Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hedache Causes: सकाळी उठल्यानंतर कायमचं डोकं दुखत? ‘ही’ लक्षणे दिसताच अजिबात करू नका दुर्लक्ष, आजारांपासून मिळेल सुटका

Hedache Causes: सकाळी उठल्यानंतर वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा गंभीर आजार होऊ शकतात. मायग्रेन, अपुरी झोप आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर सुद्धा डोकेदुखीची समस्या उद्भवते.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 21, 2026 | 08:19 AM
सकाळी उठल्यानंतर कायमचं डोकं दुखत? 'ही' लक्षणे दिसताच अजिबात करू नका दुर्लक्ष, आजारांपासून मिळेल सुटका

सकाळी उठल्यानंतर कायमचं डोकं दुखत? 'ही' लक्षणे दिसताच अजिबात करू नका दुर्लक्ष, आजारांपासून मिळेल सुटका

Follow Us
Follow Us:

Hedache Causes: सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोकेदुखी किंवा अचानक चक्कर आल्यासारखे वाटू लागते. डोकेदुखीचा परिणाम एकाग्रतेवर, मूडवर आणि दिवसभराच्या संपूर्ण कामावर होतो. अपुरी झोप, डिहायड्रेशन किंवा बिघडलेली दिनचर्या इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे वारंवार सकाळी उठल्यानंतर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. माइग्रेन, झोपेच्या समस्या किंवा जीवनशैलीतील बदलांचा परिणाम संपूर्ण शरीरावर लगेच दिसून येतो. चला तर जाणून घेऊया सकाळी डोकेदुखी होण्याची कारणे, माइग्रेन आणि स्लीप ॲप्नियाचा संबंध काय, याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

Climate Change Breaking : २००८ पासून दररोज एक उष्णतेचे वादळ पृथ्वीवर आदळतंय ;नेमकं काय घडतंय ?

सकाळी उठल्यानंतर डोकं दुखण्याची कारणे:

सकाळी उठल्यानंतर विविध कारणांमुळे डोकेदुखी होण्याची जास्त शक्यता असते. नियमित झोपेची वेळ, अपुरी झोप आणि वारंवार झोपमोड होणे इत्यादी अनेक कारणांमुळे संवेदनशील व्यक्तींमध्ये डोकेदुखीचा त्रास होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय उशिरापर्यंत स्क्रीनचा वापर, जास्त कॅफिन किंवा अचानक कॅफिन बंद केल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होतो. उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे आणि प्रखर घाम, मद्यपान केल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होतो आणि संपूर्ण दिवस खराब होऊन जातो. वारंवार सकाळी डोकेदुखी, झोपेची वेळ, डोकेदुखीचा कालावधी, तीव्रता, औषधोपचार आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे डोकेदुखीचा त्रास वाढतो.

माइग्रेनचा त्रास सुरु झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

तीव्र स्वरूपाची धडधडणारी वेदना
मळमळ
तीव्र डोकेदुखी
आवाजाची संवेदनशीलता
खाण्यापिण्याची इच्छा न होणे.

स्लीप ॲप्निया आणि सकाळच्या डोकेदुखीशी नेमका काय आहे संबंध:

ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया हा झोपेसंबंधित गंभीर आजार आहे. ज्यामुळे झोपेत असताना श्वसनमार्ग वारंवार संकुचित होतो किंवा बंद पडल्यासारखा वाटतो. श्वासोच्छवासात खंड पडल्यामुळे रक्तातील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडच्या पातळीत बदल होण्यास सुरुवात होते. पुरेशी झोप घेऊनही प्रचंड थकवा जाणवणे, दिवसभर झोप अनावर होणे, घोरणे, झोपेत अचानक श्वास अडकून जाग येणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.

Indian Vegetables: जेवणाच्या ताटात असायला हव्यात ‘या’ शक्तिशाली भाज्या, अशक्तपणा कमी होण्यासोबतच शरीराला मिळेल आवश्यक पोषण

सकाळी उठल्यानंतर वाढलेल्या डोकेदुखीमागे अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात. झोपेत नकळत दात खाण्याच्या सवयीमुळे जबड्यावर आणि कण्यावर ताण येऊन सकाळी उठल्यानंतर कपाळाच्या बाजूला वेदना होऊ लागतात. तीव्र डोकेदुखी वाढल्यानंतर बऱ्याचदा मेडिकलमधील पेनकिलरच्या गोळ्या आणून खाल्ल्या जातात. पण वारंवार पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन केल्यास किडनीच्या आरोग्यावर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. साधा किंवा मध्यम उच्च रक्तदाब सहसा डोकेदुखी निर्माण करत नाही, पण उच्च रक्तदाबाची पातळी वाढल्यानंतर तीव्र डोकेदुखीचा त्रास होतो आणि मेंदू आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सकाळी उठल्यानंतर डोके दुखण्याची प्रमुख कारणे कोणती?

    Ans: सकाळी उठल्यानंतर डोके दुखण्यामागे झोप पूर्ण न होणे, शरीरात पाण्याची कमतरता, मायग्रेन, ताणतणाव, सायनसचा त्रास किंवा झोपेत श्वास घेण्यास अडथळा येणे (स्लीप ॲप्निया) अशी विविध कारणे असू शकतात.

  • Que: रोज सकाळी डोके दुखत असल्यास कोणत्या आजाराचे संकेत असू शकतात?

    Ans: वारंवार सकाळी डोके दुखणे हे मायग्रेन, स्लीप ॲप्निया किंवा इतर आरोग्य समस्यांशी संबंधित असू शकते. मात्र, केवळ डोकेदुखीवरून एखाद्या आजाराचे निदान करता येत नाही. नियमित त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • Que: झोप पूर्ण न झाल्यामुळे सकाळी डोके दुखते का?

    Ans: होय. अपुरी झोप, झोपेच्या वेळेतील अनियमितता आणि झोपेची गुणवत्ता खराब असणे यांमुळे काही लोकांना डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

Web Title: Causes of headaches do you constantly wake up with a headache in the morning do not ignore these symptoms sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 08:19 AM

Topics:  

  • brain
  • Headache pain
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

सांध्यांना कायमच सूज येते? मग युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
1

सांध्यांना कायमच सूज येते? मग युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

World Osteoporosis Day: फॅक्चर झाल्यानंतरच कळते हाडांचे आरोग्य! सरकारी रुग्णालयांत वर्षभरात साडेतीन हजार तपासण्या
2

World Osteoporosis Day: फॅक्चर झाल्यानंतरच कळते हाडांचे आरोग्य! सरकारी रुग्णालयांत वर्षभरात साडेतीन हजार तपासण्या

नियमित किती लिटर पाणी प्यायल्यास वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल? जाणून घ्या पाणी आणि वजनचा काय आहे संबंध
3

नियमित किती लिटर पाणी प्यायल्यास वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल? जाणून घ्या पाणी आणि वजनचा काय आहे संबंध

Health Tips: सतत थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? रोज खा ‘ही’ एक गोष्ट;  शरीराला मिळतील अनेक फायदे
4

Health Tips: सतत थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? रोज खा ‘ही’ एक गोष्ट; शरीराला मिळतील अनेक फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.