Jejuri Accident: जेजुरी जवळ पंढरपूर वारीला निघालेल्या महिला वारकऱ्यांच्या जत्थ्याला ट्रकने उडवले. या अपघातात ३ वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर.
कोरेगाव सायकल प्रेमी फाउंडेशनच्या वतीने आयोजित ५ व्या पंढरपूर सायकल वारीचे आज थाटात प्रस्थान झाले. आमदार महेश शिंदे यांनी भगवा झेंडा दाखवून १०० हून अधिक सायकल पटूंना रवाना केले.
Prajakta Gaikwad : मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने व्यग्र शूटिंग शेड्युलमधून वेळ काढत आषाढी वारीत सहभाग घेतला. वारीतले सुंदर फोटो शेअर करत तिच्या साधेपणाने चाहत्यांची मनं जिंकली.
आषाढी एकादशी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाने ५,५०० विशेष एसटी बसची घोषणा केली आहे. ४० किंवा अधिक भाविकांनी नोंदणी केल्यास गावातून थेट पंढरपूर बस सेवा मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोफत आणि…
वारीत चालताना अनेक वारकरी आपल्या कुटुंबीयांपासून शेकडो किलोमीटर दूर असतात.घरच्यांना केवळ एक फोन करून ‘मी सुखरूप आहे’ एवढे सांगणेही त्यांच्यासाठी अमूल्य असते.
पालखीसोहळ्यात विठ्ठलाच्या मूर्तीच्या वरच हे प्रभामंडळ दिसल्याने अनेक भाविकांनी त्याला आध्यात्मिक अर्थही जोडला. अध्यात्मात देव किंवा पवित्र व्यक्तीच्या भोवती दिसणाऱ्या तेजोवलयालाही प्रभामंडळ असे संबोधले जाते.
आषाढी वारीसाठी आळंदीहून पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने किसन वीर साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला आहे.
यंदाच्या वारीने पुणे शहराला भक्ती, संस्कृती आणि पर्यटनाचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी दिली असून बाजारपेठांपासून ऐतिहासिक वास्तूंपर्यंत सर्वत्र विठ्ठलनामाचा गजर आणि वारकरी संप्रदायाचा उत्साह पाहायला मिळाला.
'पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा' या माहितीपटाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचिताचे डिजिटल युगातले एक दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. देशातल्या भक्ती मार्गातली वारी ही सर्वात प्राचीन परंपरा आहे, ती सर्वांना मोठी…
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आधार हाऊसिंग फायनान्सने वारकऱ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. प्रवासादरम्यान भाविकांना विश्रांतीची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच, घरमालकीबाबत जनजागृती करण्यासाठी कंपनी पथनाट्य आणि विविध…
महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या 'पुणे प्रथम-सेवावारी २०२६' उपक्रमांतर्गत दोन्ही पालखी सोहळ्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आले.
आदेश बांदेकर मुलगा सोहम बांदेकर आणि सुन पूजा बिरारीसोबत आषाढी वारीत सहभागी होणार आहेत. वारीपूर्वीचा VIDEO शेअर करत त्यांनी पूजासोबतचा खास संवादही सांगितला.
यंदाच्या आषाढी एकादशीच्या वारीत ३० ते ३२ लाख भाविक सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम वेगाने सुरू आहे.वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, वारकऱ्यांच्या सोयीसाठी वाळवंटात…
दरवर्षी लाखो वारकरी देहूपासून पंढरपूरपर्यंत चालत जातात. त्यांच्या प्रत्येक पावलात श्रद्धा असते, प्रत्येक अभंगात भक्ती असते आणि प्रत्येक श्वासात विठ्ठलाचे नाम असते. म्हणूनच संत तुकाराम महाराजांची पालखी ही केवळ महाराष्ट्राची…
राज्य सरकारने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, संबंधित टोल कंत्राटदारांना राज्य शासनाकडून भरपाई दिली जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे.
आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी किंवा इतर धार्मिक पर्वांच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरला जाऊन चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात. हिंदू धर्मात चंद्रभागा नदीला अत्यंत पवित्र मानले जाते. या नदीत स्नान केल्याने…
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चैत्र, आषाढी, कार्तिकी आणि माघ यात्रांसह वर्षभरात एक कोटींहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः यात्राकाळात लाखो वारकरी आणि भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने दर्शनासाठी अनेक तास प्रतीक्षा…
आळंदीतील धोक्याची स्थिती पाहता, आळंदीत प्रशासनाकडून नियंत्रण कक्ष स्थापन केला जावा असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आली आहे. तरी सुरक्षतेच्या दृष्टीने पालखी सोहळ्यात पुणे महानगपालिकेच्या हद्दीपासून अथवा त्यापुढच्या भागापासून सहभागी व्हावे
सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या चौकांमध्ये व गर्दीच्या ठिकाणी एकूण ४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी २२ ठिकाणी टँकरची व्यवस्था करण्यात आली असून, महत्त्वाच्या ठिकाणी विद्युत प्रकाशझोत उभारण्यात आले आहेत.