
Ganesh Chaturthi 2026 : भारतातील 5 सुप्रसिद्ध गणपती पंडाल, एकदा तरी नक्की भेट द्या
Travel News : भारतातील अनोखा समुद्रकिनारा जिथे लाटा अचानक होतात गायब, अनेक तासांनी परतते पाणी
लालबागचा राजा, मुंबई
गणेशोत्सव आणि लालबागचा राजा यांच नातं काहीसं आगळचं. देशभरात गणपती पंडालात लालबागच्या राजाचे नाव हे नेहमीच प्रथमस्थानी येते. दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी इथे जमते. याची सुरुवात १९३४ मध्ये लालबागचा राजा गणेशोत्सव मंडलाद्वारे करण्यात आली. हा गणपती “नवसाला पावणारा गणपती” म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. आपली भव्य सजावट, जुना इतिहास आणि भक्तांच्या अतूट श्रद्धेसाठी हे ठिकाण फार लोकप्रिय आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति, पुणे
पुण्यात गेला आणि दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले नाहीत तर तुमची पुणे ट्रीप निरर्थक आहे. दरवर्शी गणेशोत्सवानिमित्त या ठिकाणीही भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि श्रीमंत मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. इथे भक्ती, संस्कृती आणि उत्कृष्ट सजावटीचा आनंद लुटता येतो.
दिल्लीचा महाराजा, दिल्ली
दिल्लीतही गणेशाचा थाट काही कमी नव्हे, गणेशोत्सवात दिल्ली देखील भक्तीमय रसाने न्हाहून निघते. इथे लक्ष्मी नगर येथील महाराजा गणेश पंडाल खूप जास्त लोकप्रिय आहे. अनेक वर्षांपासून इथे गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी जमते.
इंदु मुनानी का गणेश चतुर्थी पंडाल, चेन्नई
गणेशोत्सवात चेन्नई येथे इंदु मुनानी का गणेश चतुर्थी पंडाल आयोजित केला जातो. आपल्या पर्यावरणपूरक आणि रचनात्मक थीमसाठी हा पंडाल फार लोकप्रिय आहे. मागील वर्षी इथे ५००० पुस्तकांपासून गणेशाची मूर्ती साकारण्यात आली होती. मुख्य म्हणजे, सण संपल्यानंतर त्यांनी ही पुस्तके स्थानिक आणि गरजू लोकांमध्ये वाटून एक सामाजिक संदेशही दिला.
आनंदी आणि तणावमुक्त जीवनाचं सीक्रेट; जपानी जीवनशैलीच्या ६ सवयी ठरतीय फायदेशीर
खैरताबाद गणेश उत्सव, हैदराबाद
स्वातंत्र्य सेनानी एस. शंकरय्या यांनी १९५४ मध्ये खैरताबाद येथे श्री गणेश उत्सव समितीची स्थापना केली. १ फूटाच्या मूर्तीसह याची सुरुवात करण्यात आली होती. आता मात्र इथे गणेशाीची विशाल आणि भव्य मूर्ती पाहायला मिळते. दरवर्षी हजारो भाविक येथील उंच आणि भव्य गणेशाची मूर्ती पाहायला जमतात. ही मूर्ती पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार केली जाते.