Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Care Tips: उन्हात गेल्यानंतर लगेच चक्कर आल्यासारखे वाटते? मग तातडीने करा ‘हे’ घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

कडक उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर तुम्हाला सुद्धा वारंवार चक्कर येत असेल तर हे घरगुती उपाय करावे. पण घरगुती उपाय करून सुद्धा आराम न मिळाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 29, 2026 | 05:30 AM
उन्हात गेल्यानंतर लगेच चक्कर आल्यासारखे वाटते? मग तातडीने करा 'हे' घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

उन्हात गेल्यानंतर लगेच चक्कर आल्यासारखे वाटते? मग तातडीने करा 'हे' घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळ्यात सतत चक्कर का येते?
चक्कर येत असल्यास कोणते उपाय करावेत?
उन्हाळ्यात शरीराची कशी काळजी घ्यावी?

राज्यासह संपूर्ण देशभरात तापमानात वाढ झाली आहे. कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर शरीरात उष्णता वाढते आणि आरोग्य बिघडते. वाढत्या तापमानाचा थेट परिणाम आरोग्यावर दिसू लागतो. चक्कर येणे,अशक्तपणा जाणवणे किंवा अचानक डोळ्यासमोर अंधारी येणे अशा समस्या उद्भवू लागतात. कडक उन्हात बाहेर फिरायला गेल्यानंतर किंवा प्रवास करताना पाण्याचे आवश्यक प्रमाणात सेवन न केल्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कुठेही बाहेर फिरायला जाताना पाणी सोबत घेऊन जावे. बऱ्याचदा साधी चक्कर आल्यानंतर तिच्याकडे दुर्लक्ष केले जाते. उष्माघाताची समस्या उद्भवल्यानंतर कोणत्याही क्षणी चक्कर येऊ शकते. शरीरसंबंधित दिसणारी हे लक्षण धोक्याचे मानले जाते.(फोटो सौजन्य – istock)

Mouth Ulcer: तोंडात झालेल्या जखमांमुळे खाणे पिणे कठीण झाले आहे? मग अल्सर बरे करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर लगेच चक्कर आल्यासारखी वाटत असेल तर दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन किंवा जास्त घाम आल्यामुळे शरीरातील पाणी आणि मीठ दोन्ही घटक बाहेर पडून जातात. याच्या परिणामामुळे कमी रक्तदाब होऊन मेंदूच्या पेशींना योग्य रक्तपुरवठा होत नाही. मेंदूच्या पेशींना रक्तपुरवठा न झाल्यामुळे अचानक कोणत्याही वेळी चक्कर येते. याशिवाय जास्त वेळ उपाशी राहिल्यामुळे, जाड कपडे घातल्यास किंवा गरम जागेत उभे राहिल्यानंतर चक्कर येण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हातून बाहेर जाऊन आल्यानंतर चक्कर आल्यासारखे वाटल्यास हे घरगुती उपाय नक्की करून पहा.

उन्हाळ्यात चक्करपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय:

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. शरीर हायड्रेट आणि फ्रेश ठेवण्यासाठी पाणी प्यावे. दिवसभरात ३ ते ४ लिटरपेक्षा जास्त पाणी प्यावे. यामुळे डिहायड्रेशन किंवा पचनसंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. याशिवाय लिंबूपाणी, नारळ पाणी, ताक आणि इतर पेयांचे सेवन करावे. यामुळे शरीरातील मीठ आणि पाण्याचे संतुलन कायम टिकून राहते. कडक उन्हात कुठेही बाहेर जाताना पाण्याची बाटली, छत्री सोबत घेऊन जावी. उन्हापासून रक्षण करण्यासाठी छत्री फायदेशीर ठरेल.

दुपारच्या वेळी कडक उन्हात कुठेही बाहेर जाणे टाळावे. जास्त आवश्यकता असल्यास ४ नंतर बाहेर जावे. कुठेही बाहेर जाताना उपाशी पोटी बाहेर जाऊ नये. पोटभर अन्नपदार्थ खाऊनच बाहेर जावे. या दिवसांमध्ये हलका, पौष्टिक आहार, फळे, भाज्या, कोशिंबीर आणि जास्त पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीर हायड्रेट होण्यास मदत होते. अचानक चक्कर आल्यास साखर पाणी प्यावे. किंवा वारंवार चक्कर येत असल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. तसेच उन्हाळ्यात अतिशय सैल आणि सुती कपडे घालावेत.

देशातील 70% महिलांना PCOS-PCOD, वाढतोय वंध्यत्वाचा धोका; Swami Ramdev नी सांगितला रामबाण उपाय

सतत चक्कर येत असल्यास रिहायड्रेशन सोल्युशन प्यावे. शरीरात उष्णता वाढल्यास कपाळावर किंवा मानेला थंड पाण्याची पट्टी ठेवावी. यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. तुम्हाला जर जास्तच अशक्तपणा किंवा थकवा असल्यासारखे वाटत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उन्हाळ्यात येणारी चक्कर काहींना साधी वाटत असली तरीसुद्धा शरीरासाठी धोक्याची ठरू शकते. त्यामुळे तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Feeling dizzy right after being in the sun then immediately do this home remedy you will get immediate relief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Summer
  • summer care tips
  • summer heat

संबंधित बातम्या

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल
1

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल

कोंढव्यात 16 तास वीजपुरवठा खंडित; ऊन अन् विजेच्या अतिवापरामुळे केबलमध्ये बिघाड
2

कोंढव्यात 16 तास वीजपुरवठा खंडित; ऊन अन् विजेच्या अतिवापरामुळे केबलमध्ये बिघाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.