमित खा 'हे' पदार्थ
हल्ली मोठ्या प्रमाणावर डिजिटल उपकरणांचा वापर केला जात आहे. एका जागेवर बसून सतत मोबाईल पाहत राहणे, लॅपटॉप किंवा टीव्हीच्या स्क्रिनवर वेळ घालवल्यामुळे डोळ्यांच्या आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते.डोळ्यांवर ताण आल्यानंतर कमी वयातच चष्मा लागण्याची शक्यता असते. डोळ्यांवर लागलेला कायम स्वरूपीचा चष्मा काही केला तरी लावावा लागतो. हल्ली लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चष्मा आहे. तर काही लोक डोळ्यांची काळजी घेण्यासाठी चष्मा लावतात. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. डोळ्यांची काळजी न घेतल्यामुळे कमी वयातच मोतीबिंदू होण्याची शक्यता असते. मोतीबिंदू किंवा काचबिंदू झाल्यानंतर डोळ्यांचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.(फोटो सौजन्य – istock)
दैनंदिन आहारात आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या पदार्थांचे नियमित सेवन करावे. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होण्यासाठी आहारात कोणत्या आंबट पदार्थांचे नियमित सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे डोळ्यांची कमजोर झालेली दृष्टी सुधारण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजर अतिशय महत्वाचे आहे. गाजर खाल्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते. त्यामुळे गाजरचा रस किंवा गाजराचे तुकडे नियमित आहारात खावे. याशिवाय गाजरचा वापर करून तुम्ही रायता किंवा सॅलड सुद्धा बनवू शकता. गाजरामध्ये असलेले विटामिन ए आणि इतर आवश्यक घटक डोळ्यांच्या दृष्टीसाठी खूप आवश्यक ठरतात. याशिवाय रातांधळेपणाच्या समस्येने त्रस्त असल्यास गाजर खावे.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना पालक खायला आवडत नाही. मात्र पालकमध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासह डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी मदत करतात. यामध्ये ल्युटिन आणि झेक्झँथिन हे अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. डोळ्यांना सूर्यप्रकाशातील हानिकारक किरणांपासून संरक्षण देण्यासाठी नियमित पालक स्मूदी किंवा पालकपासून बनवलेले पदार्थ खावेत.
बाळाला जन्म देण्यासाठी पुरुषांचा Sperm Count किती पाहिजे, कशी करावी तपासणी
चवीला तुरट असलेला आवळा आरोग्यासह डोळे आणि त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. त्यामुळे आवळ्याचा रस किंवा कच्चा आवळा तुम्ही खाऊ शकता. डोळ्यांची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी नियमित एक आवळा खावा. यामुळे डोळ्यांचे स्नायू बळकट होतात.
डोळ्यांची जळजळ झाल्यास, डोळ्यांवर थेट पाणी मारणे सुरक्षित आहे का?
नाही, थेट डोळ्यांवर पाणी मारणे सुरक्षित नाही.त्याऐवजी, ओल्या कापडाने डोळे स्वच्छ करा किंवा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे उपाय करा.
कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असल्यास काय काळजी घ्यावी?
डॉक्टरांनी सांगितलेल्या स्वच्छतेच्या नियमांचे पालन करा.लेन्स काढताना आणि लावताना स्वच्छ हाताने करा.
डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?
वर्षातून एकदा तरी डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. यामुळे दृष्टीदोषांची लवकर ओळख होऊन त्यावर उपचार करता येतात. घराबाहेर पडताना किंवा काम करताना डोळ्यांना चष्मे वापरा. पोहताना गॉगल आणि बागकाम करताना सुरक्षा चष्मा वापरा.