
आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल स्वच्छ! नियमित करा 'या' पदार्थांचा आहारात समावेश, तयार होतील चांगले बॅक्टेरिया
आतड्या निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?
फायबर असलेले पदार्थ कोणते?
आतड्यांमध्ये घाण कुजण्याची कारणे?
हल्ली लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच पोट स्वच्छ होत नाही, असे कायमच सांगतात.पोटात जमा झालेल्या विषारी घटकांमुळे आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे कायमच शरीरातील घाण बाहेर पडून जाणे फार आवश्यक आहे. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, कमी पाण्याचे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी गोष्टीच्या परिणामामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुद्धा पूर्णपणे बिघडून जाते. आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून न गेल्यास ऍसिडिटी आणि अपचनाच्या असंख्य समस्या उद्भवतात. पोटामध्ये असलेले कोट्यवधी सूक्ष्म जीवाणू मानसिक आरोग्यासोबतच शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीसोबतच उर्जेवर सुद्धा गंभीर परिणाम करतात. त्यामुळे पोट स्वच्छ होणे अतिशय महत्वाचे आहे. यकृत आणि आतडे शरीराचा दुसरा मेंदू मानला जातो. त्यामुळे आतड्यांमध्ये घाण जमा झाल्यास मानसिक आरोग्यावर परिणाम होईल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये कुजलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी कोणते पदार्थ खावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – pinterest)
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर कलिंगड उपलब्ध असतात. कलिंगडमध्ये ९० टक्के पाणी असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नियमित कलिंगड खावे. कलिंगड खाल्ल्यामुळे केवळ पाण्याची कमतरता भरून न निघता आतड्यांमध्ये जमा झालेली घाण सुद्धा बाहेर पडून जाते. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची पातळी संतुलि ठेवण्यासाठी कलिंगड खाण्याचा सल्ला कायमचा दिला जातो. कलिंगडासोबतच लिंबाच्या रसाचे सुद्धा सेवन करावे. सायट्रिक ॲसिड पचन क्रियेतील एन्झाईम्सना चालना देतात. आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कलिंगड आणि लिंबाचा रस एकत्र करून प्यावा. यामध्ये असलेल्या फायबरमुळे आतडे स्वच्छ होतील.
सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर नियमित एक किंवा दोन खजूर खावेत. खजूर खाल्ल्यामुळे शरीरात उष्णता टिकून राहते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात. कायमच साखरेपासून बनवलेले पदार्थ खाण्याऐवजी खजूर खावा. पोटातील फायदेशीर जीवाणूंना पोषण देण्यासाठी खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. खजूर खाल्ल्यामुळे शरीरातील उर्जेवर तात्काळ परिणाम दिसून येतो.
ब्रोकोलीचे नाव ऐकल्यानंतर अनेक लोक नाक मुरडतात. पण ही भाजी आतड्यांसाठी खूप जास्त फायदेशीर मानली जाते. ब्रोकोलीमध्ये खूप जास्त फायबर असते. फायबर असलेले पदार्थ शरीरासाठी अतिशय महत्वाचे ठरतात. तसेच यामध्ये असलेली सल्फोराफेन सारखी संयुगे आतड्यांचे अस्तर मजबूत करतात आणि सूज येण्यापासून रोखतात. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी ब्रोकोलीपासून बनवलेले सॅलड किंवा सूप बनवून प्यावे. ब्रोकोली जास्त शिजवू नये. हलकीशी वाफवावी.
आंबट गोड चवीची बेरीज खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. ब्लूबेरी, रास्पबेरी आणि स्ट्रॉबेरी सारख्या चमकदार रंगाच्या बेरीज रोजच्या आहारात खाव्यात. यामध्ये असलेले फायबर आणि पॉलीफेनॉल आतड्या निरोगी ठेवतात. याशिवाय यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील आतील अवयवांना आलेली सूज कमी करण्यासाठी मदत करतात.
Ans: नियमित पचन, अपचन किंवा गॅसचा त्रास नसणे, अन्नाचे योग्य शोषण होणे आणि ऊर्जेची पातळी उत्तम असणे ही चांगली लक्षणे आहेत।
Ans: फळे, भाज्या, कडधान्ये खा, साखर, दही, ताक, लोणचे, डोसा/इडली
Ans: दह्यासारखे जिवंत चांगले जीवाणू जे आतड्यात वाढतात, प्रीबायोटिक्स फायबरयुक्त अन्न जे या जीवाणूंना खायला देतात