Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंघोळ करताना पाण्याची भीती वाटते? तुम्हाला असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, शरीरात दिसू लागतात लक्षणे

अबलुटोफोबिया झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला अबलुटोफोबिया म्हणजे काय? अबलुटोफोबियाची लक्षणे? जाणून घ्या सविस्तर माहिती.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 04, 2025 | 05:30 AM
अबलुटोफोबिया म्हणजे काय?

अबलुटोफोबिया म्हणजे काय?

Follow Us
Close
Follow Us:

शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित सकाळी सगळेच अंघोळ करतात. अंघोळ केल्यामुळे शरीर स्वच्छ होते, यासोबतच शरीरावर साचून राहिलेला घाम, उन्हामुळे चिकट झालेली त्वचा स्वच्छ होऊन आरोग्याला अनेक फायदे होतात. काहींना नियमित थंड पाण्याने अंघोळ करण्याची सवय असते, तर काहीजण गरम पाण्याची अंघोळ करतात. पण आपल्यातील काहींना अंघोळ करण्याची भीती वाटते. तुम्हाला जर प्रत्येक ऋतूमध्ये अंघोळ करण्याची भीती वाटतं असेल तर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. अंघोळ न करणाऱ्या लोकांना अबलुटोफोबिया या फोबियाची लागण होते. अबलुटोफोबिया हा मानसिक आजार असून, हा आजार झाल्यानंतर पाण्याची भयंकर भीती वाटू लागते. अबलुटोफोबिया झाल्यानंतर मानसिक आरोग्य बिघडून जाते.(फोटो सौजन्य – iStock)

रक्तातील साखर होईल कमी ! रोजच्या आहारात करा’ या’ रसाचे सेवन, शरीराला होतील अनेक फायदे

घरातील सर्वच सकाळी उठल्यानंतर नियमित अंघोळ करून शरीर स्वच्छ करतात. मात्र अबलुटोफोबियासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेले लोक अंघोळ करण्यास घाबरू लागतात. अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशनने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, अमेरिकेमध्ये सुमारे 8 ते 12 % प्रौढांना अबलुटोफोबिया नावाचा गंभीर आजार झाला आहे. या आजाराची लागण झालेल्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य पूर्णपणे खराब होऊन जाते. याशिवाय जीवनशैलीवर वाईट परिणाम दिसून येतो.

अबलुटोफोबिया म्हणजे काय?

अबलुटोफोबिया हा मानसिक आजारांसंबंधित गंभीर आजार आहे. या आजाराची लागण झालेल्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. ज्यांना नेहमी अंघोळ करताना किंवा पाण्यात गेल्यानंतर त्रास होऊ लागतो. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अबलुटोफोबियाचे प्रमाण वाढले आहे. मानसिक आरोग्यासंबंधित गंभीर आजार कोणत्याही व्यक्तीला आणि कोणत्याही वयात होण्याची शक्यता असते. त्यामुळे अबलुटोफोबियासारख्या गंभीर आजाराची लक्षणे शरीरात दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अबलुटोफोबियाची लक्षणे:

  • हृदयाचे ठोके वाढणे
  • बेशुद्ध होणे किंवा अचानक चक्कर येणे
  • शरीराचे तापमान अचानक गरम किंवा थंड होणे
  • तोंड कोरडे होणे
  • पाणी पाहून घाबरणे
  • श्वास घेण्यास त्रास होणे
अंघोळीसाठी साबण वापरत असाल तर थांबा! ‘या’ घरगुती पदार्थांचा वापर करून शरीर करा स्वच्छ, दुर्गंधी होईल कायमची गायब

पाण्याची भीती कशामुळे वाटते ?

अबलुटोफोबियासारख्या मानसिक आजाराची लागण झाल्यानंतर पाण्याची भीती वाटू लागते. अंघोळ करताना अनेक समस्या उद्भवू लागतात. अबलुटोफोबियाने त्रस्त असलेल्या लोकांना अंघोळ करताना अचानक घाम आल्यासारखे वाटणे, हृयद्याचे ठोके वाढणे इत्यादी अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. ही समस्या प्रामुख्याने लहान असताना पाण्याला घाबरल्यामुळे किंवा पाण्यात होणाऱ्या अपघातांमुळे उद्भवण्याची शक्यता असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Fear of water while bathing you may be at risk of this serious condition symptoms ablutophobia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • lifestyle tips
  • mental stress

संबंधित बातम्या

ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी
1

ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे
2

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे
3

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका
4

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.