Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नियमित पेनकिलरच्या गोळ्या खाणे शरीरासाठी ठरेल घातक! जाणून घ्या कोणत्या पद्धतीने पेनकिलर घेणे शरीरासाठी ठरेल सुरक्षित

वारंवार पेनिकलरच्या गोळ्यांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास किडनीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. याशिवाय शरीरसंबंधित गंभीर आजारांचा धोका सुद्धा वाढतो. चला तर जाणून घेऊया पेनिकलरचे शरीरावर होणारे दुष्परिणाम.

  • By सुरुची कदम
Updated On: May 23, 2026 | 08:11 AM
नियमित पेनकिलरच्या गोळ्या खाणे शरीरासाठी ठरेल घातक! जाणून घ्या कोणत्या पद्धतीने पेनकिलर घेणे शरीरासाठी ठरेल सुरक्षित

नियमित पेनकिलरच्या गोळ्या खाणे शरीरासाठी ठरेल घातक! जाणून घ्या कोणत्या पद्धतीने पेनकिलर घेणे शरीरासाठी ठरेल सुरक्षित

Follow Us
Follow Us:

अतिप्रमाणात पेनकिलर खाल्ल्यामुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम कोणते?
पेनकिलर खाल्ल्यामुळे शरीराला होणारे तोटे?
पेनिकलर खाण्याची योग्य पद्धत?

धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीरात खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा कायमच जाणवतो. यासोबतच डोकेदुखी, अंगदुखी किंवा सांधेदुखी इत्यादी समस्या उद्भवतात. शरीरसंबंधित दुखणी वाढल्यानंतर बऱ्याचदा अनेकांना मेडिकलमधील पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन करण्याची खूप जास्त सवय असते. डोकं दुखी किंवा सामान्य सर्दी खोकला झाल्यानंतर लगेच पेनकिलरची गोळी आणून खाल्ली जाते. सतत पेनकिलरच्या गोळ्या खाल्ल्यामुळे किडनीच्या आरोग्याला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. NSAIDs सारखी धोकादायक औषध सारखीच घेतल्यानंतर पोटातील अल्सर, अ‍ॅसिडिटी, अंतर्गत रक्तस्त्राव आणि किडनी निकामी इत्यादी आजारांचा धोका वाढू शकतो. याशिवाय बऱ्याचदा रक्तदाब वाढणे आणि हृदयविकाराचा झटका येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे अंगदुखी किंवा इतर सामान्य समस्यांवर पेनकिलरच्या गोळ्यांचे अजिबात सेवन करू नये.(फोटो सौजन्य – istock)

अंगदुखी किंवा सर्दी खोकला झाल्यानंतर कायमच पॅरासिटामॉल घेतली जाते. पण अतिप्रमाणात पॅरासिटामॉल गोळी खाल्ल्यास लिव्हर निकामी होऊ शकते. त्यामुळे शरीरात वाढलेल्या वेदनांवर औषधे घेण्याऐवजी मूळ कारण शोधणे आणि डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे फार आवश्यक आहे. अनेक महिला मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पेनकिलरच्या गोळ्या किंवा पाळी पुढे मागे येण्यासाठी गोळ्या खातात. याच गोळ्या कालांतराने शरीरासाठी विषासमान ठरतात. चला तर जाणून घेऊया अतिप्रमाणात पेनकिलर खाल्ल्यामुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम.

अतिप्रमाणात पेनकिलर खाल्ल्यामुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम कोणते:

पेनिकलरच्या गोळ्या आतून संपूर्ण शरीर पोखरून काढतात. दिवसभराच्या कामानंतर होणारे अंगदुखी किंवा डोकेदुखीचा त्रास वाढू लागल्यास पेनिकलरच्या गोळ्या खाण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे फार आवश्यक आहे. पेनिकलर गोळी खाल्ल्यामुळे तात्पुरता आराम मिळतो आणि पुन्हा एकदा आरोग्यासंबंधित समस्या वाढू लागतात. त्यामुळे पेनिकलर तुमचे वय आणि शारीरिक क्षमता इत्यादी अनेक गोष्टींवर अवलंबून असतात. पेनिकलरच्या गोळ्यांमध्ये सार्वधिक वापर आयबुप्रोफेन, डायक्लोफेनॅक, नॅप्रॉक्सेन इत्यादींचा समावेश असतो. त्यामुळे या गोळ्या शरीराला हानी पोहचवतात.

सतत पेनिकलर खाल्ल्यामुळे पोटात जळजळ होणे, अ‍ॅसिडिटी, अल्सर किंवा शरीरा अंतर्गत रक्तस्त्राव होण्याचा जास्त धोका असतो. याशिवाय वृद्ध, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी पेनकिलरच्या गोळ्यांचे अजिबात सेवन करू नये. दररोज पेनकिलरची गोळी खाल्ल्यामुळे किडनी निकामी होऊन किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. योग्य प्रमाणात पॅरासिटामॉल घेणे फायदेशीर असले तरीसुद्धा सतत घेतल्यामुळे आरोग्य बिघडते. डोकेदुखीसाठी सतत गोळ्या घेतल्याने ‘मेडिकेशन ओव्हरयुज हेडेक’ नावाचा गंभीर आजार होऊ शकतो. हा आजार सतत गोळ्या औषधांचे सेवन केल्यामुळे होतो.

कोणती औषधे सुरक्षित मानली जातात?

डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेल्या पेनिकलरच्या गोळ्या शरीरसंबंधित कोणताही धोका निर्माण करत नाही. पॅरासिटामॉल सर्दी, खोकला किंवा ताप आल्यानंतर सौम्य प्रमाणात घेतल्यास कोणतीही समस्या उद्भवणार नाही. शरीराच्या कोणत्याही अवयवावर जखम झाल्यास किंवा लागल्यास मेडिकलमधील गोळ्या खाण्याऐवजी जेल, स्प्रे किंवा पॅचेस लावावेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेनकिलरच्या गोळ्या जास्त प्रमाणात घेऊ नये. अ‍ॅसिडिटी, अल्सर, किडनी किंवा यकृताचे आजार, उच्च रक्तदाब किंवा हृदयाची समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध उपचार करावेत. अचानक झालेली दुखापत किंवा स्नायूंचा ताण किंवा मायग्रेनचा त्रास होत असल्यास डोकेदुखीवरील पेनकिलरची गोळी खाऊ शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पेनकिलर जास्त प्रमाणात घेतल्यास कोणते दुष्परिणाम होऊ शकतात?

    Ans: अॅसिडिटी, पोटातील अल्सर, मळमळ, रक्तदाब वाढणे, किडनीचे नुकसान आणि लिव्हर समस्या निर्माण होऊ शकतात.

  • Que: प्रत्येक वेदनेसाठी पेनकिलर घेणे योग्य आहे का?

    Ans: नाही. वारंवार वेदना होत असल्यास त्यामागील कारण शोधणे महत्त्वाचे असते. सतत औषधे घेण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • Que: पेनकिलरमुळे किडनीवर परिणाम होऊ शकतो का?

    Ans: होय. दीर्घकाळ आणि जास्त प्रमाणात पेनकिलर घेतल्यास किडनीच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.

Web Title: Eating regular painkiller pills will be dangerous for the body learn how taking painkillers is safe for the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 08:11 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • liver care
  • Medicines Issue

संबंधित बातम्या

रोजच्या आहारात नियमित खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ! शरीरात दिवसभर टिकून राहील ऊर्जा, दिसाल अधिक तरुण
1

रोजच्या आहारात नियमित खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ! शरीरात दिवसभर टिकून राहील ऊर्जा, दिसाल अधिक तरुण

मुतखड्याचा वेदनांनी हैराण झाला आहात? किडनी निकामी होण्याआधी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, स्टोन पडून जाईल बाहेर
2

मुतखड्याचा वेदनांनी हैराण झाला आहात? किडनी निकामी होण्याआधी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, स्टोन पडून जाईल बाहेर

लघवी मार्गात वारंवार संसर्ग का होतो? UTI इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, अन्यथा मूत्राशयावर होईल परिणाम
3

लघवी मार्गात वारंवार संसर्ग का होतो? UTI इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, अन्यथा मूत्राशयावर होईल परिणाम

High BP: फक्त मोठ्यांनाच नाही! लहान मुलांनाही होऊ शकतो हाय ब्लड प्रेशर, जाणून घ्या कारणे
4

High BP: फक्त मोठ्यांनाच नाही! लहान मुलांनाही होऊ शकतो हाय ब्लड प्रेशर, जाणून घ्या कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.