हाय कोलेस्ट्रॉलचे संकेत
सतत तुमचे पाय दुखतात आणि त्यामुळे दैनंदिन कामे करण्यात अडचणी येत आहेत तर, याकडे दुर्लक्ष करु नका. हे उच्च कोलेस्ट्रॉलच्या पातळीचे लक्षण असू शकते.अशावेळी विलंब न करता वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे योग्य राहील. डॉ. राहुल निकुंभे, जनरल फिजिशियन, अपोलो स्पेक्ट्रा मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे ती तुम्ही या लेखातून जाणून घ्या.
हल्ली कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या तरूणांपासूनच दिसून येते. त्याला अनेक कारणं आहे. बदलती लाइफस्टाइल, खाण्याच्या चुकीच्या पद्धती आणि अवेळी झोप हे अधिक कारणीभूत ठरते. पण काही वेळा याचे संकेत शरीर देत असतानाही आपण त्याकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणा करत असतो. मग अशावेळी नक्की कोणते संकेत आहेत याबाबत तज्ज्ञांकडून जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock)
चिंतेची बाब
कोलेस्ट्रॉल वाढण्याने काय होतं
केवळ रक्तातील साखरेची वाढलेली पातळी किंवा उच्च रक्तदाबच नाही तर उच्च कोलेस्टेरॉलची पातळी हा देखील चिंतेचा एक विषय ठरत आहे. उच्च कोलेस्टेरॉलला “सायलेंट किलर” म्हणून देखील ओळखले जाते जे एखाद्याच्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम करते. हे एक सर्वज्ञात सत्य आहे की उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होतो.
हेदेखील वाचा – नसांमध्ये साचलेले पिवळे फॅटी कोलेस्ट्रॉल होईल झर्रकन कमी, वर्षभर मिळणारे हे फळ खा!
काय आहे लक्षणे?
कोलेस्ट्रॉलची लक्षणे
उच्च कोलेस्टेरॉलची धोक्याची लक्षणे म्हणजे छातीत दुखणे, चक्कर येणे आणि बोलताना अडखळणे. कोलेस्टेरॉलचे वर्गीकरण हे चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) आणि वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) असे केले जाते. वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) हे एखाद्याच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते आणि रक्त प्रवाहात अडथळा निर्माण करते. प्रतिकूल परिणामांसह हृदयाशी संबंधित गुंतागुंत होण्याची शक्यता वाढते तेव्हा धमन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात.
एचडीएल आणि एलडीएलचा प्रभाव एखाद्या व्यक्तीच्या आहारावर होतो. उच्च एलडीएल पातळी असलेल्या व्यक्तीने त्याच्या आरोग्याबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासांनुसार पाय दुखणे हे देखील उच्च कोलेस्टेरॉल पातळीचे संकेत मानले जाते.
पायांचे दुखणे आणि उच्च कोलेस्टेरॉल यांच्यातील परस्पर संबंध
पाय दुखल्याने काय होते
जास्त कोलेस्टेरॉलमुळे पायातील रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होते, ज्यामुळे पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरोग्य स्थितीला आमंत्रण मिळते. ही घातक स्थिती हात किंवा पायांना होणारा रक्त प्रवाह कमी करून रक्तवाहिन्या अरुंद करते.
शिवाय, उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांमध्ये पेरिफेरल आर्टरी डिसीज विकसित होत असल्याचे तज्ज्ञांकडे पुरेसे पुरावे देखील उपलब्ध आहेत. अशा लोकांमध्ये पाठीच्या खालच्या भागात, मांड्या आणि पोटऱ्या दुखणे प्रामुख्याने व्यायाम करताना किंवा चढता उतरताना किंवा खूप वेळ चालल्यानंतर यासारखी लक्षणे दिसून येतात.
आर्टरी डिसीजचा धोका
हृदयाशी संबंधिक धोका
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे पेरिफेरल आर्टरी डिसीजचा धोका उद्भवतो. ज्याच्या सामान्य लक्षणांमध्ये म्हणजे पाय दुखणे, सूज येणे, पाय बधीर होणे, जखमा बऱ्या न होणे, अशक्तपणा याचा समावेश आहे. एखाद्या व्यक्तीने शरीरातील कोणत्याही बदलांची नोंद घ्यावी आणि वेळीच आणि अशा स्थितीचे व्यवस्थापन करण्यास विलंब न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
नियमित तपासणी
उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या व्यक्तींनी नियमित आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार आणि जीवनशैलीत बदल करावे. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे न चुकता घ्यावीत,संतुलित आहार, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करणे, धूम्रपान आणि मद्यपान टाळणे आणि वजन नियंत्रित राखणे गरजेचे आहे.