Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आषाढी वारीला पंढरपूरला जाता येत नाही? महाराष्ट्रातील ‘या’ प्रसिद्ध श्रीविठ्ठल मंदिरांना द्या भेट

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक विविध मंदिरांना भेट देतात. पंढरपूरसह महाराष्ट्रातील अनेक श्रीविठ्ठल मंदिरे श्रद्धा, इतिहास आणि आध्यात्मिक परंपरेसाठी प्रसिद्ध आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 24, 2026 | 02:46 PM
आषाढी वारीला पंढरपूरला जाता येत नाही? महाराष्ट्रातील 'या' प्रसिद्ध श्रीविठ्ठल मंदिरांना द्या भेट

आषाढी वारीला पंढरपूरला जाता येत नाही? महाराष्ट्रातील 'या' प्रसिद्ध श्रीविठ्ठल मंदिरांना द्या भेट

Follow Us
Follow Us:
  • पंढरपूरव्यतिरिक्त राज्यातील अनेक ठिकाणी श्रीविठ्ठलाची प्राचीन मंदिरे आहेत.
  • आषाढीच्या काळात या मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
  • प्रत्येक मंदिराचा इतिहास, परंपरा आणि धार्मिक महत्त्व वेगळे आहे.
श्रीविठ्ठल म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर सर्वात आधी पंढरपूरची विटेवर उभी असलेली सावळी मूर्ती येते. यंदा तुम्हाला आषाढी वारीला पंढरपूरला जाणे शक्य नसेल, तर राज्यातील इतर प्रसिद्ध मंदिरांमध्ये जाऊन तुम्ही श्रीविठ्ठलाचे दर्शन घेऊ शकता. केवळ सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच नव्हे, तर विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि प. महाराष्ट्रातही श्रीविठ्ठलाची अशी काही मंदिरे आहेत, जिथे दरवर्षी लाखो भाविक नतमस्तक होतात.

Pune Coffee Culture: कटिंग चहा ते कोल्ड ब्रू… पुण्यात रंगतंय ‘कॉफी कल्चर’!

ठाणे

ठाण्यातील पेशवेकालीन मंदिर २०५ वर्षे जुने असून, रेल्वे स्थानकापासून १० ते १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. हे मंदिर इ.स. १८१८मध्ये (पेशवेकाळात) पंडित कुटुंबाने बांधले होते.

कोल्हापूर

कोल्हापूरपासून १२ किमीवर असलेले नंदवाळ येथे प्रसिद्ध श्रीविठ्ठल मंदिर आहे. या गावचा प्राचीन उल्लेख नंदिग्राम असा आहे. ‘करवीर माहात्म्य ग्रंथात केलेल्याउल्लेखात श्रीविठ्ठल रोज रात्री या ठिकाणी वास्तव्यासाठी येतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

औंध

औंध येथील श्रीविठ्ठलाचे मंदिर सुमारे २८५ वर्षांपूर्वी पेशव्यांच्या काळात बांधण्यात आले आहे. आषाढीला या मंदिरात लाखो भाविक गर्दी करतात.

अमरावती

आषाढीला विदर्भातील लाखो भाविक श्रीविठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील कौडिण्यपूर येथील मंदिरात येतात. कौडिण्यपूर हे माता रुक्मिणीचे माहेरघर असल्याचे म्हटले जाते.

Travel News : काशि विश्वनाथांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत… श्रावणात या शिवमंदिरांचे घ्या दर्शन

वडाळा

वडाळ्याचे श्रीविठ्ठल मंदिर ४०० वर्षांपूर्वीचे आहे. वडाळा मिठागरांसाठी ओळखले जायचे. बहुतेक लोक मिठाचा व्यापार करायचे. एकदा काम करताना मिठागरात त्यांना श्रीविठ्ठल-रखुमाईची मूर्ती सापडली. त्यांनी ही गोष्ट पंढरपूरला जाऊन श्रीतुकाराम महाराजांना सांगितली. तेव्हा महाराजांनी या मूर्तीची तेथेच स्थापना करण्याचा सल्ला दिला. वापऱ्यांनी या मंदिरांची स्थापना केली.

 

Web Title: Famous vitthal temples in maharashtra beyond pandharpur ashadhi ekadashi travel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Ashadhi Wari 2026
  • Religious Places
  • vitthal mandir

संबंधित बातम्या

Maharashtra News: ‘कृष्णा’च्या आरोग्य वारीने दिली वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा
1

Maharashtra News: ‘कृष्णा’च्या आरोग्य वारीने दिली वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा

Marathi Serial: आषाढी वारीचा भक्तिरंग झी मराठीवर! ‘सनई चौघडे’ आणि ‘कमळी’मध्ये रंगणार खास वारी विशेष भाग
2

Marathi Serial: आषाढी वारीचा भक्तिरंग झी मराठीवर! ‘सनई चौघडे’ आणि ‘कमळी’मध्ये रंगणार खास वारी विशेष भाग

उपवासाच्या दिवशी साबुदाणे, बटाटा खाऊन कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ग्लूटेन फ्री राजगिरा सुकडी
3

उपवासाच्या दिवशी साबुदाणे, बटाटा खाऊन कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ग्लूटेन फ्री राजगिरा सुकडी

‘पांडुरंगाचे बोलवणं आले अन्…’ अभिनेत्री अक्षया नाईकने सांगितला पहिल्या वारीचा अनुभव, भावना व्यक्त करत म्हणाली…
4

‘पांडुरंगाचे बोलवणं आले अन्…’ अभिनेत्री अक्षया नाईकने सांगितला पहिल्या वारीचा अनुभव, भावना व्यक्त करत म्हणाली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.