
पिगमेंटेशनमुळे चेहरा काळा पडला आहे? मग 'या' पद्धतीने करा बटाट्याचा वापर
वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात सुरकुत्या येणे, वांग, काळे डाग, पिगमेंटेशन इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन केअरचा आणि महागड्या प्रॉडक्टचा वापर करतात. पण वारंवार चेहऱ्यावर कोणत्याही क्रीम लावल्यास त्वचेचे नुकसान होऊ शकते. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे आणि पचनाच्या समस्यांमुळे चेहऱ्यावर सतत पिंपल्स आणि फोड येतात. त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेल्या घाणीमुळे पिंपल्स येतात. चेहऱ्यावर आलेले हे पिंपल्स लवकर निघून जात नाही. पिंपल्स गेल्यानंतर त्याचे काळे डाग चेहऱ्यावर तसेच राहतात. चेहऱ्यावरील सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी कायमच बाजारातील महागड्या प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती उपाय करावेत.(फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावर वाढलेले पिगमेंटेशन कमी करण्यासाठी स्किनब्राइटनिंग क्रीमचा वापर न करता घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. चेहऱ्यावर आलेले पिगमेंटेशन घालवण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर करावा. यामध्ये जीवनसत्त्व सी, जीवनसत्त्व बी६, पोटॅशियम आणि नैसर्गिक एन्झाइम्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी आणि त्वचा कायमच हायड्रेट ठेवण्यासाठी बटाटा वापरावा. बटाट्याचा रस त्वचेसाठी फायदेशीर आहे. यामुळे त्वचा थंड राहते आणि चेहऱ्यावरील डाग कमी होतात.
वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या आणि पिगमेंटेशन वाढू लागते. हे घालवण्यासाठी बटाटा किसून त्याचा रस काढावा. बटाट्यातील कॅटेकोलेस हे एन्झाइम मेलेनिन कमी करण्यासाठी मदत करते. मेलेनिन वाढल्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग येतात. उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि डाग कमी करण्यासाठी बटाट्याच्या रसात गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. बटाट्याचा रस ओठांवर सुद्धा लावावा. डोळ्यांखाली वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी बटाट्याची साल फायदेशीर ठरते.
बटाट्याचा रस वाटीमध्ये घेऊन कापसाच्या गोळ्याने चेहऱ्यावर आलेल्या पिगमेंटेशन वर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक कायम टिकून राहते आणि चेहरा अधिक सुंदर दिसतो. चेहऱ्यावर आलेली सूज कमी करण्यासाठी बटाटा फायदेशीर आहे. पिंपल्स, फोड किंवा चेहऱ्यावर मुरूम आल्यानंतर बटाट्याचा रस लावावा.